Sanjay More | कसब्यात पराभव झाल्याने भाजप आणि मित्र पक्षाला मिळकतकर आठवला  | शहर प्रमुख संजय मोरे यांचा आरोप

HomeBreaking Newsपुणे

Sanjay More | कसब्यात पराभव झाल्याने भाजप आणि मित्र पक्षाला मिळकतकर आठवला | शहर प्रमुख संजय मोरे यांचा आरोप

Ganesh Kumar Mule Mar 08, 2023 2:24 PM

Navratri Mahostav | “आम्ही चालू ठेवू पुढे हा वारसा” | पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात लहान मुले रमली ‘चिंटू’समवेत चित्रांमध्ये!
MLA Sunil Tingre | आमदार सुनिल टिंगरे 6 एप्रिल पासून बसणार उपोषणाला ! कारण जाणून घ्या
Recruitment News | नगर रचना विभागाच्या शिपाई पदाची परीक्षा २५ नोव्हेंबर रोजी

कसब्यात पराभव झाल्याने भाजप आणि मित्र पक्षाला मिळकतकर आठवला

| शहर प्रमुख संजय मोरे यांचा आरोप

पुणे | मागील आठ  महिन्यापासून सरकार असूनही 40% मिळकतकर सवलतीबाबत भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाने काही निर्णय घेतला नाही. याना पुणेकरांच्या वाढीव मिळकत कराबाबत काही देणेघेणे नाही आणि नव्हते. परंतु कसबा विधानसभा पोटनिवडणूकीत मविआ कडून सडकून पराभव झाल्यानंतर या दोन्ही पक्षांमधील पुतना मावशीचे प्रेम जागे झाले आहे. असा आरोप उद्धव ठाकरे गटाचे पुण्याचे शहर प्रमुख संजय मोरे यांनी केला आहे.
मोरे यांनी दिलेल्या निवेदनानुसार पुणे महानगरपालिकेने मिळकत करातील 40% सवलत रद्द केली. 2019 पासूनच्या सवलतीची रक्कम 2022 – 2023 यावर्षीच्या बिलामधे आकारल्याने नागरिकांमधे नाराजी असल्याचे शिवसेना पुणे शहराचे वतीने 8 जून 2022 रोजी तत्कालीन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना समक्ष भेटून लेखी पत्राद्वारे निवेदन दिले होते. आजपर्यंत काहिच निर्णय घेतला नाही. मागील आठ  महिन्यापासून यांचे सरकार असूनही याबाबत भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाला पुणेकरांच्या वाढीव मिळकत कराबाबत काही देणेघेणे नाही आणि नव्हते. परंतू कसबा विधानसभा पोटनिवडणूकीत मविआ कडून सडकून पराभव झाल्यानंतर या दोन्ही पक्षांमधील पुतना मावशीचे प्रेम जागे झाले. नागरिकांनी झिडकरल्यानंतर यांना मिळकत कर आठवला.
आठ महिन्यापासून शांत का बसले याचे उत्तर अगोदर यांनी द्यावे. पुणेकर नागरिक सुजाण आहेत. त्यांना चांगले माहिती आहे. मागील जूनमधे शिवसेनेने हा प्रश्न नगरविकास मंत्र्यांकडे मांडला. परंतू तेव्हा ते पुढच्या फुटीच्या प्लॅनिंगमधे व्यस्त असल्याने नागरिकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळच नव्हता. असे ही मोरे यांनी म्हटले आहे.