पीएमपीच्या १० हजार कर्मचाऱ्यांच्या बोनससाठी २४ कोटी
: स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. दिवाळी बोनस देण्यासाठी २४ कोटी रुपये आगाऊ देण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
रासने म्हणाले, या निर्णयाचा पीएमपीएमएलच्या दहा हजार लाभ होणार आहे. आज या संदर्भातील प्रस्ताव सभासदाकडून स्थायी समितीसमोर ठेवला होता. त्याला मान्यता देण्यात आली. गेल्या वर्षी कोरोनाच्या काळात बससेवा बंद ठेवण्यात आली होती. मात्र कोरोना काळात अत्यावश्यक सेवा आणि विलगीकरण केंद्रांवर पीएमपीएमएलच्या कर्मचार्यांनी उत्तम सेवा बजावली होती.
एमएनजीएलला अदा करण्यासाठी दहा कोटी रुपयांना मंजुरी
रासने पुढे म्हणाले, पीएमपीएमएलला सीएनजीचा पुरवठा करणार्या महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) कंपनीला दहा कोटी रुपये अदा करण्यासाठीही आज स्थायी समितीने मान्यता दिली.’ हा प्रस्ताव देखील नगरसेवकांनी दिला होता.
____
COMMENTS