Youth Congress Agitation | मशाल मोर्चातून महाराष्ट्र युवक काँग्रेसचा मतदान चोरी आणि बेरोजगारीविरोधात सरकारला इशारा!

HomeBreaking News

Youth Congress Agitation | मशाल मोर्चातून महाराष्ट्र युवक काँग्रेसचा मतदान चोरी आणि बेरोजगारीविरोधात सरकारला इशारा!

Ganesh Kumar Mule Sep 27, 2025 7:39 PM

The state’s law and order situation is dire. Is Maharashtra’s Home Department being run like “Ghashiram Kotwal”? The state needs a full-time, capable Home Minister – Harshwardhan Sapkal 
Harshwardhan Sapkal | महाराष्ट्राचा गृहविभाग घाशीराम कोतवाल चालवत आहे का? राज्याला पूर्णवेळ सक्षम गृहमंत्री हवा | हर्षवर्धन सपकाळ
Harshwardhan Sapkal | फुले दाम्पत्य ज्या प्रवृत्तींच्या विरोधात लढले त्या प्रवृत्तीने पुन्हा डोके वर काढले; समता, बंधुता व सामाजिक न्यायाला बाजूला सारण्याचा सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न : हर्षवर्धन सपकाळ | काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी फुले वाड्याला भेट देऊन महात्मा फुले यांना अभिवादन केले तसेच भिसे कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली

Youth Congress Agitation | मशाल मोर्चातून महाराष्ट्र युवक काँग्रेसचा मतदान चोरी आणि बेरोजगारीविरोधात सरकारला इशारा!

 

 

Pune News – (The Karbhari News Service) –  महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे आज पुण्यात भव्य मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले. शेकडो युवकांनी हातात मशाली घेऊन “मतदान चोरी बंद करा”, “तरुणांना नोकरी द्या”, “लोकशाही वाचवा” अशा आक्रमक घोषणा युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी मोरे यांच्या नेतृत्वात देत रस्त्यावर उतरून सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.  (Maharashtra News)

या मोर्चामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संताप व्यक्त करत म्हटले की – “सरकारने लोकशाहीची गळचेपी करून निवडणुकांमध्ये उघडपणे मतदान चोरी केली आहे. बेरोजगारीचा राक्षस प्रत्येक तरुणाच्या आयुष्याशी खेळत आहे. युवकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न झाला तरी आम्ही गप्प बसणार नाही. ही मशाल आता तरुणांच्या हातून उठलेली ज्वाला आहे, जी भ्रष्ट सत्तेला राखेत मिळवेल.”

त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांनी आक्रमक भाषेत सरकारला इशारा देत म्हटले – “युवकांच्या भविष्याशी गद्दारी करणाऱ्या या सरकारला आम्ही रस्त्यावर उतरून सणसणीत उत्तर देत आहोत. मतदान चोरी करून सत्तेत आलेले लोकशाहीचे खुनी आम्ही कधीच स्वीकारणार नाही. रोजगार, शिक्षण आणि हक्कासाठी लढणाऱ्या प्रत्येक तरुणाचा आवाज आज मशालीतून पेटला आहे. ही लढाई आता रस्त्यावरून संसदेत जाईल आणि जनता हुकूमशाही पाडूनच थांबेल.”

 

या मशाल मोर्चामध्ये हर्षवर्धन सपकाळ, डॉ विश्वजीत कदम, प्रदेश प्रभारी अजय चिकारा, युवक प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, माजी मंत्री सतेज (बंटी) पाटील, अभय छाजेड, अरविंद शिंदे, मा.आ. मोहन जोशी, मीडिया विभाग प्रमुख व युवक सरचिटणीस अक्षय जैन, सौरभ अमराळे, प्रथमेश अबनवे आदी मान्यवर उपस्थित होते.

या मशाल मोर्चाच्या माध्यमातून युवक काँग्रेसने सरकारला ठणकावून सांगितले की – लोकशाहीची हत्या, मतदान चोरी आणि बेरोजगारीचा अन्याय याविरुद्ध लढा आता अधिक तीव्र केला जाईल. महाराष्ट्रातील प्रत्येक तरुण हा मशालधारी योद्धा बनून सरकारच्या हुकूमशाहीविरोधात लढा देईल.दम, अभय छाजेड, अरविंद शिंदे, मा.आ. मोहन जोशी, मीडिया विभाग प्रमुख व युवक सरचिटणीस अक्षय जैन, आमिर शेख ,प्रथमेश अबनवे सौरभ अमराळे आदी मान्यवर उपस्थित होते.

या मशाल मोर्चाच्या माध्यमातून युवक काँग्रेसने सरकारला ठणकावून सांगितले की – लोकशाहीची हत्या, मतदान चोरी आणि बेरोजगारीचा अन्याय याविरुद्ध लढा आता अधिक तीव्र केला जाईल. महाराष्ट्रातील प्रत्येक तरुण हा मशालधारी योद्धा बनून सरकारच्या हुकूमशाहीविरोधात लढा देईल.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: