Sunetra Ajit Pawar | खासदार पदी निवडीबद्द्ल सुनेत्रा पवार यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी च्या वतीने सत्कार

HomeBreaking Newsपुणे

Sunetra Ajit Pawar | खासदार पदी निवडीबद्द्ल सुनेत्रा पवार यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी च्या वतीने सत्कार

गणेश मुळे Jun 14, 2024 3:50 PM

PMC is positive about providing homes to transgender employees!
Pune Mahanagarpalika Bharti Exam 2023 | पुणे महापालिका भरती परीक्षा | उद्या ५ शहरात होणार परीक्षा 
Koregaon Park EVM Godam | Suhas Diwase IAS | जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी कोरेगाव पार्क येथील ईव्हीएम सुरक्षिततेचा घेतला आढावा

Sunetra Ajit Pawar | खासदार पदी निवडीबद्द्ल सुनेत्रा पवार यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी च्या वतीने सत्कार

 

Sunetra Ajit Pawar – (The Karbhari News Service) – सुनेत्रा अजितदादा पवार यांची राज्यसभेत खासदार पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे  सुनेत्रा पवार यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. (Sunetra Ajit Pawar Rajya Sabha MP NCP)

यावेळी केसरी वाड्यातील मानाच्या गणपतीला आणि टिळकांच्या पुतळ्याला अभिवादन करून , ढोलताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिशबाजीत व जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच महिलांनी औक्षण करून असंख्य कार्यकर्त्यांच्या गर्दीत त्यांचे व्यासपिठावर जल्लोशात स्वागत करण्यात आले.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सौ सुनेत्रा यांचा पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे भव्य सत्कार देखील करण्यात आला

पुणे शहराध्यक्ष दिपक मानकर व कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांची भाषणे झाली. सदर प्रंसंगी भाजपा शहराघ्यक्ष धिरज धाटे , शिवसेना शहराघ्यक्ष प्रमोद भानगिरे , रिपाई चे मंदार जोशी , बाळासाहेब बोडके , बाबा धुमाळ, सनी मानकर ,जयदेव इसवे, रामदास गाडे, करीमलाला शेख , अतुल जाघव , संगीता बराटे , गैरी जाघव , स्वाती गायकवाड व शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.