Dr Chandrakant Pulkundwar IAS | हिंजवडी परिसरातील समस्या दूर करण्यासाठी विभागीय आयुक्त स्तरावर नियमित आढावा | नियोजित कामांसाठी उशीर झाल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई होणार

Homeadministrative

Dr Chandrakant Pulkundwar IAS | हिंजवडी परिसरातील समस्या दूर करण्यासाठी विभागीय आयुक्त स्तरावर नियमित आढावा | नियोजित कामांसाठी उशीर झाल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई होणार

Ganesh Kumar Mule Jul 22, 2025 9:31 PM

Pune Divisional Commissioner | पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडून स्थानिक सुट्ट्या जाहीर
Divisional Commissioner Pune | पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध | तीन लाख ११ हजार पदवीधरांची व ५२ हजार शिक्षकांची नावनोंदणी
International Yoga Day | सकारात्मक उर्जानिर्मितीसाठी योगविद्या आत्मसात करा | डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

Dr Chandrakant Pulkundwar IAS | हिंजवडी परिसरातील समस्या दूर करण्यासाठी विभागीय आयुक्त स्तरावर नियमित आढावा

| नियोजित कामांसाठी उशीर झाल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई होणार

 

Hinjewadi  – (The Karbhari News Service) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथील बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांचेकडून कार्यवाही सुरू झाली असून परिसरातील समस्या दूर करण्यासाठी विभागीय आयुक्त स्तरावर दर १५ दिवसांनी नियमित आढावा घेण्यात येणार आहे. (Pune News)

विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी हिंजवडी परिसरातील नागरिक संघटनांच्या प्रतिनिधिंशी याबाबत आज संवाद साधला. यावेळी उपस्थित प्रतिनिधिंनी तातडीने सुरू झालेल्या कार्यवाहीबाबत समाधान व्यक्त केले. विभागीय आयुक्त श्री. पुलकुंडवार यांनी ही कार्यवाही सातत्याने सुरू ठेवण्याच्या सूचना सर्व यंत्रणांना दिल्या आहेत. त्याचबरोबर सर्व यंत्रणांनी आपली कामे वेळेत पूर्ण करावीत अशाही सूचना त्यांनी दिल्या.

काही यंत्रणांकडून कामांमध्ये दुर्लक्ष होऊन रस्त्याच्या दुरूस्तीची कामे जर वेळेत पूर्ण केली नाहीत तर जिल्हादंडाधिकारी यांच्याकडून आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी असे निर्देशही देण्यात आले आहेत. हिंजवडी परिसरातील नागरिक संघाच्या प्रतिनिधिंसोबत एक व्हॉट्सअँप ग्रुप तयार करण्यात येणार असून त्यामध्ये सर्व यंत्रणांचे प्रतिनिधीदेखील असतील. या प्लॅटफॉर्मवर त्यांना सर्व प्रश्न उपस्थित करता येतील आणि ते प्रश्न तातडीने सोडवले जातील, असेही निश्चित करण्यात आले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: