समाविष्ट २३ गावांतील शाळांमधील शिक्षकांच्या नियुक्त्यांवर तोडगा काढा
| महापालिका आणि जिल्हा परिषदेकडे खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी
पुणे | पुणे महापालिकेत समाविष्ट २३ गावांतील शाळांमधील शिक्षकांच्या नियुक्त्यांबाबत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खोळंबा होऊ शकतो. विद्यार्थ्यांचे संभाव्य नुकसान टाळणे गरजेचे आहे. त्यामुळे यावर तोडगा काढण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी महापालिका आणि जिल्हा परिषदेकडे केली आहे.
खासदार सुळे यांच्यानुसार पुणे महापालिकेत समाविष्ट २३ गावांतील शाळांमधील शिक्षकांच्या नियुक्त्यांबाबत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खोळंबा होऊ शकतो. विद्यार्थ्यांचे संभाव्य नुकसान टाळणे गरजेचे आहे.
हा विषय महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या स्तरावर चर्चा करुन मार्गी लावता येणे शक्य आहे. तरी मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद पुणे आणि महापालिका आयुक्त पुणे यांनी यासंदर्भात वैयक्तिक लक्ष घालून यावर तोडगा काढण्याबाबत सकारात्मक विचार करावा. अशी मागणी केली आहे.