ऍमेनिटी स्पेस भाडे तत्वावर देण्यास विरोध करण्यावर राष्ट्रवादीचे शिक्कामोर्तब!  : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत घेतलेल्या बैठकीत ठरली भूमिका  : आता भाजप काय करणार याकडे लक्ष

HomeपुणेPMC

ऍमेनिटी स्पेस भाडे तत्वावर देण्यास विरोध करण्यावर राष्ट्रवादीचे शिक्कामोर्तब! : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत घेतलेल्या बैठकीत ठरली भूमिका : आता भाजप काय करणार याकडे लक्ष

Ganesh Kumar Mule Aug 29, 2021 1:42 PM

Dr Rajendra Bhosale IAS | पावसाळ्यात आकस्मिक परिस्थितीत आवश्यकता भासल्यास स्वच्छ संस्थेतील सेवकांना नियुक्त केले जाणार 
Pune Metro : Murlidhar Mohol : महापौरांनी स्पष्टच केले; व्यवहार्य पर्याय नसल्याने लकडी पुलावर मेट्रोचे काम सुरु करणार
Har Ghar Tiranga | PMC Pune | प्रत्येक पुणेकराने आपल्या घरी राष्ट्रध्वज उभारुन मानवंदना द्यावी! | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन
ऍमेनिटी स्पेस भाडे तत्वावर देण्यास विरोध करण्यावर राष्ट्रवादीचे शिक्कामोर्तब! 
: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत घेतलेल्या बैठकीत ठरली भूमिका 
: आता भाजप काय करणार याकडे लक्ष 

पुणे : गेल्या बऱ्याच दिवसांपासून शहरात गाजलेल्या महापालिकेच्या अॅमेनिटी स्पेसच्या जागा दीर्घकाळ मुदतीने भाड्याने देण्याच्या प्रस्तावास राष्ट्रवादी काँग्रेसने आता पूर्ण विरोध करण्याचीच भूमिका घेतली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार  यांच्या बैठकीत एकमताने निर्णय घेतला आहे. याबाबतचे सर्व अधिकार पवार यांनी स्थानिक नेत्यांना दिले आहेत. त्यानुसार राष्ट्रवादी आता अमेनिटी स्पेस सोबत फ्लॅट विक्री, पार्किंग अशा विविध विषयांना मुख्य सभेत विरोध करेल. अशी माहिती राष्ट्रवादी कांग्रेस चे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.

 
– उपमुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक

महापालिकेच्या ८५ आरक्षणाच्या आणि १८५ ॲमेनिटी स्पेसच्या (सुविधा क्षेत्र) जागा खासगी व्यावसायिकांना दीर्घमुदतीने भाड्याने देण्याच्या विषयावर मुख्यसभेत प्रस्तावाला पाठिंबा द्यायचा की नाही यावर अजित पवार यांनी शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांची बैठक घेतली. या जागा भाड्याने देताना ३३ टक्के जागा अर्बन फॉरेस्टसाठी राखीव ठेवावी व जागांच्या वापराचा मास्टर प्लॅन तयार करावा या मागणीवरून भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला पण त्यास अनेक पदाधिकार्यांचा विरोध होता. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण झाल्याने गुरूवारी (ता. २६ ) मुख्य सभेच्या काही तास आधी भूमिकेवरून कोलांटउडी घेतली. पदाधिकार्यांनी एकमताने निर्णय घ्यावा असे पवार यांनी सांगितले असताना उलट पक्षात गोंधळ निर्माण झाला. त्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा पवार यांनी बैठक घेतली. या बैठकीस शहराध्यक्षांसह खासदार, आजी-माजी आमदार, माजी महापौर, माजी स्थायी समिती अध्यक्ष उपस्थित होते.

– स्थानिक नेत्यांना दिले अधिकार

बैठकीमध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या भूमिकेवरून झालेल्या गोंधळाबाबत चौकशी केली. त्यावेळी प्रसार माध्यमांनी चुकीचा अर्थ काढला असे पवार यांना सांगण्यात आले. त्यानंतर प्रत्येक पदाधिकार्याची भूमिका ऐकून घेतली. त्यामध्ये अॅमेनिटी स्पेसच्या मुद्द्याला पूर्ण विरोध केला पाहिजे. भाजपसोबत जाणे योग्य नाही. जर पाठिंबा दिल्यास त्याचा परिणाम पक्षाच्या प्रतिमेवर होईल असे मत पदाधिकार्यांनी मांडले. तसेच अ‍ॅमेनिटी स्पेसच्या ३३ जागा अर्बन फाॅरेस्ट आणि ३३ जागा रुग्णालय, शाळांसाठी आरक्षीत ठेवल्या पाहिजेत यावर चर्चा करण्यात आली. मास्टर प्लान तयार करून महापालिकेने त्यावर नागरिकांच्या हरकती सूचना मागविल्या पाहिजेत, त्यानंतरच यास पाठिंब्याचा विचार केला पाहिजे. पण सध्या या प्रस्तावास विरोध केला पाहिजे, असेही मत पदाधिकार्यांनी व्यक्त केले. पवार यांनी सर्वांची भूमिका ऐकून घेत, मुख्यसभेत अ‍ॅमेनिटी स्पेसवा विरोध करण्याची भूमिका मान्य करत, त्यादृष्टीने कार्यवाही करण्याचे आदेश पदाधिकार्यांना दिले. पवार यांनी याबाबतचे सर्व अधिकार हे स्थानिक नेत्यांना दिले आहेत.

३३ टक्के अर्बन फाॅरेस्ट व मास्टर प्लॅन भाजप ने तयार केला नाही आणि या बदलास त्यास पाठिंबा देण्याची भूमिका ती त्या दिवसापुरतीच मर्यादित होती. आता त्याचा काही संबंध नाही त्यामुळे या प्रस्तावास विरोध केला जाईल, असे बैठकीत ठरले आहे.
  – अ‍ॅड. वंदना चव्हाण, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस
शहराचे हित तुम्हाला कळते. त्यामुळे योग्य तो निर्णय घेण्याची मुभा तुम्हास दिली आहे. असे आम्हाला उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यानुसार आम्ही आता अमेनिटी स्पेस सोबत फ्लॅट विक्री, पार्किंग अशा विविध विषयांना मुख्य सभेत विरोध करू.
– प्रशांत जगताप, शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी कांग्रेस.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0