PMC Additional Commissioner | नगरपरिषद प्रशासन संचालनालयाकडून मागविण्यात आलेली माहिती तात्काळ सादर करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त (इ) यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती 

Homeadministrative

PMC Additional Commissioner | नगरपरिषद प्रशासन संचालनालयाकडून मागविण्यात आलेली माहिती तात्काळ सादर करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त (इ) यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती 

Ganesh Kumar Mule Apr 12, 2025 8:55 PM

PMC Ward no 2 | पावसाळी समस्येतून प्रभाग दोन मधील नागरिकांची होणार सुटका | तात्काळ उपाययोजना करण्याबाबत आयुक्त राजेंद्र भोसले यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
PMC Assistant Commissioner | सहाय्यक आयुक्तांचे अधिकार वाढवले | मुख्य खाते आणि क्षेत्रीय कार्यालयात समन्वय राखण्यासाठी महापालिका आयुक्तांचा निर्णय!
DCM Ajit Pawar on Pune Rain | पावसामुळे दहावी-बारावीची परीक्षा न देऊ शकलेल्यांची स्वतंत्र परीक्षा घेणार | अजित पवार

PMC Additional Commissioner | नगरपरिषद प्रशासन संचालनालयाकडून मागविण्यात आलेली माहिती तात्काळ सादर करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त (इ) यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – शासनाकडून तसेच नगरपरिषद प्रशासन संचालनालयाकडून मागविण्यात आलेली माहिती तात्काळ सादर करण्याबाबत महानगरपालिका स्तरावर सर्व विभागाकडून माहिती संकलित करून सादर करणेकरिता अतिरिक्त आयुक्त दर्जाचे अधिकारी नेमण्याचे आदेश सरकार कडून देण्यात आले होते. त्यानुसार महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale) यांनी अतिरिक्त आयुक्त (इ) यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. महापालिका आयुक्तांनी याबाबतचे आदेश नुकतेच जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)

महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकांचा एकत्रित समन्वय साधण्याकरिता तसेच वेळोवेळी उद्भवणाऱ्या इतर कामाबाबत समन्वय साधण्यासाठी नगरपरिषद प्रशासन संचालनालय कार्यालयात “महानगरपालिका समन्वय कक्ष १४” स्थापन करण्यात आला आहे. त्यानुषंगाने  संचालनालय स्तरावरून माहिती घेण्यात येते. यामध्ये    महानगरपालिकांचे / नगरपरिषदांचे सामायिक धोरण व उपस्थित होणाऱ्या समन्वयाच्या बाबी तसेच सेवाविषयक बाबींमध्ये मार्गदर्शन देणे, सर्वोच्च न्यायालय व  उच्च न्यायालय यांच्या संबंधीत उपस्थित होणाऱ्या बाबी, विधानमंडळ कामकाजाच्या दृष्टीने उपस्थित होणाऱ्या बाबी, अनेक महत्वाच्या बैठकाकरिता माहिती मागविणे, माहिती तयार करणे, कागदपत्रांची शहानिशा करणे याकरिता राज्यातील सर्व महानगरपालिकांना पत्र व्यवहार करणे, ई-मेल करणे, व्हॉट्सप द्वारे संदेश पाठविणे, सर्व महानगरपालिकांना वैयक्तिकरित्या दूरध्वनी द्वारे वारंवार संपर्क साधून माहिती मागविणे. अशा गोष्टींचा समावेश आहे.

यात  समन्वय साधण्यासाठी आपल्या महानगरपालिकेतील “अतिरिक्त आयुक्त” यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करणेबाबत सरकारच्या  सूचना प्राप्त आहेत.
त्यानुसार, नगरपरिषद प्रशासन संचालनालय कार्यालयात “महानगरपालिका समन्वय कक्ष १४” कडील उपरोक्त नमूद बाबींकरिता समन्वय साधण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडील अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (इ) यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली  आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0