Chitale Bandhu Mithaiwale | मिठाई, फरसाण,डेअरी असोसिएशनची कार्यकारणी जाहीर
अध्यक्षपदी संजय चितळे,कार्याध्यक्षपदी मुरलीधर चौधरी तर सचिवपदी अमित अग्रवाल यांची निवड
Chitale Bandhu Mithaiwale | मिठाई फरसाण डेअरी असोसिएशन,पुणे (Mithai, Farsan, Dairy Association) ची बैठक झाली, त्यामध्ये २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी कार्यकारणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी चितळे बंधू मिठाईवालेचे संजय (गोविंद) चितळे, कार्याध्यक्षपदी बिकानेर शेव भंडारचे मुरलीधर चौधरी यांची तर सचिवपदी अमरनाथ अग्रवाल मावावालाचे अमित अग्रवाल यांची निवड करण्यात आली. (Mithai, Farsan, Dairy Association)
या बैठकीत सर्व सभासदांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी मध्यवर्ती कार्यालय सुरू करणे, शासनाच्या सर्व नियमांची माहिती साध्या सोप्या पद्धतीने सर्व सभासदांना करून देणे, सर्व सभासदांचा व्यवसायिक दर्जा उंचावण्यासाठी दर तीन महिन्यांनी कार्यशाळा आयोजित करणे हे निर्णय घेण्यात आले.
नव्या कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून केदार चितळे (चितळे बंधू मिठाईवाले), सचिन गाडवे (काका हलवाई स्वीट सेंटर), दिलीप बुधानी ( बुधानी वेफर्स), योगेश अग्रवाल (अग्रवाल डेअरी) यांची तर सहसचिव म्हणून प्रशांत डाटा (बाबुज लक्ष्मीनारायण चिवडा), मकरंद गाडवे ( काका हलवाई स्वीटस ) यांची निवड करण्यात आली. कोषाध्यक्ष व सह कोषाध्यक्षपदाची जबाबदारी दिनेश अग्रवाल (डी एन अग्रवाल मावावाला), कैलाश झंवर (आस्वाद फूड प्रोडक्ट) यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
तर कार्यकारणी सदस्य म्हणून रामलाल चौधरी(ममता स्वीट), कांतीलाल सेठीया(मुलचंद स्वीट), इंद्रनील चितळे(चितळे बंधू मिठाईवाले), गोविंद भगतानी(मॉर्डन डेअरी), मुकेश पुरोहित(पुरोहित स्वीट), अथर्व गाडवे (काका हलवाई), धिरेन पारेख (भावनगरी स्वीट), कुमार आठवानी (कराची स्वीट), अमरजित सिंग (उत्तम स्वीट), संजय राठी (सागर स्वीट), निखील मालानी ( प्रभात फरसाण ) यांची निवड करण्यात आली आहे. सल्लागार समितीमध्ये श्रीकृष्ण चितळे,सुरेंद्र गाडवे, अरविंद बुधानी यांचा समावेश आहे.