टॅक्स मधून महापालिकेला 1155 कोटींचे उत्पन्न
: हेमंत रासने आणि विलास कानडे यांचे एकत्रित प्रयत्न
पुणे : महापालिकेचा उत्पन्न मिळवण्याचा सर्वात महत्वाचा स्रोत हा टॅक्स विभाग आहे. विभागाने 31 ऑक्टोबर पर्यंत सुमारे 1155 कोटींचे उत्पन्न मिळवले आहे. जे मागील वर्षा पेक्षा 198 कोटींनी अधिक आहे. स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने आणि विभाग प्रमुख विलास कानडे यांच्या एकत्रित प्रयत्नाने हे शक्य झाले आहे.
: मागील वर्षी पेक्षा 198 कोटी अधिक उत्पन्न
टॅक्स हा महापालिकेचा उत्पन्न वाढीचा सर्वात महत्वाचा स्रोत ठरला आहे. मागील आर्थिक वर्षात टॅक्स ने 1700 कोटींचे उत्पन्न मिळवले होते. कोरोना काळात त्यामुळे महापालिकेला चांगली मदत झाली. दरम्यान चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सात महिन्यात टॅक्स मधून महापालिकेला 1155 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. जे मागील वर्षा पेक्षा 198 कोटींनी अधिक आहे. मागील वर्षी पहिल्या सात महिन्यात पालिकेला 957 कोटी मिळाले होते. टॅक्स विभाग प्रमुख विलास कानडे यांनी सांगितले कि, वसुली करण्यास अजून 5 महिन्याचा अवधी आहे. तोपर्यंत आम्ही 1600 कोटी पर्यंत उत्पन्न मिळवू.
: 36 हजारापेक्षा अधिक मिळकतीचे मूल्यमापन
विभाग प्रमुख विलास कानडे यांनी सांगितले कि, चालू आर्थिक वर्षात आम्ही 36 हजार 866 नवीन मिळकतीचे मूल्यमापन केले आहे. ज्यामधून महापालिकेला 195 कोटींचे उत्पन्न मिळणार आहे. यावर्षी विभागाच्या प्रयत्नाने सगळ्यात जास्त मिळकतीचे मूल्यमापन झाले आहे. मागील पूर्ण वर्षात 47666 मिळकतीचे मूल्यमापन केले होते. 2019-20 मध्ये 38968, 2018-19 मध्ये 24255, 2017-18 मध्ये 27104 तर 2010-11 मध्ये 27773 मिळकतीचे मूल्यमापन करण्यात आले होते.
COMMENTS