Maharastra Bandh: पुण्याच्या मार्केट यार्ड मध्ये शुकशुकाट : उपनगरात दुकाने उघडी

HomeBreaking Newsपुणे

Maharastra Bandh: पुण्याच्या मार्केट यार्ड मध्ये शुकशुकाट : उपनगरात दुकाने उघडी

Ganesh Kumar Mule Oct 11, 2021 5:28 AM

Kasba peth byelection | कसबा पेठ मतदारसंघात निवडणूक यंत्रणा सज्ज
Ota Market : PMC : शेतकरी समूह गट आणि हंगामी व्यवसायिकांना होणार ओटा मार्केटचा फायदा : महापालिकेचे धोरण तयार 
Ram Navami 2024 In Dubai | सातासमुद्रा पार दुबईत राम नामाचा गजर आणि जयघोष!

पुण्याच्या मार्केट यार्ड मध्ये शुकशुकाट

: व्यापाऱ्यांचा महाराष्ट्र बंद ला प्रतिसाद

पुणे : उत्तर प्रदेशातील लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ राज्यातील महाविकास आघाडी आणि मित्र पक्षांनी एकत्र येत महाराष्ट्र बंद चे आज आयोजन केले आहे. त्याला पुण्यात प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. एरवी पाय ठेवायला देखील जागा नसलेला पुण्याचा मार्केट यार्ड परिसर आज कडकडीत बंद होता. तुरळक फुलवाले सोडले तर आसपास कुणीही दिसत नव्हते.

उपनगरांमध्ये दुकाने उघडी

शहरातील राजकीय पक्षांनी शांतपणे बंद पाळण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार भाजप आणि मनसे सोडले तर जवळपास सर्वच पक्ष या महाराष्ट्र बंद मध्ये सामील झाले आहेत. व्यापाऱ्यांनी देखील याला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे पुण्यात बंद ला चांगला प्रतिसाद मिळताना दिसला. दरम्यान पुण्यातला नेहमी गजबजलेला असा मार्केट यार्ड परिसर आज पूर्णपणे बंद दिसत होता. नेहमी यार्डात पहाटेपासून गर्दी पाहायला मिळत असते. आज मात्र इथे शुकशुकाट दिसत होता. असे असले तरी उपनगरामध्ये मात्र दुकाने उघडी असलेली पाहायला मिळाली. व्यापाऱ्यांनी जरी 9 ते 3 बंद पाळण्याचे सांगणार असले तरी उपनगरात त्याला प्रतिसाद दिसला नाही. दुकानात नेहमीप्रमाणे लोकांची गर्दी दिसत होती.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0