समाविष्ट गावांच्या मूलभूत विकासावर सरकारचे लक्ष आताच का?
: विविध कामासाठी 4 कोटींचे अनुदान महापालिकेला प्रदान
पुणे : महापालिका हद्दीत नवीन 34 गावांचा समावेश झाला आहे. मात्र ही गावे मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. महापालिका आणि सरकार कडून अनुदान घेऊन इथे कामे केली जाणार आहेत. त्यानुसार सरकारने गावांना निधी देण्यास सुरुवात केली आहे. गावामध्ये विविध विकासकामे करण्यासाठी सरकार कडून नुकताच 4 कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे. मात्र आताच म्हणजे निवडणुकांच्या तोंडावरच हा निधी का उपलब्ध करण्यात येत आहे. यावरून मात्र राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
: ही कामे केली जाणार
– फुरसुंगी येथील सर्व्हे नं २०५ या ठिकाणी बहुउददेशीय सभागृह बांधणे. : ३५ लाख
– फुरसुंगी येथील मॅजेस्टिक अॅक्वा सोसायटीचा अॅमेनिटी स्पेसमध्ये गार्डन/ जॉगिग ट्रॅक / ओपन जिम करणे.ता हवेली जि पुणे : 40 लाख
– उरुळीदेवाची येथील सर्वे नं १५१ येथील सावली सोसायटी समोरिल मोकळया जागेवर भाजी मंडई बांधणे.ता हवेली जि पुणे : 35 लाख
– उंड्री येथील सर्व्हे नं २/१अ, २/१ब, ३/२/१ व ३/१/२ व ३/२/२
ओपन स्पेस क्षेत्र ५१०९.९२ चौ मी. विकसित करणे. ता हवेली जि पुणे : 50 लाख
ओपन स्पेस क्षेत्र ५१०९.९२ चौ मी. विकसित करणे. ता हवेली जि पुणे : 50 लाख
-आंबेगाव परिसरामध्ये विन्डसर कांऊटी सोसायटी सर्वे नं ३९/२५ पी,३९/१८/१, १९/१९/२० मध्ये अॅमेनिटी स्पेस क्षेत्र १६४०.२९ स्क्वे मी व आरक्षण क्षेत्र २१४३.२५ स्क्वे. मी. एकुण ३७८३.६४ स्क्वे मी येथे गार्डन/जॉगींग ट्रॅक / ओपन जीम बांधणे.ता हवेली जि पुणे : 40 लाख
आंबेगाव परिसरामध्ये श्री बालाजी सहकारी गृहनिर्माण संस्था लि. पुणे ६ । सर्व्हे नं २८ या ठिकाणी अॅमेनिटी स्पेस जागेवरती बहुउददेशीय सभागृह बांधणे.ता हवेली जि पुणे : 40 लाख
COMMENTS