महाविकास आघाडी सरकारला फक्त नोटांचा आवाज ऐकू येतो  : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा घणाघात   राज्यात ठिकठिकाणी भाजपाची मंदिरे उघडण्याबाबत आंदोलने   : पुण्यातील मानाच्या कसबा गणपतीची महाआरती

Homeपुणेमहाराष्ट्र

महाविकास आघाडी सरकारला फक्त नोटांचा आवाज ऐकू येतो : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा घणाघात राज्यात ठिकठिकाणी भाजपाची मंदिरे उघडण्याबाबत आंदोलने : पुण्यातील मानाच्या कसबा गणपतीची महाआरती

Ganesh Kumar Mule Aug 30, 2021 11:29 AM

Prithviraj B P IAS | सगळ्यांना बरोबर घेऊन काम करणार | पृथ्वीराज बी पी यांनी स्वीकारला अतिरिक्त महापालिका आयुक्त (ई) पदाचा पदभार
Ex mayor Association : महानगरपालिकेतील अनावश्यक कामावर होणारी खर्च टाळावा : माजी महापौर संघटनेची मागणी
Time Bound Promotion | PMC Pune | कालबद्ध पदोन्नतीसाठी जवळपास १५ हजार कर्मचारी ठरताहेत पात्र! | ६० ते ६५ कोटी पर्यंत येऊ शकतो खर्च
महाविकास आघाडी सरकारला फक्त नोटांचा आवाज ऐकू येतो
: भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा घणाघात
राज्यात ठिकठिकाणी भाजपाची मंदिरे उघडण्याबाबत आंदोलने
: पुण्यातील मानाच्या कसबा गणपतीची महाआरती
पुणे. महाविकास आघाडी सरकारला केवळ नोटांचा आणि दारु दुकानदारांचा आवाज ऐकू येतो. त्यामुळे त्यांना झोपेतून जागं करण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून शंखनाद करण्यात येत आहे, असा घणाघात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. भारतीय जनता पार्टीच्यावतीने राज्यातील मंदिरे खुली करण्यासाठी आयोजित केलेल्या शंखनाद आंदोलनात पाटील  पुण्यात सहभागी झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राज्यातील मंदिर उघडण्यासाठी सद्बुद्धी मिळावी, यासाठी कसबा गणपतीला साकडं घालून गणपतीची महाआरती केली. पुण्यासोबतच राज्यात ठिकठिकाणी भाजपने आंदोलने केली.
पुण्याच्या आंदोलनात पुणे शहर भाजपा अध्यक्ष जगदीश मुळीक, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, मुक्ता टिळक, महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस सुशील मेंगडे यांच्या सह पक्षाचे सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते.
कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर जनजीवन सुरळीत झालं, त्यानंतरही सर्व सुरु झालं, मात्र मंदिरं सुरू झाली नाहीत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला रस्त्यावर उतरुन संघर्ष करावा लागल्याचे सांगून  चंद्रकांत पाटील म्हणाले की, “हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख  बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव मुख्यमंत्री होण्याआधी मंदिरात जाऊन देवदर्शन घेण्याचे आग्रही होते. पण अल्पसंख्याकांच्या मतांसाठी धर्म न मानणाऱ्या पक्षांसोबत आघाडी केल्यानंतर मंदिरं उघडण्याला माझं प्राधान्य नाही, असं ते दाखवू लागले. आता त्यांना वारकऱ्यांचे श्रद्धाळूंचे आवाज ऐकू येत नाहीत. त्यांना फक्त नोटांचे, नोटा देणाऱ्यांचे, दारु दुकानदारांचे आवाज ऐकू येतात.”
ते पुढे म्हणाले की, “कोरोनाचे दोन्ही लाटेत सर्वांनी निर्बंधांचं कटाक्षाने पालन करुन, सरकारला सहकार्य केलं. मात्र, कोरोनाची लाट ओसरु लागल्यानंतर हे सरकार लोकांना त्यांना जगण्याचा अधिकार नाकारु लागलं. त्यामुळे व्यापाऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागले. आताही मंदिरासंबंधीत जे छोटे छोटे व्यवसाय आहेत, त्या व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली असतानाही राज्य सरकार डोळे झाकून बसली आहे.”
ते पुढे म्हणाले की, “हिंदू जसे मंदिरात जाऊन प्रार्थना करतात, त्याप्रमाणे मुस्लिम, ख्रिश्चन, शिख आणि जैन बांधव हे मश्चिद आणि चर्च, गुरुद्वारा, जैन मंदिर मध्ये जाऊन प्रार्थना करतात. या सर्वांनी प्रार्थनेसाठी मंदिरात जायचं नाही, तर मातोश्रीत जायचं का?” असा सवाल उपस्थित करत मंदिर उघडण्यासंदर्भातील आदेश तात्काळ जारी करावा, अन्यथा भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते मंदिराचे कुलूप तोडून, मंदिरे सर्व सामान्यांसाठी खुली करतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
यावेळी शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ यांनीही राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवत, मंदिरे तातडीने उघडी करावीत अशी मागणी केली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0