PMC Kids Festival | मुक्त खेळ आणि पालक कल्याणाचा उत्सव याकरिता अर्बन ९५ पुणे किड्स फेस्टिव्हल २०२४ चा उद्घाटन समारंभ संपन्न

Homeadministrative

PMC Kids Festival | मुक्त खेळ आणि पालक कल्याणाचा उत्सव याकरिता अर्बन ९५ पुणे किड्स फेस्टिव्हल २०२४ चा उद्घाटन समारंभ संपन्न

Ganesh Kumar Mule Dec 19, 2024 7:41 PM

NCP Youth | आरटीई ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याकरिता मुदतवाढ | राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मागणीला यश
Arvind Shinde | वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मर्जीने  ईआयएल या त्रयस्थ संस्थेकडून महापालिकेत भ्रष्टाचार  | कॉंग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांचा आरोप 
Kasba By election | Mahayuti | कसब्यात महायुतीचे शक्ती प्रदर्शन

PMC Kids Festival | मुक्त खेळ आणि पालक कल्याणाचा उत्सव याकरिता अर्बन ९५ पुणे किड्स फेस्टिव्हल २०२४ चा उद्घाटन समारंभ संपन्न

 

Urban 95 Kids Festival – (The Karbhari News Service) – लहान मुलांमध्ये असंरचित मुक्त खेळाच्या महत्त्वावर भर देत पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्या शुभ हस्ते आज सारसबागेत “अर्बन ९५ पुणे किड्स फेस्टिव्हलचे” उद्घाटन करण्यात आले. लहान मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी आकर्षक उपक्रमांनी भरलेला हा उत्सव वानलीयर फाऊंडेशनच्या सहकार्याने आणि डब्ल्यूआरआय इंडियाच्या तांत्रिक सहाय्याने आयोजित करण्यात आला आहे. (Pune Municiapl Corporation – PMC)

याप्रसंगी पुणे महापालिकेचे मा. अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले कि, सहा वर्ष वयोगट अंतर्गत बालकांना बौद्धिक खेळ, मनोरंजनात्मक खेळ ,एकाग्रता वाढीसाठी खेळ ,मॅजिक शो, कटपुटली शो, पपेट शो, अग्निशामकचे ड्रिल तसेच निसर्गाच्या सानिध्यात जाण्यासाठी माती ,वाळू यांच्या समवेत वेगवेगळे खेळ आणि असे अनेक मुलांच्या शारीरिक आणि मानसिक, बौद्धिक वाढीसाठी आवश्यक खेळ आहेत. तसेच पुणे महानगरपालिका आयोजित बाल महोत्सवमध्ये जास्त संख्येने शहरातील नागरिकांनी सहभागी होऊन बालकांनी आणि पालकांनी या महोत्सवाचा आनंद लुटावा असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.

किड्स फेस्टिव्हलच्या तिसऱ्या आवृत्तीत सारसबागेतील नैसर्गिक घटकांचा वापर करून तयार केलेल्या मॉडेल खेळाच्या जागेतून निसर्गाधारित आणि संवेदनाक्षम खेळाच्या विविध कृतींचा समावेश आहे. आजकाल मुलांचे खेळाचे साधन म्हणून केवळ खेळणी आणि डिजिटल माध्यमांचा वापर होतो. ही दोन्ही माध्यमे प्रौढांनी ठरवलेली असल्यामुळे ती मुलांसाठी संरचित स्वरूपाची असतात. अशा परिस्थितीत, निसर्गात मुक्त खेळाचा वेळ देणे अत्यंत महत्त्वाचे आहे, ज्यामुळे मुलांच्या मानसिक आणि शारीरिक विकासाला चालना मिळते. पुणे किड्स फेस्टिव्हल लहान मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी सार्वजनिक जागांमध्ये ही संधी उपलब्ध करून देण्यासाठी आहे.

१९ डिसेंबर ते २२ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या या चार दिवसीय उत्सवात २० हून अधिक संस्था आणि बालरोग तज्ञ सहभागी होऊन लहान मुलांसाठी वयानुसार खेळ आणि शिक्षणाच्या संधी प्रदान करतील. “प्ले-वर्क” या युरोपीय देशांमध्ये लोकप्रिय असलेल्या संकल्पनेवर आधारित प्रशिक्षण सत्र शहरातील अंगणवाडी सेविकांसाठी आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये मुलांच्या स्वच्छंद खेळाचे महत्त्व समजून घेत, संरचित आणि असंरचित खेळ यांचा संतुलन साधण्याचा दृष्टिकोन यावर भर देण्यात आला आहे.

जैवविविधता तज्ञ अनिकेत मोटले यांनी पालक आणि लहान मुलांसाठी सत्र आयोजित करून निसर्गाशी जोडून राहण्याचे फायदे समजावून सांगितले. त्यांनी साध्या खेळांद्वारे ही सवय लहान वयातच लावण्याचे महत्त्व अधोरेखित केले. याशिवाय गोष्टी सांगणे, चित्रकला, मातीचे शिल्प बनवणे यांसारख्या विविध उपक्रमांनी मुलांचे कुतूहल वाढवले.
नर्चरिंग नेबरहूड्स २.० उपक्रमाअंतर्गत पुणे शहर लहान मुलांची आणि पालकांची गरज ओळखून सार्वजनिक जागा सुधारण्याचे उद्दिष्ट ठेवते. या उत्सवातून पालक, अंगणवाडी सेविका, डिझाइनर आणि अधिकाऱ्यांमध्ये संवाद साधण्यासाठी व्यासपीठ निर्माण झाले आहे. या संवादातून मिळालेल्या शिकवणुकींचा उपयोग प्रकल्प प्रस्तावात करण्यावर भर देण्यात आला आहे.

पुणे महापालिका आयुक्त मा. डॉ. राजेंद्र बी. भोसले म्हणाले, “अर्बन 95 पुणे किड्स फेस्टिव्हल मुलांसाठी आणि पालकांसाठी केंद्रित शहरी विकासासाठी पुणे महापालिकेची बांधिलकी दर्शवते. या उत्सवातून विविध भागधारकांशी साधलेला संवाद प्रकल्पात लागू करण्यासाठी उपयुक्त ठरेल. अशा उपक्रमांमधून मुलांसाठी व्यापक पोहोच सुनिश्चित करता येईल.”

वानलीयर फाऊंडेशनचे मा. प्रकाश पॉल, म्हणाले, “पुणे हे भारतातील काही अग्रगण्य शहरांपैकी एक आहे, ज्याने लहान मुले आणि पालक अनुकूल दृष्टिकोन शहरी नियोजनात समाविष्ट केला आहे. नर्चरिंग नेबरहूड २.० अंतर्गत, सार्वजनिक जागा आणि खेळाच्या सुविधा सुधारण्याचे उद्दिष्ट आहे. किड्स फेस्टिव्हल समुदायाला सहभागी करून घेण्याची संधी देतो.” डब्ल्यूआरआय इंडियाचे प्रोग्राम डायरेक्टर मा. श्रीकुमार कुमारस्वामी म्हणाले, “लहान वयात मिळणारे अनुभव मुलांकरिता आयुष्यभर परिणाम करतात. या कार्यक्रमामुळे सार्वजनिक जागांचा पुनर्विचार करून मुलांसाठी अधिक खेळाच्या संधी उपलब्ध करून देण्याचे महत्त्व अधोरेखित होते.”

#MyChildMyCity मोहिमेअंतर्गत, पुणे किड्स फेस्टिव्हलमध्ये शहरातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करत आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0