Pune Election | ‘बंडखोरी नाही, डमी अर्ज!’; पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघात महायुतीचा ‘एकजुटीचा’ दावा

डॉ. स्मिता जाधव, कौस्तुभ गावडे यांचे भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल

HomeBreaking News

Pune Election | ‘बंडखोरी नाही, डमी अर्ज!’; पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघात महायुतीचा ‘एकजुटीचा’ दावा

Ganesh Kumar Mule Oct 05, 2026 8:35 PM

Mhada Exam : Siddharth Shirole : परीक्षांचा बट्ट्याबोळ करून ठाकरे सरकारने युवकांच्या भवितव्याशी खेळ केला  : म्हाडा पेपरफुटीवरून भाजपचा हल्लाबोल
Metro Station : Garware college : Swatantryaveer Savarkar : मोदी मेट्रोने प्रवास करणार आहेत, त्यामुळे गरवारे महाविद्यालय येथील मेट्रो स्थानकाचे नामकरण स्वातंत्र्यवीर सावरकर स्थानक करावे
RSS | BJP | Coordination meeting of Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) in Pune

Pune Election | ‘बंडखोरी नाही, डमी अर्ज!’; पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघात महायुतीचा ‘एकजुटीचा’ दावा

डॉ. स्मिता जाधव, कौस्तुभ गावडे यांचे भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल; नाराजांची समजूत काढणार : रवींद्र चव्हाण

 

BJP Maharashtra – (The Karbhari News Service) –  पुणे विभागीय पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपने आपली भूमिका स्पष्ट करत महायुतीतील अधिकृत उमेदवारांच्या पाठीशी सर्व घटक पक्ष एकत्रितपणे उभे राहतील, असा दावा केला आहे. पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता योगेश जाधव आणि शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांनी सोमवारी विधान भवन येथे भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षातील बंडखोरीच्या चर्चांना पूर्णविराम देत काही उमेदवारी अर्ज हे ‘डमी अर्ज’ असल्याचे स्पष्ट केले. (Pune News)

उमेदवारी अर्ज दाखल करताना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आमदार हेमंत रासने, महेश लांडगे, अमित गोरखे, भीमराव तापकीर, माजी आमदार शरद लाड, संग्राम जगताप, बाबा मिसाळ यांच्यासह महायुतीतील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

‘भाजपमध्ये बंडखोरी नाही’

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले, “भाजपमध्ये बंडखोरी होत नाही. शरद लाड यांचा उमेदवारी अर्ज ‘डमी अर्ज’ म्हणून दाखल करण्यात आला आहे. महायुतीतील सर्व घटक पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते अधिकृत उमेदवारांच्या पाठीशी राहतील.”डॉ. स्मिता जाधव यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील अनुभवाचा उल्लेख करत चव्हाण यांनी सांगितले की, त्यांना प्र-कुलगुरू म्हणून काम करण्याचा अनुभव आहे. शैक्षणिक संस्थांच्या अडचणी तसेच सरकारशी समन्वय साधण्याची प्रक्रिया त्यांना माहिती आहे. त्यामुळे पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचा अनुभव उपयुक्त ठरेल.

कौस्तुभ गावडे हे अनेक वर्षांपासून भाजपमध्ये कार्यरत असून, शिक्षण संस्था आणि शिक्षकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी काम केले आहे. दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी महायुतीतील सर्व घटक एकत्रितपणे काम करतील, असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला.नाराजांची समजूत काढणारमहायुतीमध्ये काही इच्छुक नाराज असल्याच्या चर्चांवरही चव्हाण यांनी भाष्य केले. “अनेक इच्छुकांची समजूत काढली असून, ते महायुतीचे काम करणार आहेत. काही ठिकाणी आम्हीच ‘डमी अर्ज’ दाखल करण्यास सांगितले आहे,” असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह महायुतीचे नेते नाराजांची समजूत काढतील, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. मतदार नोंदणीसाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली असून, पुण्यासह नागपूर आणि अमरावतीतील जागांवरही महायुतीचे नेते व कार्यकर्ते उमेदवारांच्या विजयासाठी एकत्रितपणे काम करतील, असे त्यांनी सांगितले.

‘रोजगार, स्टार्टअप आणि कौशल्य विकासावर भर’

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर डॉ. स्मिता योगेश जाधव यांनी गेल्या वीस वर्षांतील शिक्षण क्षेत्रातील अनुभवाचा उपयोग पदवीधर, तरुण आणि नवउद्योजकांसाठी करण्याचा निर्धार व्यक्त केला.“रोजगार, स्टार्टअप, इन्क्युबेशन सेंटर आणि कौशल्य विकासावर भर देणार आहे. पदवीधर मतदारांचे प्रश्न सोडविण्यासाठी पाचही जिल्ह्यांच्या गरजांनुसार नियोजन केले जाईल. रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी काम करणार आहे,” असे जाधव यांनी सांगितले.

शिक्षकांच्या प्रश्नांना विधानभवनात आवाज देणार

शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी शिक्षकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले. जुनी पेन्शन, टीईटी सक्ती, अशैक्षणिक कामांचा वाढता बोजा आणि संचमान्यतेच्या निकषांमुळे अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.“मी स्वतः शिक्षक असल्याने शिक्षकांच्या प्रश्नांची प्रत्यक्ष जाण आहे. हे प्रश्न विधानभवनात मांडून शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करणार आहे. मतदारसंघातील सर्व घटकांना सोबत घेऊन निवडणूक लढविणार आहे,” असे गावडे यांनी सांगितले.

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीने अधिकृत उमेदवारांच्या माध्यमातून मैदानात उतरताना संघटनात्मक ताकद पणाला लावण्याची तयारी सुरू केली असून, इच्छुकांची नाराजी दूर करून मतांचे एकत्रीकरण करण्याचे आव्हान आता महायुतीसमोर असणार आहे.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: