महिलांच्या सुरक्षिततेसाठी महापालिकेचा ‘विशेष कृती आराखडा’   : महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती   : महापालिका आणि पोलिसांची झाली बैठक

HomeपुणेPMC

महिलांच्या सुरक्षिततेसाठी महापालिकेचा ‘विशेष कृती आराखडा’ : महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती : महापालिका आणि पोलिसांची झाली बैठक

Ganesh Kumar Mule Sep 16, 2021 2:13 PM

Corporators took objections for ward Structures : प्रभाग रचनेवर नगरसेवक नाराज; नोंदवल्या हरकती 
Dr Rajendra Bhosale IAS | डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्वीकारला पुणे महानगरपालिका आयुक्त पदाचा पदभार!
PMC Budget 2023-24 | अपुऱ्या निधीअभावी मागील वर्षातील अपूर्ण कामे पूर्ण नाही झाली तर …!  | महापालिका आयुक्तांचा उपायुक्त, खातेप्रमुखांना इशारा 

महिलांच्या सुरक्षिततेसाठी महापालिकेचा ‘विशेष कृती आराखडा’

: महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

: महापालिका आणि पोलिसांची झाली बैठक

पुणे:  शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांत घडलेल्या महिला अत्याचारांच्या घटनांची महापालिका स्तरावरही गांभीर्याने दखल घेण्यात आली असून या संदर्भात पुणे महापालिका पुणे पोलीसांनासमवेत ‘विशेष कृती आराखडा’ तातडीने तयार करणार असून त्याची अंमलबजावणीही वेगाने करण्यात येईल, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

: अत्याचाराच्या घटनांना आळा घालणार

गेल्या काही दिवसांत पुणे आणि परिसरात घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून  महानगरपालिकेत पोलीस दलासमवेत बैठक आयोजित केली होती. त्यानंतर महापौर बोलत हिते. या बैठकीस पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पुणे महानगरपालिकेचे सर्व पक्षनेते, तसेच महापालिका अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये, महिलांच्या सुरक्षेसंदर्भात पुणे महापालिका आणि पोलिस प्रशासन यांनी एकत्रितपणे कृती आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. विविध निर्णयांसोबतच क्षेत्रीय कार्यालयानिहाय पथके तयार करण्याचा महत्त्वाचानिर्णय घेण्यात आला आहे.
महापौर मोहोळ म्हणाले, ‘सद्यस्थितीमध्ये नोकरी, व्यवसायात महिला वर्गाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे नोकरी, व्यवसायानिमित्त महिलांना रात्री अपरात्री प्रवास करावा लागत असल्याने अत्याचाराच्या घटना घडत आहेत, असे निदर्शनास आले आहे. याला आळा घालण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून पोलीस स्टेशनच्या सूचनेनुसार शाळेची मैदानी, उद्याने, रेल्वे स्टेशन परिसर, स्वारगेट बस स्थानक, शिवाजीनगर बस स्थानक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा तसेच विद्युत व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच खाजगी आणि सरकारी शाळांमध्ये संस्कार वर्ग, महिलांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण, स्पर्शज्ञान यासाठी विशेष प्रशिक्षण राबविण्यात येणार आहे.
‘प्रवासी वाहतूक करणाऱ्या ओला, उबर कॅब आणि रिक्षा, स्कूल व्हॅन यांच्यासाठी विशेष नियमावली तयार करून राबविण्यात येणार आहे. तसेच सार्वजनिक वाहतुक यंत्रणेत महिलांच्या सुरक्षिततेसाठी  पीएमपीएमएल त्याचबरोबर आरटीओची मदत घेतली जाणार आहे. तसेच लॉज, हॉटेल यांच्याकरता देखील कडक नियमावली तयार करून त्याची अंमलबजावणी करण्यात येईल’, असेही महापौर मोहोळ म्हणाले.

काय असेल कृती आराखड्यात?

■ परप्रांतीय, फुटपाथवर राहणाऱ्या लोकांची माहिती संकलित करणार
■ प्रवासी वाहतूक करणाऱ्या ओळ उबर कॅब आणि रिक्षा, स्कूल व्हाॅन यांच्याकरता विशेष नियमावली तयार करणार
■ हॉटेल-लॉज यांच्यासाठी देखील कडक नियमावली करणार
■ स्टेशन, बस स्थानके, उद्याने, मैदाने याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार आणि दिव्यांची व्यवस्था करणार

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0