PMC New  Recruitment Rules | महापालिकेच्या सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आता आदर्श सामाईक सेवा प्रवेश नियमावली | राज्य सरकारने पुणे महापालिके कडून सेवा प्रवेश नियम, आकृतिबंध बाबत मागितली माहिती

Homeadministrative

PMC New  Recruitment Rules | महापालिकेच्या सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आता आदर्श सामाईक सेवा प्रवेश नियमावली | राज्य सरकारने पुणे महापालिके कडून सेवा प्रवेश नियम, आकृतिबंध बाबत मागितली माहिती

Ganesh Kumar Mule Dec 12, 2024 8:35 PM

Chief Minister Eknath Shinde inaugurates the online Admissions Regulating Authority Module
Loksabha Election 2024 | निवडणुकीदरम्यान ‘डीप फेक’ रोखण्यासाठी कारवाई करण्याचे शासनाचे आदेश
Sharad Pawar | अजित पवार यांनी बारामतीत विकास केला, तरी लोकांनी तुम्हाला का निवडलं? या प्रश्नांवर शरद पवार काय म्हणाले?

PMC New  Recruitment Rules | महापालिकेच्या सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आता आदर्श सामाईक सेवा प्रवेश नियमावली | राज्य सरकारने पुणे महापालिके कडून सेवा प्रवेश नियम, आकृतिबंध बाबत मागितली माहिती

 

Recruitment Rules – (The Karbhari News Service) – राज्यातील सर्व महापालिका मधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आता आदर्श सामाईक सेवा प्रवेश नियमावली तयार केली जाणार आहे. याचा अभ्यास करण्यासाठी सरकारने ९ सदस्य असलेल्या अभ्यास गटाची स्थापना केली आहे. सरकारने पुणे महापालिका सहित २८ महापालिका कडून सेवा प्रवेश नियम, अद्ययावत आकृतिबंध तसेच पदांच्या वेतन श्रेणी बाबत माहिती मागवली आहे. १६ डिसेंबर पर्यंत ही माहिती देण्याचे निर्देश नगरपरिषद प्रशासन संचालनालय चे सदस्य सचिव तथा सह आयुक्त समीर उन्हाळे यांनी मागविली आहे. (Pune Municipal Corporation-PMC)

राज्यात एकुण २९ महानगरपालिका असून, त्यापैकी बृहन्मुंबई महानगरपालिका वगळता अन्य महानगरपालिकांचे कामकाज हे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ मधील तरतूदीनुसार चालविण्यात येते. या अधिनियमाच्या प्रकरण चार मध्ये महानगरपालिकांचे अधिकारी व कर्मचारी यांच्या नियुक्ती व सेवेच्या संबंधि तरतूदी आहेत. या तरतूदीनुसार महानगरपालिकांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे संविधानिक अधिकारी व अन्य अधिकारी असे वर्गीकरण करण्यात आले आहे. या अधिनियमातील तरतूदींनुसार संविधानिक अधिकाऱ्यांच्या नियुक्ती विषयक तरतूदी असून, अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीस शासनाची मान्यता देण्यात येते.

राज्यातील २८ (बृहन्मुंबई मनपा वगळता) महानगरपालिकांचे शासनाच्या मान्यतेने आवश्यकतेनुसार प्रत्येक महानगरपालिकांनी पदे निर्माण करुन, स्वतःची सेवाप्रवेश नियम तयार केलेले आहेत. तथापि, वेगवेगळ्या महानगरपालिकांच्या सेवा प्रवेश वेगवेगळे असून, या सेवा प्रवेश नियमांमध्ये समानता असणे आवश्यक आहे. सबब, महानगरपालिकांच्या विविध सेवेतील अधिकारी / कर्मचाऱ्यांचे आदर्श सामाईक सेवा प्रवेश नियम करण्याची आवश्यकता असल्याने, राज्यातील २८ (बृहन्मुंबई मनपा वगळता) महानगरपालिकांमधील विविध पदांसाठी आदर्श सामाईक सेवा प्रवेश नियम करण्याकरीता 9 सदस्य असलेल्या अभ्यास गटाची स्थापना करण्यात आली आहे.

 अभ्यास गटाची कार्यकक्षा खालीलप्रमाणे राहील:-

(अ) राज्यातील २८ (बृहन्मुंबई मनपा वगळता) महानगरपालिकांमधील विविध पदांसाठी आदर्श सामाईक सेवा प्रवेश नियम करण्याकरीता सर्व महानगरपालिकांमधील पदांचा व सेवाप्रवेश नियमांचा अभ्यास करुन, या पदांसाठी आदर्श सामाईक सेवा प्रवेश नियमांचा मसुदा तयार करणे.
(आ) सर्व महानगरपालिकांमधील अधिकारी / कर्मचाऱ्याच्या बदल्यांबाबतचे धोरण ठरविण्याकरीता सर्व समावेशक अभ्यास करुन, त्याबाबतचा अहवाल सादर करणे.
(इ) महानगरपालिकांच्या आस्थापनेवरील सरळसेवा कोट्यातील सहायक आयुक्त, गट-अ / गट-ब व अन्य समकक्ष अधिकाऱ्यांची नियुक्ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्याबाबत या संदर्भातील सध्याच्या तरतूदी व त्यानुषंगाने करावयाचे आवश्यक बदल विचारात घेऊन त्याबाबतचा अहवाल तयार करणे.

त्यानुसार सरकारने पुणे महापालिके कडून खालील गोष्टींची माहिती मागितली आहे:

1. महापालिकेने उपलब्ध करून दिलेले सेवा प्रवेश नियम
२. अद्ययावत आकृतिबंध
3. पदांच्या वेतन श्रेणी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0