Pune Shivsena UBT | पब संस्कृती विरोधात शिवसेनेचा (UBT) एल्गार

HomeपुणेBreaking News

Pune Shivsena UBT | पब संस्कृती विरोधात शिवसेनेचा (UBT) एल्गार

गणेश मुळे May 20, 2024 3:35 PM

Sunil Shinde | माथाडी कायदा बदलायला निघालेल्या महायुतीला धडा शिकवा : कामगार नेते सुनील शिंदे
Marathi Din | 1 ऑगस्ट मराठी दिन साजरा करावा म्हणून  सरकार सोबत भांडत आहोत |  श्रीमंत कोकाटे
Pune Congress | काँग्रेसच्या इच्छुकांचे जोरदार शक्तिप्रदर्शन! | ४१ उमेदवारांनी दिल्या मुलाखती | शिवाजीनगर मधून १२ तर कोथरुड मधून केवळ एकच इच्छुक

Pune Shivsena UBT | पब संस्कृती विरोधात शिवसेनेचा (UBT) एल्गार

 

Pune Pub and Bar – (The Karbhari News Service) – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुणे पक्षाच्या वतीने आज पुणे पोलिस आयुक्त यांची भेट घेऊन पब बार ड्रग्ज विषयात निवेदन देण्यात आले.

पुणे हे विद्येचे माहेर घर की पब संस्कृतीचे? हा प्रश्न दिवसेंदिवस आता पुणेकरांना पडत आहे.  पुणे शहरातील कोरेगाव पार्क, कल्याणी नगर, ताडिवाला रोड, बाणेर, बालेवाडी भागात पब, डिस्कोबार, यांचा सुळसुळाट झाला आहे. पोलिस प्रशासनाच्या आशीर्वादाने मध्यरात्री पर्यंत हे पब बार सुरु असतात. यामध्ये येणारा वर्ग पाहता यात अल्पवयीन मुले-मुली, विद्यार्थी, तरुण तरुणी, व्यावसायिक, यांची रेलचेल दिसते. अल्पवयीन मुलांना सर्रासपणे दारु विक्री केली जात आहे. यातूनच गुन्हेगारी, बलात्कार, छेडछाडीच्या घटना घडत असतात. कायद्याचे इथे सर्रास पणे उल्लंघन चालू असून रात्रभर चालणाऱ्या ह्या बार पब मुळे स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे, यातूनच परवा दारूच्या नशेतील वेदांत अगरवाल या युवकाच्या हातून २ निष्पाप लोकांचा बळी गेला आहे, या आधीही अश्या अनेक घटना घडल्या आहेत. तसेच पुण्यात ड्रग्ज चे प्रमाणही वाढले असून या पब संस्कृती मधे याचा सर्रास पणे वापर होत आहे. त्यामुळे देशातील तरुणाई नशेकडे झुकत चालली आहे आपण तत्पर या सर्व रात्रभर चालणाऱ्या पब, बार, हुक्कापार्लर वर कारवाई करावी अन्यथा शिवसेनेला या विषयात आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल असे शिवसेनेच्या वतीने निवेदन देऊन कळविण्यात आले.

यावेळी पोलिस आयुक्तांनी शिष्टमंडळाला सहकार्याची भूमिका घेत यापुढे शहरात कडक कारवाईचे धोरण अवलंबिले जाईल असे आश्वासन दिले पण रात्री १.३० पर्यंत वेळेचं निर्बंध हा विषय राज्यशासनाने लागू केल्यामुळे त्यात आम्ही काही करू शकत नाही असेही कळविले .
शहर शिवसेनेच्या वतीने यावेळी राज्यशासनाकडे सदर विषयात कडक धोरण अंबालाबाजावणीसाठी पाठपुरावा करू असे सांगण्यात आले.
यावेळी शहरप्रमुख संजय मोरे , गजानन थरकुडे , उपशहरप्रमुख आनंद गोयल, उमेश वाघ, विभागप्रमुख राजेश मोरे, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, नाना वाळके, उपस्थित होते .