Pune Metro | PM Modi Pune Tour | पुणे मेट्रोच्या फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट व गरवारे ते रुबी हॉल या मार्गावर मेट्रो सेवेचा शुभारंभ

HomeBreaking Newsपुणे

Pune Metro | PM Modi Pune Tour | पुणे मेट्रोच्या फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट व गरवारे ते रुबी हॉल या मार्गावर मेट्रो सेवेचा शुभारंभ

Ganesh Kumar Mule Jul 31, 2023 2:01 PM

Chitale Bandhu Mithaiwale | सातत्यपूर्ण प्रयत्न आणि ग्राहकांचा विश्वास हीच यशस्वी उद्योगाची सूत्रे  | संजय चितळे
Pune | Canal Advisory committee | शनिवारी कालवा सल्लागार समितीची बैठक! | पाणी नियोजनाबाबत होणार चर्चा
Mahavikas Aghadi | Sinet Election | विद्यापीठाची परीक्षा पद्धती अधिकाधिक पारदर्शक करणार | अजित पवार

Pune Metro | PM Modi Pune Tour | पुणे मेट्रोच्या फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट व गरवारे ते रुबी हॉल या मार्गावर मेट्रो सेवेचा शुभारंभ

Pune Metro | PM Modi Pune Tour |पुणे मेट्रोची (Pune Metro) पीसीएमसी ते फुगेवाडी व वनाझ ते गरवारे या मार्गिकेवर मागील वर्षी उदघाटन झाले.  उद्या पंतप्रधान (PM Naredra Modi) यांच्या हस्ते या दोन्ही मार्गिकांचा विस्तार केला जात आहे. या विस्तारित मार्गांमध्ये फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट आणि रुबी हॉल ते गरवारे या मार्गांचे लोकार्पण पंतप्रधान  नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या शुभहस्ते होत आहे. (Pune Metro | PM Modi Pune Tour)

या नवीन मार्गाच्या लोकार्पणामुळे पीसीएमसी ते सिव्हिलकोर्ट आणि वनाझ ते रुबी हॉल या मार्गांवर प्रवास करणे शक्य होणार आहे. मेट्रोचे न्यूनतम भाडे १० रुपये असून अधिकतम भाडे ३५ रुपये असणार आहे. पीसीएमसी ते वनाझ असा प्रवास करण्यासाठी ४० मिनिटे लागणार आहेत आणि त्यासाठी ३५ रुपये भाडे लागेल तसेच पीसीएमसी ते रुबी हॉल यासाठी ३० रुपये भाडे असेल. वनाझ ते रुबी हॉल यासाठी ३५ रुपये भाडे असेल.
विद्यार्थ्यांसाठी भाड्यामधे ३०% सवलत असणार आहे. शनिवार रविवार सर्व नागरिकांसाठी ३०% सवलत असणार आहे तसेच मेट्रो कार्ड धारकांसाठी सरसकट १० % सवलत असणार आहे (मेट्रो कार्ड लवकरच विक्रीस उपलब्ध होणार आहे)

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या हस्ते फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट आणि गरवारे ते रुबी हॉल या मार्गांचे उद्घाटन झाल्यानंतर संध्याकाळी ५:०० वाजेपासून पीसीएमसी ते सिव्हिल कोर्ट व वनाज ते रुबी हॉल अशी थेट मेट्रो सेवा प्रवाशांसाठी सुरू होईल. सिव्हिल कोर्ट इंटरचेंजचे स्थानकाचा वापर करून पीसीएमसी ते वनाज, पीसीएमसी ते रुबी हॉल असा प्रवास करणे शक्य होईल.

पीसीएमसी ते सिव्हिल कोर्ट या मार्गवरील मेट्रोच्या सेवेची वारंवारता

मेट्रोचे तिकीट काढण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत रोख, क्रेडिट – डेबिट कार्ड डिजिटल वॉलेट, मेट्रो ॲप द्वारे तिकीट खरेदी करता येईल. तिकीट खिडकी, तिकीट वेंडिंग मशीन, व्हाट्सअप इत्यादी पद्धतीने तिकीट प्राप्त केले जाऊ शकते. पीएमपीएमएल द्वारा फीडर बस सेवेचा लाभ उपलब्ध करून देण्यात आला आहे त्याचा प्रवाशांनी लाभ घ्यावा. ३ कोचची ट्रेन असून त्यातील एक डब्बा महिलांसाठी राखीव आहे. दिव्यांगासाठी मेट्रो कोच मध्ये विशिष्ट जागा राखीव ठेवण्यात आली आहे. मेट्रो स्थानक व मेट्रो कोच मध्ये इमर्जन्सी हेल्प बटन ठेवण्यात आली आहे. त्यामाध्यमातून स्टेशन कंट्रोलरशी थेट संपर्क साधता येतो.

पुणे मेट्रो प्रकल्प

१) पीसीएमसी ते स्वारगेट (१७.४ किमी, १४ स्थानके)
वनाझ ते रामवाडी (१५.७ किमी, १६ स्थानके)
एकूण ३३.२ किमी, ३० स्थानके

२) ६ मार्च २०२२ रोजी उदघाटन झालेले भाग
पीसीएमसी ते फुगेवाडी – ७ किमी, ५ स्थानके
वनाझ ते गरवारे – ५ किमी, ५ स्थानके
एकूण १२ किमी, १० स्थानके

३) नवीन उदघाटन होणारे भाग
फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट – ६.९ किमी, ४ स्थानके
गरवारे ते रुबी हॉल क्लिनिक – ४.७ किमी, ७ स्थानके
एकूण ११.६ किमी, ११ स्थानके

४) उर्वरित मार्गांचे नियोजन
रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी – सप्टेंबर २०२३
सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट – डिसेंबर २०२३

५) नवीन उदघाटन होणाऱ्या भागांमुळे होणारे फायदे
i) पुणे आणि पिंपरी चिंचवड हि जुळी शहरे मेट्रो द्वारे जोडली जाणार
ii) नवीन मार्ग शिवाजी नगर, सिव्हिल कोर्ट, आरटीओ, पुणे रेल्वेस्टेशन, पीएमसी, संभाजी उद्यान, डेक्कन इत्यादी महत्वाच्या भागांना जोडतो त्यामुळे लाखो पुणेकरांना याचा फायदा होणार आहे.
iii) एकूण २१ स्थानकांसह २३.६६ किमीचे मेट्रो मार्ग पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात कार्यान्वित
iv) प्रवासाच्या वेळेमध्ये ५० % घट, पुण्याची वाहतूक कोंडी बऱ्याच अंशी कमी होणार
v) पुणे रेल्वे स्थानक व शिवाजी नगर येथे भारतीय रेल्वे सोबत एकीकरण
vi) डेक्कन, शिवाजीनगर आणि PMC येथे PMPMLसेवेबरोबर एकीकरण

६) तिकीट घेण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध
तिकीट खिडकी
तिकीट व्हेंटीमशीन
क्रेडिट व डेबिट कार्ड द्वारे, मेट्रो कार्ड द्वारे
मेट्रो अँप, whats App तिकीट
सर्व UPI, Digital Payment द्वारा सुविधा

विद्यार्थ्यांसाठी तिकीट दरामध्ये ३०% सवलत
(शनिवार, रविवार सर्वाना ३०% सवलत)
मेट्रो कार्ड धारकांना १०% सवलत

७. सिव्हिल कोर्ट स्थानकाची वैशिष्ठे
i) १८ सरकते जिने व ८ लिफ्टने सज्ज
ii) जमिनीखाली १०८ फूट (३३.१ मी) भारतातील सर्वांत खोल स्थानकांपैकी एक.
iii) थेट फलाटावर सूर्य प्रकाश पडेल अशा रितिने स्थानकाचे बांधकाम
iv) सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक असून दोन्ही मार्गिका येथे एकमेकांना मिळतात.
v) भविष्यात हिंजेवाडी मेट्रो (PMRDA) मार्गिकेचे शिवाजीनगर स्थानक पादचारी पुलाने जोडले जाणार आहे

८) शिवाजीनगर भूमिगत स्थानकाची वैशिष्ठे
i) स्थानकाची रचना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड-किल्ले आणि तेथिल वास्तू पासून प्रेरणा घेऊन बनविले आहे
ii) भारतीय रेल्वे, पीएमपीएमएल आणि हिंजवडी मेट्रो (पीएमआरडीए) लाईन यांच्या बरोबर एकीकरण
iii) ५ लिफ्ट आणि १० सरकते जिने
iv) सिमला ऑफिस चौक, शिवाजीनगर रेल्वे स्थानक आणि मावळे दवाखाना चौक येथून प्रवाश्याना येण्या-जाण्याची सुविधा उपलब्ध
v) स्थानकाच्या आतील भागाची सजावट पुण्याच्या ऐत्याहासिक वस्तूंपासून प्रेरित


News Title |Pune Metro | PM Modi Pune Tour | Inauguration of metro service on Pune Metro route from Phugewadi to Civil Court and Garware to Ruby Hall