Pune Congress News | विधानसभा निवडणुकीत ७५ लाख अधिक मतदारांची नोंदणी झाली असे दाखवून महायुती सत्तेवर आली – हर्षवर्धन सपकाळ

HomeBreaking News

Pune Congress News | विधानसभा निवडणुकीत ७५ लाख अधिक मतदारांची नोंदणी झाली असे दाखवून महायुती सत्तेवर आली – हर्षवर्धन सपकाळ

Ganesh Kumar Mule Mar 22, 2025 8:59 PM

The state’s law and order situation is dire. Is Maharashtra’s Home Department being run like “Ghashiram Kotwal”? The state needs a full-time, capable Home Minister – Harshwardhan Sapkal 
Harshwardhan Sapkal | फुले दाम्पत्य ज्या प्रवृत्तींच्या विरोधात लढले त्या प्रवृत्तीने पुन्हा डोके वर काढले; समता, बंधुता व सामाजिक न्यायाला बाजूला सारण्याचा सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न : हर्षवर्धन सपकाळ | काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी फुले वाड्याला भेट देऊन महात्मा फुले यांना अभिवादन केले तसेच भिसे कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली
Harshwardhan Sapkal | महाराष्ट्राचा गृहविभाग घाशीराम कोतवाल चालवत आहे का? राज्याला पूर्णवेळ सक्षम गृहमंत्री हवा | हर्षवर्धन सपकाळ

Pune Congress News | विधानसभा निवडणुकीत ७५ लाख अधिक मतदारांची नोंदणी झाली असे दाखवून महायुती सत्तेवर आली – हर्षवर्धन सपकाळ

 

Harshwardhan Sapkal – (The Karbhari News Service) – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे (MPCC) नवनिर्वाचित अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) हे आज पुणे दौऱ्यावर होते. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस भवन, पुणे येथे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, पुणे ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटी व पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या बैठकींचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. (Pune News)

या मेळाव्‍यात बोलताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्‍हाण म्हणाले की, ‘‘संघटनेमध्ये बुथ पासून ते देश पातळीपर्यंत काम करणारा व काँग्रेसच्या विचारांना वाहून घेणारा एक कार्यकर्ता प्रांताध्यक्ष झालेला आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकदम अनपेक्षित निकाल लागलेला आहे. निवडणुक प्रक्रियेबद्दल व ई.व्‍ही.एम. बद्दल लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली आहे. महाराष्ट्रामध्ये बदलापूर, परभणी, नागपूर, बीड या ठिकाणी घडलेल्या घटनांनी महाराष्ट्राची प्रतिमा खराब झाली आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत लोकांपर्यंत जर व्‍यवस्थित पोहोचलो तर आजही परिस्थिती बदलू शकते.

यानंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, ‘‘आज ज्या कार्यकर्त्यांकडून सूचना मिळाल्या त्या प्रेरणादायी होत्या. भांड्याला भांडे कोठेही वाजले नाही. ही लढाई विचारांची आहे व रस्त्यावर उतरण्याचीही आहे. घरात एकमत व बाजारात पत असली की कोणतीही लढाई आपण जिंकू शकतो. काँग्रेसची बाजारात खूप मोठी पत आहे. सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एक दिलाने, एक मताने या लढाईला सामोरे गेले पाहिजे. याच काँग्रेस भवनमध्ये ॲड. अभय छाजेड हे अध्यक्ष असताना मी २००७ ला दोन दिवस मुक्काम केला आहे व शिबीरामध्ये डॉ. सुंगत बंरट यांच्याबरोबर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. काँग्रेस भवनमध्ये मुक्काम करणार माणूस प्रदेशाध्यक्ष म्हणून या ठिकाणी आलेला आहे याचा आनंद आहे. आता काँग्रेसचा कार्यकर्ता प्रदेशाध्यक्ष होऊ शकतो ही काँग्रेसची किमया आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीमध्ये मतदार याद्यांमध्ये ७५ लाख मतदान वाढलेले आहे आणि तेवढ्याच मतांनी महायुती जिंकली आहे. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये या निवडणुकीबाबत सांशकता आहे.’

यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे, पुणे ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय जगताप व पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कैलास दम यांच्या उपस्थितीत पदाधिकारी बैठका पार पडल्या.

सदर मेळाव्‍यामध्ये माजी आमदार रमेश बागवे, मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर, दिप्ती चवधरी, अविनाश बागवे आदींची भाषणे झाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित दरेकर यांनी केले तरी उपस्थितांचे आभार अरविंद शिंदे यांनी मानले.

यावेळी संजय बालगुडे, गोपाळ तिवारी, श्रीरंग चव्‍हाण, मेहबुब नदाफ, सदानंद शेट्टी, रफिक शेख, वैशाली मराठे, लता राजगुरू, सुजाता शेट्टी, प्राची दुधाणे, सौरभ अमराळे, सचिन दुर्गाडे, सुनिल मलके, यशराज पारखी, सुजित यादव, अक्षय माने, हेमंत राजभोज, संतोष पाटोळे, कृष्णा सोनकांबळे, रविंद्र माझीरे, रमेश सकट, राजू ठोंबरे, अमिर शेख, प्रदिप परदेशी, प्रकाश पवार, समिर शेख, द. स. पोळेकर, यासीर बागवे, ॲड. नंदलाल धिवार, भुषण रानभरे, हरिदास चव्‍हाण, ॲड. रमेश पवळे, सुंदर ओव्‍हाळ, अनिता धिमधिमे, प्रियंका मधाळे, रवि ननावरे, दत्ता जाधव, आबा जगताप, मिलिंद पोकळे, किशोर मारणे, पप्पू सुर्यवंशी आदींसह असंख्य काँग्रेसजण सहभागी होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: