Khadakwasla Dam Chain | Pune Rain Update | खडकवासला प्रकल्पातील 4 धरणे 50% भरली
| धरणांत सद्यस्थितीत 14.53 TMC पाणी
Khadakwasla Dam Chain | Pune Rain Update | पुणे शहर (Pune city) आणि खडकवासला धरण साखळी (Khadakwasla Chain Project) प्रकल्पात गेल्या आठवडाभरापासून जोरदार पाऊस (Pune Rain) सुरु आहे. खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर अशी चार धरणे 50% भरली आहेत. 4 धरणांत मिळून 14.53 TMC पाणी साठा झाला आहे. अशी माहिती जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली. (Khadakwasla Dam | Pune Rain Update)
मागील वर्षी याच दिवसांत चार धरणामध्ये 20 टीएमसी पाणी होते. यंदा मात्र पाणी साडे पाच टीएमसी ने कमी आहे. दरम्यान पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होत आहे. दरम्यान पुणे शहरात मे महिन्यापासून पाणी कपात (Pune Water Cut) करण्यात आली आहे. काही भागांत दर गुरुवारी तर काही भागात वेगवेगळ्या दिवशी पाणी बंद ठेवण्यात येते. त्यामुळे महापालिकेने पाण्याची बचत केली आहे. जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने धरणातील पाणी कमी होत चालले होते. मात्र आता पाणीसाठ्यात वाढ होताना दिसत आहे. तरीही पाणीकपात हटणार नाही, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. (Pune water cut update)
खडकवासला धरण साखळीतील 4 धरणांत सद्यस्थितीत 14.53 टीएमसी म्हणजे 49.86% इतके पाणी आहे. त्यापैकी खडकवासला धरणांत (Khadakwasla Dam) 1.24 टीएमसी म्हणजे 62.92%, पानशेत धरणांत (Panshet Dam) 5.62 टीएमसी म्हणजे 52.82, वरसगाव धरणांत (Varasgaon Dam) 6.42 टीएमसी म्हणजे 50.11%, तर टेमघर धरणांत (Temghar Dam) 1.24 टीएमसी म्हणजे 33.49% इतके पाणी आहे. मागील वर्षी याच दिवसांत 20 टीएमसी म्हणजे 68.61% इतके पाणी चार धरणांत होते. (Pune Rain Update)
—-
News Title | Khadakwasla Dam Chain | Pune Rain Update | 4 dams in Khadakwasla project are 50% full | 14.53 TMC of water in dams at present