Mukhyamantri Ladki Bahin Yoajana | लाडकी बहिण योजनेतून महिलांना आर्थिक गंडा | माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांची पुणे पोलिस आयुक्तांकडे तक्रार

HomeBreaking Newsपुणे

Mukhyamantri Ladki Bahin Yoajana | लाडकी बहिण योजनेतून महिलांना आर्थिक गंडा | माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांची पुणे पोलिस आयुक्तांकडे तक्रार

गणेश मुळे Jul 19, 2024 4:51 PM

Voter List Mistakes |मतदार यादीमधील चुका दुरुस्त करा | माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Pune City Traffic Update | सह्याद्री लेन ते बदामी चौक दरम्यानची जड वाहतूक बंद होणार
Pune Balsnehi Chowk |प्रभाग २ मधील बालस्नेही चौकाचे लोकार्पण | माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा यशस्वी पाठपुरावा

Mukhyamantri Ladki Bahin Yoajana | लाडकी बहिण योजनेतून महिलांना आर्थिक गंडा | माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांची पुणे पोलिस आयुक्तांकडे तक्रार

| मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी लक्ष देण्याची केली मागणी

 

Dr Siddharth Dhende – (The Karbhari News Service) – लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा करायचे आहे असे सांगून अंगणवाडी सेविकेच्या नावाने फोन केला जातो. त्यानंतर महिलांच्या बँकेची माहिती घेऊन ओटीपी घेतला जातो. त्यामधून आर्थिक गंडा घातला जात आहे. पुणे महापालिकेच्या प्रभाग दोन मध्ये हे प्रकार घडले आहेत. त्याबाबत पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे तक्रार केली आहे. चोरट्यांवर त्वरित गुण्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी यामध्ये लक्ष घालून अशा फसवणुकीपासून लांब राहण्याचे आवाहन करण्याची मागणी डॉ. धेंडे यांनी केली.

डॉ. धेंडे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरू केली आहे. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने तसेच ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा दिली आहे. ऑफलाइन पद्धतीचे अर्ज अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत जमा करून घेतले जात आहे. या सगळ्या प्रक्रियेसाठी कोणत्याही प्रकारचे आर्थिक शुल्क आकारले जात नाही. असे असताना या योजनेच्या नावाखाली सर्वसामान्य कुटुंबातील महिलांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

अंगणवाडी सेविका बोलते असे सांगून महिलांना फोन केला जात आहे. मुख्यमंत्री लाडकी बहन योजनेचे पाच हजार रुपये तुमच्या बँकेत जमा करायचे असल्याचे सांगण्यात येते. त्यासाठी आधी तुमच्या बँकेत किमान पाच हजार रुपये ठेवण्याची सूचना दिली जात आहे. त्यानंतर बँकेची सर्व माहिती घेऊन ओटीपी पाठवला जात आहे. हा ओटीपी नंबर विचारून बँकेमधील सर्व रक्कम काढून घेतली जात आहे. पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक दोन मध्ये अनेक महिलांची आर्थिक फसवणूक झाली आहे. याबाबत योग्य खबरदारी घेऊन त्वरित गुन्हे दाखल करावे, असे पत्र डॉ. धेंडे यांनी पोलीस आयुक्तांना दिले आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी त्वरित प्रसिद्धी पत्र जाहीर करावे. त्यामध्ये कोणत्याही भूलथापांना बळी न पडता आर्थिक व्यवहार करू नयेत, अशी जनजागृती करण्याची मागणी डॉ. धेंडे यांनी केली आहे.

 

 डॉ. धेंडे यांची तत्परता…

पुणे महापालिका प्रभाग क्रमांक दोन मधील महिलांची आर्थिक फसवणूक झाल्याचे समजताच डॉ. धेंडे यांनी फसवणूक झालेल्या महिलांची भेट घेतली. संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. या घटनेची माहिती पोलीस आयुक्तांना देऊन तक्रार दाखल केली. तसेच महिलांनी अशा फसवणुकीला बळी पडू नये, असे आवाहन करत डॉ. धेंडे यांनी जनजागृती केली.


अंगणवाडी सेविकांच्या नावाने फोन येतो. महिलांची बँकेची माहिती घेऊन ओटीपी मागवला जातो. त्यामधून बँकेमधील सर्व पैसे काढून घेतले जातात. याबाबत पोलिस आयुक्तांच्या हे निदर्शनास आणून दिले आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री अजित पवार यांनी त्वरित बाबत जनजागृती करण्याची मागणी केली आहे.

डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, पुणे महापालिका.