PMRDA Action | पीएमआरडीएच्या तीन टप्यातील कारवाईत तब्बल साडेतीन हजार अतिक्रमणांवर हातोडा

Homeadministrative

PMRDA Action | पीएमआरडीएच्या तीन टप्यातील कारवाईत तब्बल साडेतीन हजार अतिक्रमणांवर हातोडा

Ganesh Kumar Mule Mar 19, 2025 9:15 PM

Sugar factory Employees | साखर कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत सहकार मंत्री यांच्यासोबत बैठक
Vidhansabha Election | भाजपकडून भीमराव तापकीर, सुनिल कांबळे, हेमंत रासने | तर शरद पवार यांच्या पक्षाकडून अश्विनी कदम, सचिन दोडके यांना संधी
Aadhar Card | आधार कार्डचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी बायोमेट्रिक्स सहजपणे लॉक केले जाऊ शकतात | संपूर्ण प्रक्रिया येथे जाणून घ्या

PMRDA Action | पीएमआरडीएच्या तीन टप्यातील कारवाईत तब्बल साडेतीन हजार अतिक्रमणांवर हातोडा

| वाहतूक सुरळीत करण्यासाठी शासकीय यंत्रणेची संयुक्तपणे व‍िशेष मोहीम

 

Pune News – (The Karbhari News Service) – पुणे शहराभोवती असणाऱ्या राष्ट्रीय व राज्यमार्गावर अनधिकृतपणे उभारलेल्या बांधकामांमुळे वाहनधारकांना सातत्याने वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी याची दखल घेत इतर शासकीय यंत्रणांच्या मदतीने गत काही द‍िवसात तीन टप्यात राबवलेल्या व‍िशेष मोह‍िमेत साडेतीन हजार अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. (PMRDA Pune)

वाहतूक कोंडीचा प्रश्न न‍िकाली काढण्यासाठी पीएमआरडीएसह राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पीएमसी, पीसीएमसी यांनी अनधिकृत बांधकामांवर कारवाईसाठी संयुक्तरित्या विशेष मोहीम हाती घेतली आहे. यात पह‍िल्या टप्यात नगर वाघोली रोडवर २९ जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान राबवलेल्या ८२२ कारवाई ८२ हजार २०० चौरस फुटावरील अनधिकृत बांधकामांचे न‍िष्कासन करण्यात आले. दुसऱ्या टप्यात पुणे नाशिक रोड, पुणे सोलापूर रस्ता आण‍ि चांदणी चौक पौड रस्त्यादरम्यानची अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली. ३ ते १३ मार्चदरम्यान राबवलेल्या या कारवाईत २ हजार ४७८ कारवाई करत २ लाख ४७ हजार ८०० चौरस फुटावरील अनधिकृत बांधकामांवर हातोडा पडला.

पीएमआरडीएकडून त‍िसऱ्या टप्याच्या मोह‍िमेची आखणी करण्यात आली असून त्याची सुरुवात १७ मार्चपासून करत ती ३० मार्चपर्यंत चालणार आहे. यात १७ आण‍ि १८ मार्च रोजी हडपसर ते द‍िवे घाट आण‍ि पुणे – सातारा रोड २१० अनधिकृत बांधकामे काढण्यात आल्याने ३४ हजार ५०० चौरस फुटांपर्यंतचा रस्ता मोकळा झाला. साधारण गत दोन मह‍िण्यात तीन टप्यात राबवलेल्या अनधिकृत बांधकामांविरुद्धच्या मोह‍िमेत एकूण ३ हजार ५१० अनधिकृत बांधकामे पाडण्यात आल्याने ३ लाख ४७ हजार ३०० चौरस फुटावरील अतिक्रमण काढण्यात आले आहे.
———————–

तीन टप्यात व‍िशेष मोहीम

१ ) पह‍िल्या टप्यात नगर वाघोली रोडवर केलेल्या ८२२ कारवाई ८२ हजार २०० चौरस फुटावरील अनधिकृत बांधकामांचे न‍िष्कासन
२ ) दुसऱ्या टप्यात पुणे नाशिक रोड, पुणे सोलापूर रस्ता आण‍ि चांदणी चौक पौड रस्त्यावर २ हजार ४७८ कारवाईत २४७८०० चौरस फुटावरील अनधिकृत बांधकामांवर हातोडा
३ ) त‍िसऱ्या टप्यात हडपसर ते द‍िवे घाट, पुणे – सातारा रोड एकूण २१० अनधिकृत बांधकामे काढल्याने ३४५०० चौरस फुटांपर्यंतचा रस्ता मोकळा झाला

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: