Pune PMC News |  पूर्वसूचना न देता काम केल्यामुळे ठेकेदार कंपनीकडून महापालिका प्रशासनाने मागितला खुलासा 

Homeadministrative

Pune PMC News |  पूर्वसूचना न देता काम केल्यामुळे ठेकेदार कंपनीकडून महापालिका प्रशासनाने मागितला खुलासा 

Ganesh Kumar Mule Apr 30, 2025 9:43 PM

Guru Pournima | “भारतीय संस्कृतीत गुरूला सर्वश्रेष्ठ स्थान”: डॉ.वसंत गावडे
Cabinet Decision | मंत्रिमंडळ बैठकीतील 14 निर्णय
Cycle tour | जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर आयोजित फेरीला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Pune PMC News |  पूर्वसूचना न देता काम केल्यामुळे ठेकेदार कंपनीकडून महापालिका प्रशासनाने मागितला खुलासा

 

PMC Project Department – (The Karbhari News Service) – मुख्य अभियंता (प्रकल्प) विभागास कोणतीही पूर्व सूचना न देता राजाराम पूल येथे Expansion Joint च्या केलेल्या कामामुळे झालेल्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना झालेल्या नाहक त्रासाचा जबाबदार कोण याबाबतचा लेखी खुलासा खात्यास ३ दिवसात द्यावा. असे आदेश  The Freyssinet Prestressed Concrete Company या ठेकेदार कंपनीला महापालिका प्रशासनाने दिले आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)

 

पुणे शहरातील स्ट्रक्चरल ऑडीट केलेल्या विविध पुलांची दुरुस्ती विषयक कामे करणे या कामाचा कार्यादेश  २१/१२/२०२३ रोजी  निर्गमित करण्यात आलेला आहे. या कामाच्या अनुषंगाने राजाराम पूल येथे Expansion Joint चे काम करण्याचे खात्याचे नियोजन होते. परंतु २८/०४/२०२५ रोजी सकाळी ८.०० वाजता कंपनी मार्फत राजाराम पूल येथे Expansion Joint चे काम मुख्य अभियंता (प्रकल्प) विभागास कोणतीही पूर्व सूचना न देता सुरु करण्यात आले आहे. हे काम करण्यापूर्वी राजाराम पूल बंद केलेबाबतचे कोणतेही जाहीर प्रकटन अथवा फलक लावण्यात आलेले नाहीत. या करणास्तव सदरील संपूर्ण परिसरात वाहतूक कोंडी निर्माण होवून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे. त्याबाबत खात्यास देखील तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

तरी या बाबत नागरिकांना होणाऱ्या त्रासास व आपण मुख्य अभियंता (प्रकल्प) विभागास कोणतीही पूर्व सूचना न देता राजाराम पूल येथे Expansion Joint च्या केलेल्या कामामुळे झालेल्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना झालेल्या नाहक त्रासाचा जबाबदार कोण याबाबतचा लेखी खुलासा खात्यास ३ दिवसात (०२/०५/२०२५ पर्यंत ) सादर करावा अन्यथा  टेंडर अटी शर्तीनुसार कारवाई करण्यात येईल. असा इशारा संबंधित कंपनीला महापालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे.