Navale Bridge Service Road | ब्ल्यूम फिल्ड ते भूमकर चौक दरम्यान 6 मी रुंदीचा सर्व्हिस रस्ता विकसित होणार!

HomeBreaking Newsपुणे

Navale Bridge Service Road | ब्ल्यूम फिल्ड ते भूमकर चौक दरम्यान 6 मी रुंदीचा सर्व्हिस रस्ता विकसित होणार!

गणेश मुळे May 23, 2024 6:55 AM

Swaminarayan Temple to Ravet DPR |  स्वामीनारायण मंदिर ते रावेत इलेव्हेटेड हायवेसाठी चार हजार कोटींचा डीपीआर तयार
Chandni Chowk bridge | चांदणी चौक पूल पाडण्याच्यावेळी मुंबई-बंगळुरू महामार्गावरील पुणे शहरातील वाहतूक बंद रहाणार
Accident | स्वामी नारायण मंदिरा अपघात | अपघाताची कारणे शोधण्यासाठी चौकशी समिती गठित

Navale Bridge Service Road | ब्ल्यूम फिल्ड ते भूमकर चौक दरम्यान 6 मी रुंदीचा सर्व्हिस रस्ता विकसित होणार!

| नवले पुलावरील अपघात टाळण्यास मदत होणार

Navale Bridge Service Road – (The Karbhari News Service) – ब्ल्यूम फिल्ड ते भूमकर चौक दरम्यान 6 मी रुंदीचा सर्व्हिस रस्ता विकसित केला जाणार आहे. 220 मीटर लांबीचा हा रस्ता झाला तर नवले पुलावर (Navale bridge Pune) आणि आसपासच्या परिसरात होणारे अपघात आणि रहदारी कमी होण्याची शक्यता आहे. त्यानुसार या रस्त्याची आखणी करण्याबाबतचा प्रस्ताव शहर अभियंता कार्यालयाकडून (PMC City Engineer Office) शहर सुधारणा समिती (PMC City Improvement Committee) समोर ठेवण्यात आला आहे. (Pune Municipal Corporation (PMC)
शहर सुधारणा समितीत ठेवलेल्या प्रस्तावानुसार  वडगाव, नवलेपूल त दरीपूल दरम्यान राष्ट्रीय हमरस्ता विकसीत झालेला आहे. या रस्त्याची एकुण रूंदी ८० मी. असुन, प्रत्यक्षात जागेवर ३० मी. प्रमाणे विकसीत झालेला आहे. रस्त्याच्या उजव्या बाजुस सर्व्हिस रस्ता विकसित आहे. मात्र रस्त्याच्या डाव्या बाजुस ब्ल्यूम फिल्ड ते भूमकर चौक दरम्यान सर्व्हिस रस्ता रस्ता विकसित नाही. या भागामध्ये राष्ट्रिय हमरस्त्याच्या आखणीमध्येच अस्तित्वातील नाला असल्याने नाल्यावर रस्ता विकसीत करता येत नाही. मात्र नाला सोडून राष्ट्रीय हमरस्त्याची २.३ मी. जागा शिल्लक आहे. त्यामध्ये रस्ता विकसितहोऊ शकत नाही. (Pune PMC News)
या भागात राष्ट्रीय हमरस्त्यावर मोठया प्रमाणात अपघात होत असल्याने तेथे सर्व्हिस रस्ता विकसीत करणेची मागणी मोठया प्रमाणात करण्यात आलेली आहे.  याबाबत वेळोवेळी जिल्हाधिकारी, पुणे तत्कालीन महापौर, पुणे महानगरपालिका व पोलीस आयुक्त यांचे समवेत पुणे महानगरपालिका व राष्ट्रिय महामार्ग विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त बैठकीत चर्चा झालेली आहे. या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून रस्त्याच्या आखणीत असलेली स्मशानभूमी हलविण्याची व सर्व्हस रस्त्याकरीता लगतच्या प्लॉट धारकाकडून जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आलेली आहे.
ज्या ठिकाणी नाल्यामुळे सर्व्हिस रस्त्याकरीता पुरेशी रूंदी मिळत नाही अशा भागात लगतच्या इमारतीच्या सामासिक अंतरातुन रस्त्याकरीता जागा ताब्यात मिळाल्यास ब्ल्यूम फिल्ड ते भूमकर चौक दरम्यान सर्व्हींस रस्ता विकसीत होऊन राष्ट्रीय हमरस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होईल. जागा ताब्यात घेण्यासाठी या ठिकाणी राष्ट्रीय हमरस्त्याची जागा सोडून कलम २०५ अन्वये रस्ता आखावा लागणार आहे. त्याप्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.
त्या अनुषंगाने टोटल स्टेशन केलेला असुन, त्यामध्ये अस्तित्वातील नाला, राष्ट्रीय महामार्गाची रूंदीकरणाची आखणी सर्व्हींस रस्त्याअंतर्गत येत असलेली अस्तित्वातील स्मशानभूमी दर्शविलेली आहे. याच टोटल स्टेशनमध्ये आंबेगाव बु. व स. नं. ४ येथील नियोजित रस्त्याची आखणी दर्शविण्यात आलेली आहे.  कलम २०५ च्या कमिटी बैठकीमध्ये विषयांकीत. रस्ता आखणी करणेबाबत मान्यता मिळालेली आहे. तरी नवले पूल ते दरी पूल या दरम्यानच्या राष्ट्रीय हमरस्त्यालगत सर्व्हिस रस्त्याकरीता आंबेगाव बु. स.नं.४ येथील महाराष्ट्र प्रांतिक अधिनियम १९४९ चे कलम २०५ अंतर्गत २२०.०मी. लांब व ६.०मी. रूंदीच्या रस्त्याची आखणी केली जाणार आहे.