Congress on Operation Sindoor | ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय जवानांनी केलेल्या शौर्याला सलाम करण्यासाठी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने तिरंगा रॅली

Homeadministrative

Congress on Operation Sindoor | ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय जवानांनी केलेल्या शौर्याला सलाम करण्यासाठी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने तिरंगा रॅली

Ganesh Kumar Mule May 21, 2025 8:51 PM

PMC Road Department | पथ विभागाकडे रुजू झालेल्या नवीन अभियंत्यांना रस्ता आणि प्रशासकीय कामकाजाबाबत प्रशिक्षण | पथ विभागाचा उपक्रम
Pune PMC News | उपायुक्त महेश पाटील यांची बदली | महापालिका सेवेतून करण्यात आले कार्यमुक्त 
Health Camp | PMC pune | पुणे मनपाच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी कॅन्सर तपासणी शिबीर | आरोग्य विभागाचा उपक्रम

Congress on Operation Sindoor | ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय जवानांनी केलेल्या शौर्याला सलाम करण्यासाठी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने तिरंगा रॅली

 

Pune Congress – (The Karbhari News Service) – ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय सेनेच्या सन्मानार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व महाराष्ट्र राज्याचे सहप्रभारी मा. बी. एम. संदिप यांच्या प्रमुख उपस्थितीत आज काँग्रेस भवन ते लोकमान्य टिळक पुतळा, मंडई, पुणे पर्यंत ‘‘तिरंगा यात्रा’’ आयोजित करण्यात आली होती. सदर रॅलीमध्ये पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळी, पदाधिकारी व कार्यकर्ते त्याचबरोबर नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (Pune News)

भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीवजी गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त आज काँग्रेस भवन येथे त्यांच्या प्रतिमेस महाराष्ट्र राज्याचे सहप्रभारी मा. बी. एम. संदिप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आहे. यानंतर सर्व धर्मिय प्रार्थना करून ‘‘तिरंगा यात्रा’’ सुरू करण्यात आली. सदर यात्रेत ‘‘याद करो कुर्बानी’’, ‘जय हिंद’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देण्यात आल्या.

यात्रेचा समारोप लोकमान्य टिळक पुतळा, मंडई येथे सभा घेवून करण्यात आला. यावेळी मा. बी. एम. संदिप म्हणाले की, ‘‘या मोहिमेच्या माध्यमातून भारताने आपले लष्करी सामर्थ्य संपूर्ण जगाला दाखवले आहे. विशेष म्हणजे भारताच्या या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे आर्थिक तसेच सामरिक नुकसान झाले आहे. दरम्यान, ऑपरेशन सिंदूर राबवताना भारताच्या तिन्ही दलाने आपले शौर्य दाखवले.

ऑपरेशन सिंदूरचे दैदिप्यमान यश हे भारतीय सैन्य दलाचे असून संपूर्ण देशाला या पराक्रामचा अभिमान आहे परंतु भारतीय जनता पक्षाचे काही वाचाळवीर जाणीवपूर्वक भारतीय सैन्यदलाचा अपमान करणारी विधाने करत आहेत. भाजपा मंत्री विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्या बद्दल केलेले विधान चीड आणणारे होते, देशभरातून यावर संताप व्यक्त केला जात असतानाच आता भाजपाच्या दुसऱ्या नेत्याने वायफळ बडबड केली आहे. “संपूर्ण देश, देशाचे सैन्य आणि सैनिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चरणी नतमस्तक आहेत.” असे निर्लज्जपणाचे विधान केले आहे. हे विधान भारतीय सैन्य दलाचे शौर्य, संस्कृती व परंपरेचा घोर अपमान करणारे आहे. भाजपाचे नेते बेताल विधाने करत असताना -नरेंद्र मोदी, अमित शाह व जे. पी. नड्डा गप्प का आहेत? भाजपा हा निर्ढावलेला व मस्तीखोर पक्ष आहे, पण जनता हा अपमान सहन करणार नाही. काँग्रेस पक्ष हा लोकशाहीचा आदर करतो. भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानला पराभूत केले आणि चांगलाच धडा शिकवला. या हवाई हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवाद्यांना ठार मारून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. त्याबद्दल संपूर्ण देशाला भारतीय सैन्याचा अभिमान आहे.’’

यानंतर शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनीही आपल्या भाषणातून भारतीय जवानांच्या शौर्याला सलाम करताना त्यांचे कौतुक केले.

यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासमवेत, महाराष्ट्राचे प्रभारी बी. एम. संदिप, माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, मोहन जोशी, दिप्ती चवधरी, अनंत गाडगीळ, वीरेंद्र किराड, अमीर शेख, गोपाळ मिवारी, नगरसेवक लता राजगुरू, अजित दरेकर, रफिक शेख, वैशाली मराठे, सुजाता शेट्टी, मेहबुब नदाफ, नीता रजपूत, प्राची दुधाने, अर्चना शहा, वीरेंद्र किराड, सुनिल मलके, प्रकाश पवार, सुरेश नांगरे, सौरभ अमराळे, चेतन आगरवाल, वाल्मिक जगताप, समिर शेख, बाळासाहेब अमराळे, राज अंबिके, विनोद रणपिसे, अभिजीत महामुनी, ब्लॉक अध्यक्ष सुजित यादव, हेमंत राजभोज, राजू ठोंबरे, रमेश सोनकांबळे, रविंद्र माझीरे, अक्षय माने, विशाल जाधव, अजित जाधव, रमेश सकट, दिलीप तुपे, प्रदिप परदेशी, संदिप मोकाटे, भुषण रानभरे, राजेंद्र शिरसाट, कविराज संघेलिका, प्रियंका रणपिसे, सीमा सावंत, अनिता धिमधिमे, स्वाती शिंदे, सुंदर ओव्‍हाळ, कांचन बालनायक, माया डुरे, ॲन्थोनी जेकब, अरूण वाघमारे, सेल्वराज ॲन्थोनी, अकबर शेख, ॲड. नंदलाल धिवार, हर्षद हांडे आदींसह असंख्य काँग्रेसजण सदर यात्रेत सहभागी झाले होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: