Pune Book Festival | पुणे पुस्तक महोत्सवात नागरिकांना पुस्तकांच्या खरेदीवर १०० रुपये सवलत| सोसायटीमध्ये वाचनालयासाठी १००० रुपयांची सवलत
Pune Pustak Mahotsav – (The Karbhari News Service) – पुणे पुस्तक महोत्सवात सर्वसामान्य नागरिकांना सहभागी होऊन, त्यांना भरपूर पुस्तकांची खरेदी करता यावी, यासाठी आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. पुस्तक महोत्सवात येणाऱ्या कोथरूड मतदार संघातील नागरिकांना चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडून प्रत्येकी १०० रूपये सवलतीचे कूपन देण्यात येणार आहे. नागरिकांना सवलतीचे हे कूपन चंद्रकांत दादा पाटील यांच्या संपर्क कार्यालयातून मिळतील. त्याचप्रमाणे सोसायटीच्या वाचनालयासाठी पुस्तक खरेदी केल्यानंतर, त्यावर १००० रुपये सवलतीचे कूपन देण्यात येईल, अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.
राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या पुस्तक महोत्सवात विविध भारतीय भाषांमधील हजारो पुस्तके ६०० पेक्षा अधिक स्टॉल्सद्वारे नागरिकांना खरेदी करता येणार आहे. ही पुस्तके खरेदी करताना नागरिकांवर आर्थिक ताण येऊ नये; त्याचप्रमाणे त्यांना अधिकाधिक पुस्तके खरेदी करता यावीत, यासाठी सवलतीचे कूपन देण्यात येणार आहे. हे सवलतीचे कूपन चंद्रकांत दादा पाटील यांच्या कोथरूड मतदार संघातील सर्व जनसंपर्क कार्यालयात १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत दुपारी ४ ते सायंकाळी ७ या वेळेत उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे कोथरूड मतदार संघातील नागरिकांनी जनसंपर्क कार्यालयात भेट देऊन, सवलतीचे कूपन घ्यायचे आहे. त्याचप्रमाणे सोसायटीमधील वाचनालयात पुस्तके खरेदी केल्यास, या खरेदीवर १००० रुपये सवलत मिळू शकते. त्यासाठी सोसायटीचे पदाधिकारी वाचनालयासाठी १००० रुपये सवलतीचे कूपन हे जनसंपर्क कार्यालयातून मिळवू शकतात, अशी माहिती चंद्रकांतदादा पाटील यांच्या कार्यलयाकडून देण्यात आली आहे.
….
सवलतीचे कूपन मिळण्याचे ठिकाण
….
कोथरूड – बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेजारी, कर्वे पुतळ्याजवळ, कोथरूड, पुणे
औंध – शॉप नंबर 1, ओमकार कॉम्प्लेक्स, आंबेडकर चौक, डीपी रस्ता, औंध, पुणे
बाणेर – गाळा नंबर ५, श्रॉफ सुयश अपार्टमेंट, युनियन बँकेच्या शेजारी, बालेवाडी फाट्याजवळ, बाणेर, पुणे
वनाज – समाधान, नामदार चंद्रकांतदादा पाटील जनसंपर्क कार्यालय, वनाज मेट्रो स्टेशनजवळ, कोथरूड.
COMMENTS