Pune Water cut on Thursday | येत्या गुरुवारी पूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद!

Pune water cut on Thursday

HomeBreaking News

Pune Water cut on Thursday | येत्या गुरुवारी पूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद!

Ganesh Kumar Mule Aug 19, 2024 9:11 PM

Pune water Crisis | पुण्याच्या उशाला 4 धरणं तरीही 4 लाख टँकर ने पुणेकरांची भागवली जातेय तहान!
Next Thursday, the entire Pune city’s water supply will be closed!
Water cut in Pune on Thursday | येत्या गुरुवारी शहराच्या काही भागांत पाणीपुरवठा बंद राहणार | जाणून घ्या परिसर

Pune Water cut on Thursday | येत्या गुरुवारी पूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद!

 

Pune Water cut Today – (The Karbhari News Service) – येत्या गुरुवारी पूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी कमी दाबाने पाणी येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी जपून पाणी वापरावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप (Nandkishor Jagtap PMC) यांनी केले आहे. (Pune Municipal Corporation Water Supply Department)

गुरूवार रोजी खडकवासला जॅक्वेल (नवीन), नवीन पर्वती जलशुध्दीकरण केंद्र (५०० एम.एल.डी.), जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र व त्या अंतर्गत पर्वती MLR टाकी परिसर, पर्वती HIER टाकी परिसर व पर्वती II.R टाकी परिसर, पर्वती टँकर पॉईंट, लष्कर जलकेंद्र, एस.एन.डी.टी. (एम.एल.आर.). एच. एल. आर. व चतुथुंगी टाकी परिसर, वडगाव जलकेंद्र परीसर येथील विद्युत/पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्या कारणामुळे अत्यावश्यक देखभाल दुरूस्तींचे कामांसाठी उपरोक्त पंपींगचे अखत्यारीतील पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवार दिनांक रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची
शक्यता आहे.

पाणीपुरवठा बंद असणारा भाग-

पर्वती जलकेंद्र अंतर्गत पाणीपुरवठा बंद असणारा भाग-
पर्वती MLR टाकी परिसर :- गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टर गेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ,
नाना पेठ. लोहियानगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडीम परिसर, घोरपडे पेठ, पर्वती दर्शन, मुकुंदनगर इ.

पर्वती IILR टाकी परिसर :- सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगरकाही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणीनगर भाग-१ व २ लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, शेळकेवस्ती महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकरनगर डायस प्लॉट, ढोले मळा, सॅलेसबरी पार्क, गरीधरभवन चौक, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण भाग्योदयनगर, शिवनेरीनगर, मिठानगर, कुमार पृथ्वी, स.नं. ४२ कोंढवा खुर्द, साईबाबानगर, इत्यादी.

पर्वती LLR परिसर – शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परीसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, स्वारगेट परिसर. एस.एन.डी.टी. (एम.एल. आर.) टाकी परिसर :- गोखलेनगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, रेव्हेन्यू कॉलनी, कोथरूड संपूर्ण भाग, वडार वस्ती, स्टेट बैंक कॉलनी, श्रमिक वसाहत, हॅपी कॉलनी, मेघदूत, तेजस नगर, डहाणूकर कॉलनी, सुतारदरा, किष्किंदा नगर, जयभवानी नगर, रामबाग कॉलनी, हनुमान नगर, केळेवाडी, गुजरात कॉलनी, गाढवे कॉलनी, ज्ञानेश्वर कॉलनी, आयडीयल कॉलनी, वडारवाडी, सेनापती बापट रोड, जनवाडी, वैदुवाडी, भोसले नगर, अशोकनगर, खैरेवाडी, शिवाजी हौ. सोसायटी, भांडारकर रोड, प्रभात रोड, सेनापती बापट रोड, हनुमाननगर, जनवाडी, वैदवाडी, वडारवाडी, पोलीस लाईन, संगमवाडी.

एस. एन. डी. डी. (एच. एल. आर.) : गोखलेनगर, औध, बोपोडी, पुणे विद्यापिठ, लॉ कॉलेज रोड, महाबळेश्वर हॉटेल पर्यंत भागेर रोड, बीएमसीसी कॉलेज रोड, आयसीएस कॉल्स भोसलेनगर, सेनापती बापट रोड, भांडारकर रोड, प्रभात रोड, पौड रोड शीला विहार कॉलनी, अद्वैत सोसा. भीमनगर, वेदांतनगरी, कुलश्री कॉलनी परिसर झोनिंग पध्दतीने, सहवास, क्षिप्रा, मनोहन सोसा. विठ्ठल मंदिर परिसर झोननिंग करून, गोसावी वस्ती परिसर, करिष्मा सोसायटी समोरील परिसर, बीग बाझार परिसर, बंधन सोसायटी परिसर. डी. पी. रस्ता (पार्ट), मयूर कॉलनी परिसर, मयुर डी. पी. रस्त्याची डावी बाजु, कर्वेरोड झाला सोसायटी ते शिवाजी पुतळ्या पर्यंतचा भाग दशभूजा गणपती ते नळस्टॉप, सहकार वसाहत म्हात्रे पुलापर्यंत एच. ए. कॉलनी टिळेकर प्लॉट, भरतनगर अर्चनानगर, भरतकुंज, स्वप्नमंदीर, सुनिता, युको बँक कॉलनी, टैंकर पॉईट डि.पी. रस्ता मंगेशकर हॉस्पिटल, हिमाली सोसायटी, वकिलनगर इत्यादी, करिष्मा सोसा., ते वारजेवार्ड ऑफिस गिरीजा शंकर, नवसह्याद्री ताथवडे उद्यान परिसर निलकमल युनायटेड वेस्टर्न अनुरेखा स्थैर्य, मधूचय, शैलेश, अलंकार, मनिषा, स्वस्तिश्री, रघुकुल महिम्न, सुखा जयशक्ती, इत्यादी.

वारजे जलकेंद्र अखत्यारीतील चांदणी चौक टाकी परिसर :- पाषाण साठवण टाकी, भूगाव रोड परिसर, कोकाटे वस्ती, सेंटीन हिल सोसायटी, मधुवन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, उजवी भुसारी कॉलनी व डावी भुसारी कॉलनी व चढावरील भाग, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेश नगर, सुरज नगर, सागर कॉलनी, भारतीनगर, बावधन परिसर, सारथीशिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतीबन सोसायटी परिसर, डुक्कर खिंडीकडील भाग, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमहंस नगर, पूर्ण पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाणतांडा, मोहन नगर, सुस रोड, इत्यादी..

गांधी भवन टाकी परिसर:- कुंभारवाडी टाकी परिसर, काकडे सिटी, होम कॉलनी, सिप्ला फाउंडेशन, रेणुका
नगर, हिल व्यू गार्डन सिटी, पाप्युलर कॉलनी, वारजे माळवाडी परिसर, गोकुळनगर, अतुलनगर, बी. एस. यु.पी स्कीम, महात्मा सोसायटी परिसर, भुजबळ टाऊनशिप, एकलव्य कॉलेज परिसर, कुमार परिसर, धनंजय सोसायटी, रोहन गार्डन परिसर, कोथरूड वॉर्ड ऑफिस परिसर, अथर्व वेद, स्नेहल अमित पार्क, कांचन गंगा, अलक नंदा, शिवप्रभा मंत्री पार्क- १. आरोह सोसायटी, श्रावण धारा झोपडपट्टी, सहजानंद (पार्ट), शांतीवन गांधी स्मारक, किर्लोस्कर डीझेल कंपनी, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, मृणमयी प्रीमारोज आर्चिड लेन ७ व ९. मुंबई पुणे बायपास रोड दोन्ही बाजू. शेरावती सोसायटी, सिद्धकला सोसायटी, श्रीराम सोसायटी, गिरीष सोसायटी, तिरुपती नगर, कुलकर्णी हॉस्पिटल परिसर, हिंगणे होम कॉलनी, मिलेनियमस्कूल, कर्वेनगर गावठाण, तपोधाम परिसर, राम नगर, गोसावी वस्ती, कॅनॉल रोड.

पॅनकार्ड क्लब GSR टाकी परिसर :- बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, चाकणकर मळा, पॅनकार्ड क्लबरोड, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडिपॉईंट रोड, विजयनगर, आंबेडकरनगर, दत्त नगर, इ.

वारजे जलकेंद्र लगत GSR टाकी परिसर:- कर्वे नगर गावठाण परिसर, तपोधाम सोसायटी, शाहू कॉलनी गल्ली क्र. १ ते ११, इंगळेनगर, वारजे जकात नाका परिसर, कर्वेनगर कॅनॉल गल्ली क्र. १ ते १०

चतु:श्रृंगी टाकी परीसर :- औंध, बोपोडी, भोईटे वस्ती, पुणे विद्यापीठ, परिसर, चिखल वाडी, खडकी, आनंद पार्क, सानेवाडी, आंबेडकर वसाहत, संकल्प पार्क, सकाळनगर, चव्हाणनगर, अभिमानाश्री सोसायटी, नॅशनल, सिंघ सोसायटी, औंधगाव परिसर.

पाषाण पंपिंग व गोल टाकी परिसर- गणराज चौक, पॅनकार्ड रोड, वीरभद्र नगरचा काही भाग समर्थ

जुने वारजे जलकेंद्र भाग:- रामनगर, अहिरेगाव, माळवाडी, सहयोगनगर पठार, गोकुळनगर पठार, विठठल नगर, ज्ञानेश सोसायटी, यशोदिप चौक, मामासाहेब मोहोळ शाळा परिसर, अमर भारत सोसायटी, गणपती माथा परिसर, एनडीए रोडचा काही भाग, पॉप्युलर कॉलनी इत्यादी.

लष्कर ते खराडी पंपींग क्लोजरमुळे पाणीपुरवठा बंद होणारा परीसर | खराडी गावठाण, आपले घर, तुळजाभवानी नगर, ईऑन परीसर, चौधरी वस्ती, सातव वस्ती, थिटे वस्ती, तुकाराम नगर, यशवंतनगर, चंदननगर, सुनितानगर, धर्मनगर, सोमनाथनगर, गार्डेनिया, धनलक्ष्मीसोसायटी, गणेशनगर, आनंदपार्क, राजश्री कॉलनी, मतेनगर, महावीरनगर, माळवाडी, मुन्नुरवार सोसायटी इत्यादी.

लष्कर जलकेंद्र भाग 😐 संपूर्ण रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया, सय्यदनगर, हेवनपार्क, गोसावी वस्ती शंकर मठ,
वैदूवाडी, रामनगर, आनंदनगर, हडपसर गावठाण, सातववाडी, गोधळेनगर, ससाणेनगर, काळेपडळ, मुंढवा, माळवाडी, सोलापूर रोड डावी बाजू, केशवनगर मांजरी बु.. शेवाळेवाडी, बी.टी. कवडे रोड, भीमनगर, बालाजीनगर, विकासनगर, कोरेगाव पार्क, ओरीयंट गार्डन, साडेसतरानळी, महंमदवाडी रस्ता उजवीकडील संपूर्ण भाग, संपूर्ण हांडेवाडी रोड, फुरसुंगी उरुळी देवाची भेकराईनगर (टँकरद्वारे पाणीपुरवठा बंद), हाय सर्व्हिस, बेकर हिल, रेसकोर्स, ठाकरसी टाकी, कॅम्प, ससून,

नवीन व जुने होळकर जलकेंद्र अंतर्गत पाणीपुरवठा बंद असणारा भाग:- मुळा रोड, खडकी कॅन्टॉनमेंट संपूर्ण
परिसर, MES, “HE Factory, हरीगंगा सोसायटी इत्यादी.

वडगाव जलकेंद्र परीसर :-

दत्तनगर, टेल्को कॉलनी परिसर, संतोषनगर मुख्य रस्ता महावीकुंज, रेलीकॉन, दत्तनगर-आंबेगाव रस्ता, दत्तनगर चौक, संतोषनगर व अंजलीनगर परिसर, आगम मंदिर परिसर, गुरूद्वारा इत्यादी परिसर. कात्रजगाव, गुजरवाडी फाटा, लिंबाळकर वस्ती, उत्कर्ष, राजस, इंद्रप्रस्थ, भूषण सोसायटी परिसर, सुखसागर नगर भाग-१ व भाग-२, कात्रज कोंढवा रस्ता, शिवशंभोनगर, गोकुळनगर, श्रीकृष्ण मंदिर परिसर, इस्कॉन मंदिर परिसर, टिळेकरनगर, येवलेवाडी, कोंढवा गाव, लक्ष्मीनगर परिसर, काकडे वस्ती, अशरफनगर, ग्रीनपार्क, साईनगर, गजानननगर, राजीव गांधी नगर, खडीमशीन परिसर, बालाजीनगर, श्रीहरी सोसायटी, गुरूदत्त सोसायटी, पुण्याई नगर, हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, धनकवडी, भारती विद्यापीठ परीसर,कोंढवा बुद्रुक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, सहकारनगर भाग २ वरील भाग, आंबेडकर नगर, टिळकनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर, इत्यादी काही भाग.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0