समाविष्ट २३ गावातील कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न बुधवारी मिटणार
: उपायुक्त राजेंद्र मुठे यांची मुख्य सभेत माहिती
पुणे : महापालिका हद्दीत २३ गावांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र गेल्या ५ महिन्यापासून या कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यात आलेले नाही. याबाबत सोमवारच्या मुख्य सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी आवाज उठवला. यावर प्रशासनाकडून खुलासा करण्यात आला. उपायुक्त राजेंद्र मुठे यांनी सांगितले कि, बुधवारी जिल्हा परिषदेकडून सर्व कर्मचाऱ्यांची यादी आपल्याला मिळणार आहे. त्यांनतर तत्काळ वेतन दिले जाईल.
: गेल्या ५ महिन्यांपासून वेतन नाही
समाविष्ट २३ गावातील कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात आलेले नाही. याबाबत भाजपचे नगरसेवक हरिदास चरवड यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या कर्मचाऱ्यांना तत्त्काळ वेतन देण्याची मागणी केली. त्यांनतर सर्वपक्षीय नगरसेवकांनी हाच विषय मांडला. नगरसेवक बाबुराव चांदेरे, अमोल बालवडकर, सिद्धार्ध धेंडे, सचिन दोडके, वसंत मोरे, यांनी या विषयावर भाषणे केली. अमोल बालवडकर म्हणाले कि, याबाबत राज्य सरकार आणि जिल्हा परिषद यांच्याकडे पाठपुरावा करत प्रशासनाने यात लक्ष घालावे. लोकांना न्याय देण्यात यावा. बाबुराव चांदेरे म्हणाले, यात महापालिकेची चूक नाही तर जिल्हा परिषदेची आहे. गटनेते पृथ्वीराज सुतार म्हणाले कि, गेल्या ५ महिन्यापासून वेतन न मिळणे ही गंभीर बाब आहे. महापालिकेने तत्काळ लक्ष घालावे आणि कामगारांना वेतन देण्यात यावे. विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ म्हणाल्या, याबाबत मी वारंवार आयुक्तांकडे पाठपुरावा केला होता. मात्र तरी लक्ष दिले गेले नाही. या गावावर का अन्याय करता? आतातरी या लोकांना न्याय द्या. यावर यावर प्रशासनाकडून खुलासा करण्यात आला. उपायुक्त राजेंद्र मुठे यांनी सांगितले कि, बुधवारी जिल्हा परिषदेकडून सर्व कर्मचाऱ्यांची यादी आपल्याला मिळणार आहे. त्यांनतर तत्काळ वेतन दिले जाईल.
COMMENTS