PMC Deputy Commissioner | पुणे महापालिकेच्या 7 उपायुक्तांना रात्री 8 ते सकाळी 8 पर्यंत ड्युटी | 11 जुलै पर्यंत करावे लागणार काम 

HomeपुणेBreaking News

PMC Deputy Commissioner | पुणे महापालिकेच्या 7 उपायुक्तांना रात्री 8 ते सकाळी 8 पर्यंत ड्युटी | 11 जुलै पर्यंत करावे लागणार काम 

गणेश मुळे Jun 15, 2024 1:38 PM

Murlidhar Mohol on Pune Potholes | क्षेत्रीय कार्यालय स्तरावर ३० टीम तयार करून शहरातील खड्डे लवकरात लवकर बुजवा  | केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे महापालिकेला निर्देश
Pune PMC Canteen | महापालिका कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार हक्काचे उपहार गृह! | पीएमसी एम्प्लॉईज युनियन च्या मागणीला यश | सेवकांसाठी असणाऱ्या उपहारगृहास आयुक्तांची मान्यता 
Pune Development Projects | पुण्यातील विकासप्रकल्पांना गती देण्याचे भाजपचे मंत्री मोहोळ आणि पाटील यांचे महापालिका प्रशासनाला निर्देश! 

PMC Deputy Commissioner | पुणे महापालिकेच्या 7 उपायुक्तांना रात्री 8 ते सकाळी 8 पर्यंत ड्युटी | 11 जुलै पर्यंत करावे लागणार काम

| महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांचे आदेश

PMC Deputy Commissioner Duty – (The Karbhari News Service) – पावसाळ्यात उद्भवणाऱ्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि नागरिकांना मदत करण्यासाठी आता उपायुक्तांना सतर्क राहावे लागणार आहे. त्यासाठी उपायुक्तांना रात्रीची ड्युटी करावी लागणार आहे.  पुणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात 7  “उप आयुक्त” यांना रात्री 8 ते सकाळी 8 असे 11 जुलै पर्यंत काम करावे लागणार आहे. महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले  (Dr Rajendra Bhosale IAS) यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation (PMC)
पुणे शहरात पावसाळयादरम्यान अतिवृष्टी तसेच कमी कालावधीत जास्त पाउस झाल्याने रस्त्यावर पाणी साचणे, पाण्याचा निचरा लवकर न होणे, रहिवासी संकुलामध्ये पाणी शिरणे, वृक्ष उन्मळून पडणे, वृक्षांच्या फांद्या तुटणे इत्यादी परिस्थिती उदभवते. अशाप्रसंगी महानगरपालिकेच्या मलनिस्सारण विभाग, पथ विभाग, उद्यान विभाग, अग्निशमन विभाग, क्षेत्रिय कार्यालये इत्यादी विविध घटक अग्निशमन व मदत कार्यासाठी कार्यरत असतात. (Pune PMC News)
महानगरपालिकेच्या मध्यवर्ती नियंत्रण कक्षात नागरिकांकडून उदभवलेल्या परीस्थितीच्या अनुषंगाने माहिती प्राप्त होत असते. प्राप्त माहितीच्या अनुषंगाने तातडीने महानगरपालिकेच्या विविध विभागांना माहिती देऊन व समन्वय साधून मदत व बचावकार्य तातडीने करणे आवश्यक असते. प्रसंगानुरूप जिल्हाधिकारी कार्यालय, पाटबंधारे विभाग, म.रा.वि.वि.क.लि. इत्यादी विभागांशी समन्वय साधणे आवश्यक ठरते. यासाठी महानगरपालिकेच्या मध्यवर्ती नियंत्रण कक्षात वरिष्ठ अधिकारी विशेषत रात्रीच्या कालावधीत उपस्थित असणे आवश्यक आहे.

| या उपायुक्त यांच्या करण्यात आल्या आहेत नियुक्त्या

1.   राजू नंदकर – सोमवार
2.  माधव जगताप – मंगळवार
3. संदीप कदम – बुधवार
4. नितीन उदास – गुरुवार
5. युनुस पठाण – शुक्रवार
6. राहुल जगताप – शनिवार
7. विजय लांडगे – रविवार

 उप आयुक्त यांनी नियंत्रण कक्षात हे करायचे आहे काम

१. आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षातील अधिकारी यांनी क्षेत्रिय स्तरावरील आपत्ती नियंत्रण कक्षाशी संपर्क ठेऊन तेथील कामकाजावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. नियंत्रण कक्षाच्या कामकाजाबाबत माहिती घेण्याबाबत क्षेत्रिय कार्यालयातील नियंत्रण कक्षास आकस्मिक कॉल द्वारे माहिती घेऊन नियंत्रण कामकाज सुरळीत असल्याबाबत खात्री करावी.
२.आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षातील नोंदवहीमध्ये आपत्ती व्यवस्थापनाबाबतचे येणारे कॉल स्वीकारून तक्रारीचे निरसन संबंधित विभागाशी समन्वय ठेऊन करावे.
३.जिल्हाधिकारी कार्यालय, पाटबंधारे विभाग, हवामान खाते व पोलीस नियंत्रण कक्ष यांच्याशी समन्वय ठेवावा. तसेच आवश्यकता भासल्यास विभागीय नियंत्रण कक्ष व राज्य नियंत्रण कक्ष, मंत्रालय मुंबई यांचेशी समन्यव व माहिती द्यावी.
४.आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षातील अॅक्शन प्लॅन मधील नमूद माहितीनुसार पूर नियंत्रण बाबतचे कार्यवाही करावी.
५.आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षातील टीव्हीवरील बातम्यांचा आढावा घेऊन संबंधित क्षेत्रिय स्तरावरील घटनांची नोंद घेऊन तात्काळ क्षेत्रिय कार्यालय व संबंधित खात्यांना सूचना देऊन पुढील आवश्यक कार्यवाही करावी.
६. नियंत्रण कक्षातील सर्व घटनांची नोंद घेऊन त्याप्रमाणे नोंदवही जतन करावी.
७.आपत्ती व्यवस्थापन कक्षात नियुक्तीस असताना शहरात घडणाऱ्या आपत्ती व्यवस्थापनाचे दृष्टीने महत्वाच्या घटनांबाबत महापालिका आयुक्त,  अति. महापालिका आयुक्त (ज/वि/इ) यांना तात्काळ अवगत करावे.
८.आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे प्रकरण दहा नियम (५१) ते नियम (६०) नुसार नियंत्रण कक्षात कामकाज करणे आवश्यक आहे.