PMC Social Devlopment Department | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी पुणे महापालिकेचा पुढाकार
Mukhyamantri Majhi Ladki Bahin – (The Karbhari News Service) – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणेकरीता पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) १५ क्षेत्रीय कार्यालय (PMC Ward Office) स्तरावर १९३ केंद्र सुरु करणेत आलेली आहेत. सेंटरच्या ठिकाणी महिलांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार आहेत. अशी माहिती समाज विकास विभागाचे उपायुक्त नितीन उदास (Nitin Udas PMC) यांनी दिली. (Pune PMC News)
राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करणेसाठी आणि कुटुंबासाठी त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करणेसाठी महाराष्ट्र राज्यात “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण” योजना राबविणेत येत आहे. महापालिका अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ.) पृथ्वीराज बी. पी. यांनी आज स्वारगेट येथील आरोग्य कोठीच्या सेंटर च्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देवून या संदर्भात पाहणी केली. प्रसंगी जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी मोनिका रंधवे व मनीषा बिरारीस ह्याही उपस्थित होत्या.
तसेच आज समाज विकास विभागाच्या सर्व समुहसंघटिकांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. यावेळी महिला व बाल कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी समुहसंघटिकांना प्रशिक्षण दिले.
“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण” योजनेचा अर्ज भरण्यासाठी बालवाडी सेविका/अंगणवाडी सेविका, NULM यांचे समुह संघटक (CRP), मदत कक्ष प्रमुख, CMM (City Mission Manager), आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आंगणवाडी पर्यवेक्षिका व आपले सरकार सेवा केंद्र यांना प्राधिकृत केले असून त्यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर, एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन अप/पोर्टलवर प्रति यशस्वी पात्र लाभार्थ्यांची नोंद झाल्यावर ५० रु- याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे.