PMC Building Devlopment Department | कोथरूड परिसरात पुणे महापालिकेकडून हॉटेल्स वर कारवाई | १०३४९ चौ.फूट अनधिकृत बांधकाम हटवले 

HomeपुणेBreaking News

PMC Building Devlopment Department | कोथरूड परिसरात पुणे महापालिकेकडून हॉटेल्स वर कारवाई | १०३४९ चौ.फूट अनधिकृत बांधकाम हटवले 

गणेश मुळे May 27, 2024 4:18 PM

Rahul Solapurkar | राहुल सोलापूरकर विरोधात शिवसेना आक्रमक | नाक घासून छत्रपतींची माफी मागितली पाहिजे अन्यथा कडेलोट करू – संजय मोरे 
Pune News | पुणे शहरातील अतिक्रमण, उत्खनन प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश | महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर
Road Maintainance | राज्यातील रस्त्यांच्या वार्षिक देखभाल-दुरुस्ती कामांसाठी १२९६.०५ कोटींच्या निधीस मान्यता

PMC Building Devlopment Department | कोथरूड परिसरात पुणे महापालिकेकडून हॉटेल्स वर कारवाई | १०३४९ चौ.फूट अनधिकृत बांधकाम हटवले

 

PMC Building Devlopment Department – (The Karbhari News Service) – कोथरूड परिसरात रूफ टॉप हॉटेल ,पत्राशेड व अनधिकृत बांधकाम यावर पुणे महापालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन ६ यांचेमार्फत पोलीस स्टाफच्या मदतीने धडक कारवाई करण्यात आली. (Pune Municipal Corporation (PMC)

या कारवाई मधे सुमारे १०३४९ चौ.फूट क्षेत्र निष्कासित करण्यात आले आहे.  हॉटेल नक्षत्र रेस्टो बार, स्पाइस गार्डन,कोरियडेर लिफ रेस्टोरंट,हॉटेल टेस्टी बेस्टी, या हॉटेल्स वर ही कारवाई करण्यात आली. (Pune PMC News)

ही कारवाई पुणे महानगरपालिकेचे बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता – राजेश बनकर, बांधकाम विभाग झोन क्र.६ चे कार्यकारी अभियंता  बिपीन शिंदे  यांचे मार्गदर्शनाखाली उप अभियंता  श्रीकांत गायकवाड, कनिष्ठ अभियंता  मनोजकुमार मते, सागर शिंदे,राहुल रसाळे, समीर गडाई व सहाय्यक गणेश ठोंबरे, राठोड, हृषीकेश जगदाळे,भावेश इत्यादी स्टाफ, सहा पोलिस यांच्या पथकाने एक जेसीबी, दोन गॅस कटर, एक ब्रेकर दहा अतिक्रमण कर्मचारी यांचे सहाय्याने कारवाई केली.