Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महानगरपालिकेला राष्ट्रपती यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान!

Homeadministrative

Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महानगरपालिकेला राष्ट्रपती यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान!

Ganesh Kumar Mule Oct 22, 2024 9:12 PM

Dr Rajendra Bhosale IAS | विकास कामांवर झालेल्या खर्चाची माहिती लोकप्रतिनिधी आणि नागरिकांना क्षेत्रीय कार्यालय स्तरावर लावण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश
Dr Rajendra Bhosale IAS | महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांची पाणी शिरलेल्या भागात भेट
PMC Additional Commissioner | अतिरिक्त महापालिका आयुक्त यांच्याकडील कामकाज व्यवस्थेत बदल!

Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महानगरपालिकेला राष्ट्रपती यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान!

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेला केंद्र सरकारच्या  सर्वोत्तम स्थानिक संस्था श्रेणीत तिसऱ्या क्रमांकाचे राष्ट्रीय जल पुरस्कार (National Water Award) प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार पाणी पुरवठा, मलनिस्सारण व्यवस्थापन आणि जल संवर्धन क्षेत्रातील अपूर्व कार्यासाठी मिळाला आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. (Pune Municipal Corporation – PMC)

हा पुरस्कार समारंभ आज २२ ऑक्टोबर २०२४ रोजी भारताचे राष्ट्रपती (President of India) यांच्या उपस्थितीत झाला. महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale IAS),  शहर अभियंता प्रशात वाघमारे (City Engineer Prashant Waghmare), आणि  मुख्य अभियंता पाणी पुरवठा नंदकिशोर जगताप (Nandkishor Jagtap Chief Engineer) यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

0 Comments