MENU MENU

TheKarbhari

SEARCH
  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र

World Divyang Day |PMC Pune दिव्यांगाच्या जुन्या योजनात बदल करून नवीन योजना आणणार | अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमणार यांचे आश्वासन 

HomeपुणेBreaking News

World Divyang Day |PMC Pune दिव्यांगाच्या जुन्या योजनात बदल करून नवीन योजना आणणार | अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमणार यांचे आश्वासन 

कारभारी वृत्तसेवा Dec 13, 2023 3:18 PM

International Divyang Day | पुणे येथे बाल आनंद मेळावा संपन्न
PMC Special Children School | पुणे महापालिकेच्या विशेष मुलांच्या शाळेत दिव्यांग दिन साजरा!
Divyang Day | अभ्यास सहलीतून कर्णबधिर दिव्यांगांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य! | शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांचा दिव्यांग विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी स्तुत्य उपक्रम

World Divyang Day |PMC Pune दिव्यांगाच्या जुन्या योजनात बदल करून नवीन योजना आणणार | अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमणार यांचे आश्वासन

World Divyang Day |PMC Pune | पुणे महानगरपालिकेमध्ये (Pune Municipal Corporation) दिव्यांगा साठी या वर्षात काही नविन योजना सुरू करण्यात येणार असून, काही जुन्या योजनांमध्ये बदल करण्यात येणार आहेत. योजनांचा जास्तीत जास्त दिव्यांग नागरिकांना लाभ व्हावा यासाठी प्रसिद्धी व प्रचार करणेत येणार असून दिव्यांगांना सोशल मिडीयाचा वापर करता यावा, यासाठी केंद्र, राज्य व स्थानिक संस्थेमार्फत माहिती देणेत येईल व मदत केली जाईल. असे आश्वासन महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमणार (IAS Dr Kunal Khemnar) यांनी दिले. (World Divyang Day |PMC Pune)

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त पुणे महानगरपालिका, समाज विकास विभागाच्या वतीने पुणे शहरातील दिव्यांग नागरिकांसाठी आज बालगंधर्व रंगमंदिर, शिवाजीनगर, पुणे -५ येथे सकाळी ११.०० ते दु. ३.०० या वेळेत कार्यक्रम आयोजित करणेत आला होता. सदर कार्यक्रमाची सुरूवात मा. श्री. प्रविण पुरी, दिव्यांग आयुक्त, दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र शासन, मा. डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ.), पुणे महानगरपालिका तसेच दिव्यांग संघटना प्रतिनिधी यांचे शुभहस्ते दिप प्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत श्री. नितीन उदास, उप आयुक्त, समाज विकास विभाग यांनी केले.

कार्यक्रम प्रसंगी पुणे महानगरपालिका हद्दीतील विविध दिव्यांग प्रवर्गातील व एका सामाजिक संस्था प्रतिनिधी यांच्यातून निवड झालेले दिव्यांग समन्वय समिती सदस्य श्री. रफीक खान, श्री. बाबासाहेब राऊत, श्री.पन्नालाल निकम, श्री. सुजित गोयर, श्री. राजेंद्र जोग यांचा सत्कार करणेत आला. तसेच दिव्यांग घटकांतर्गत शैक्षणिक, क्रिडा, सामाजिक, कला, सांस्कृतिक इ. क्षेत्रात विशेष कार्य केलेल्या संतोष गाढे, सुदिप्ता जैन, पूनम उमाप, नरेंद्र गुप्ता, राघव बारवकर, रेखा पडवळ, डॉ. स्वाती सदाकळे, अशोक मोरे, प्रकाश चव्हाण, मारिप्पा अचकेरी, सविता बियानी, प्रियांका दबडे, प्रमोद वैशंपायन, सचिन ओव्हाळ, प्रदीप ताम्हाणे, दिलीप लोखंडे, दिलीप सोनवणे, बिलकास पठाण, हरी तुपसमुद्रे, रामचंद्र कंक, धर्मेंद्र सातव, बाबूराव पुजारी, ज्ञानेश्वर शिंदे, पन्नालाल निकम, रमेश नंदनवार, सतिश सावंत, सचिन पडवळ, अजय पालांडे, बंडु तळीखेडकर, तृप्ती चोरडिया, हरिदास शिंदे, महिला व्हिल चेअर बास्केटबॉल संघ, आकाश कुंभार, कॅप्टन लुईस जॉर्ज मेप्रथ, सुवर्णा लिमये, मेघना मुनोत, पुरूष व्हिल चेअर रग्बी संघ, प्रवीण सोलनकर, पंकज साठे अशा एकुण -३९ दिव्यांगांचा गौरव चिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरव
करणेत आला. तसेच पुणे महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या दिव्यांग कल्याणकारी योजनेच्या ५ लाभार्थ्यांना धनादेश वाटप करणेत आले.

दिव्यांगांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, तसेच विविध उपचार पद्धती व कृत्रिम अवयव, योजना यांची माहिती व्हावी, यासाठी कार्यक्रम स्थळी ग्रो बेटर स्किल्स-रेड्डीज फाऊंडेशन, समर्थनम ट्रस्ट फॉर डिसेबल्ड,
नव भारत विकास फाऊंडेशन, रिगेन पेडीअॅट्रिक थेरपी सर्विसेस या संस्थांचे व समाज विकास विभागाचे स्टॉल लावणेत आले व माहिती देण्यात आली. कार्यक्रमाच्या वेळी यापुर्वी योजनेचा लाभ घेतलेल्या यशस्वी दिव्यांग लाभार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच दिव्यांग संघटना प्रतिनिधींनी आपल्या मनोगतात दिव्यांग कल्याणकारी योजना अधिक प्रभावीपणे कशा
राबवाव्यात तसेच कालानुरूप व गरजेनुसार काय बदल करण्यात यावे, दिव्यांगांनी शिक्षण घ्यावे यासाठी चांगल्या प्रकारच्या शैक्षणिक योजना तसेच आरोग्यासाठी वैद्यकिय योजना असाव्यात, याबाबत आपल्या स्पष्ट सुचना मांडल्या.

 प्रविण पुरी, दिव्यांग आयुक्त, दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र शासन यांनी आपले मनोगतामध्ये उत्कृष्ट कार्याबद्दल गौरविण्यात आलेल्या दिव्यांगाचे कौतुक केले व प्रोत्साहन केले. शासन स्तरावर दिव्यांगासाठी
आवश्यक सर्व सहकार्य केले जाईल. तसेच आजच्या मेळाव्यासाठी दिव्यांग नागरिकांकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला असून अन्य राज्यांमध्ये जसे विविध दिन साजरे केले जातात तसेच दिन पुणे महानगरपालिकेनेही साजरे करावेत, असे सांगितले व दिव्यांगांना कार्यक्रमाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रीय दृष्टीहिन संघ या संस्थेचा विविध गुणदर्शन (ऑर्केस्ट्रा) कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री. राजेंद्र मोरे, सहाय्यक समाज विकास अधिकारी, तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. असंग पाटील, उप समाज विकास अधिकारी, समाज विकास विभाग यांनी केले.

सदर कार्यक्रमास मा. श्री. प्रविण गिरी, दिव्यांग आयुक्त, दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र शासन, डॉ. श्री. कुणाल खेमनार, अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ.), मा. श्री. नितीन उदास, उप आयुक्त, समाज विकास विभाग, मा. श्री. रामदास चव्हाण, मुख्य समाज विकास अधिकारी, मा.श्री. असंग पाटील, उप समाज विकास अधिकारी, मा. सहाय्यक समाज विकास अधिकारी श्री. संदीप कोळपे, श्री. राजेंद्र मोरे, श्रीमती पुजा पवार,
श्री. रामदास धावडे, समाज सेवक, संदीप कांबळे, सुजाता टिळेकर, श्रीमती सुवर्णा खेंगरे व समाज विकास विभागाकडील अधिकारी / कर्मचारी तसेच दिव्यांग सामाजिक संस्था, दिव्यांग संघटना स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी,
सभासद व इतर मान्यवर उपस्थित होते.

—- Join Our Whattsapp Channel 
Breaking News 6023 cultural 808 PMC 3429 social 3514 पुणे 6324 Divyang day 4 IAS Dr Kunal Khemnar 10 Nitin Udas 5 PMC Pune 1506 PMC Social Devlopment Department 13 Pune Municipal Corporation 1129 pune news 1959 Ramdas Chavan 1 World Divyang Day 1

AUTHOR: कारभारी वृत्तसेवा

कारभारी वृत्तसेवा 's Author avatar
Ganesh Kumar Mule Education - B.Sc. (Microbiology) B.M.C.J (Bachelor of Mass Communication and Journalism) M.J. (Master of Journalism) Active in Journalism field for last 15 years. Founder-Editor...

RECOMMENDED FOR YOU

Loading...
Newer Post
PMC pune Employees | समाविष्ट गावातील कर्मचारी समावेशनामुळे मूळ कर्मचाऱ्यांवर अन्याय | कर्मचाऱ्यांची आयुक्तांकडे तक्रार
Older Post
Pune Pustak Mahotsav | PMC Pune | पुणे महापालिका विश्वविक्रम करणार
Quote Widget Background

MAIN QUOTE

घडलो नसतो मी जर शिकली नसती माली माय, जर नसत्या सावित्रीबाई तर कशी शिकली असती माली माय.
- सावित्रीबाई फुले

RECENTS

PMC Deputy Commissioner | महापालिका उपायुक्त यांच्या कामकाज व्यवस्थेत बदल! | माधव जगताप यांच्याकडील आपत्ती व्यवस्थापन विभाग संदीप खलाटे यांच्याकडे!

PMC Deputy Commissioner | महापालिका उपायुक्त यांच्या कामकाज व्यवस्थेत बदल! | माधव जगताप यांच्याकडील आपत्ती व्यवस्थापन विभाग संदीप खलाटे यांच्याकडे!

PMC Junior Engineer Recruitment  | पुणे महापालिकेतील कनिष्ठ अभियंता भरतीचा मार्ग मोकळा!  | १७१ पदांसाठी सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्याचे राज्य सरकारचे आदेश 

PMC Junior Engineer Recruitment  | पुणे महापालिकेतील कनिष्ठ अभियंता भरतीचा मार्ग मोकळा!  | १७१ पदांसाठी सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्याचे राज्य सरकारचे आदेश 

PMC – PCMC Election 2025 | प्रभाग रचनेचे वेळापत्रक जाहीर | अंतिम प्रभाग रचना ४ सप्टेंबरला 

PMC – PCMC Election 2025 | प्रभाग रचनेचे वेळापत्रक जाहीर | अंतिम प्रभाग रचना ४ सप्टेंबरला 

Smart E Bus MSRTC | स्मार्ट ई-बस लवकरच एसटीच्या ताफ्यात दाखल होतील – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Smart E Bus MSRTC | स्मार्ट ई-बस लवकरच एसटीच्या ताफ्यात दाखल होतील – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Add title

PMC Deputy Commissioner | महापालिका उपायुक्त यांच्या कामकाज व्यवस्थेत बदल! | माधव जगताप यांच्याकडील आपत्ती व्यवस्थापन विभाग संदीप खलाटे यांच्याकडे!
administrative

PMC Deputy Commissioner | महापालिका उपायुक्त यांच्या कामकाज व्यवस्थेत बदल! | माधव जगताप यांच्याकडील आपत्ती व्यवस्थापन विभाग संदीप खलाटे यांच्याकडे!

PMC Deputy Commissioner | महापालिका उपायुक्त यांच्या कामकाज व्यवस्थेत बदल! | माधव जगताप यांच्याकडील आपत्ती व्यवस्थापन विभाग संदीप खलाटे यांच्याकडे! & [...]
Read More
PMC Junior Engineer Recruitment  | पुणे महापालिकेतील कनिष्ठ अभियंता भरतीचा मार्ग मोकळा!  | १७१ पदांसाठी सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्याचे राज्य सरकारचे आदेश 
administrative

PMC Junior Engineer Recruitment  | पुणे महापालिकेतील कनिष्ठ अभियंता भरतीचा मार्ग मोकळा!  | १७१ पदांसाठी सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्याचे राज्य सरकारचे आदेश 

PMC Junior Engineer Recruitment  | पुणे महापालिकेतील कनिष्ठ अभियंता भरतीचा मार्ग मोकळा!  | १७१ पदांसाठी सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्याचे राज्य सरकारच [...]
Read More
PMC – PCMC Election 2025 | प्रभाग रचनेचे वेळापत्रक जाहीर | अंतिम प्रभाग रचना ४ सप्टेंबरला 
administrative

PMC – PCMC Election 2025 | प्रभाग रचनेचे वेळापत्रक जाहीर | अंतिम प्रभाग रचना ४ सप्टेंबरला 

PMC - PCMC Election 2025 | प्रभाग रचनेचे वेळापत्रक जाहीर | अंतिम प्रभाग रचना ४ सप्टेंबरला   Pune Municipal Corporation Election 2025 - (The K [...]
Read More
Site Logo
The Karbhari Pune

PAGES

  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र

PAGES

  • Home
  • Country/Abroad
    • India
      • General Knowledge
      • Geographical
    • Abroad
      • Germany
  • Maharashtra
    • Nagpur
    • Mumbai
      • Central Mumbai
      • Western Mumbai
      • South Mumbai
    • Sambhajinagar
    • Pune
      • News
      • Urban
      • Rural
  • Editorial
  • Hindi News
    • Cricket
    • Astrology
    • Career

SUBSCRIBE

© 2024 TheKarbhari. All Rights Reserved