Water Cut : Thursday : शहरात गुरुवारी ‘या’ भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद  : शुक्रवारी कमी दाबाने पाणी 

HomeBreaking Newsपुणे

Water Cut : Thursday : शहरात गुरुवारी ‘या’ भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद  : शुक्रवारी कमी दाबाने पाणी 

Ganesh Kumar Mule Jan 24, 2022 7:58 AM

MLA Sunil Tingre | पुण्यातील तीनपट कराबाबत लोकहिताचा निर्णय घेणार | उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन | आमदार सुनील टिंगरे यांनी उपस्थित केला होता मुद्दा
Standing Commitee : PMC : स्थायी समिती बैठकीतील महत्वाचे निर्णय जाणून घ्या
Draft Voter List | प्रारूप मतदार याद्यामुळे संभ्रमाचे वातावरण!  | इच्छुकांचे टेन्शन वाढले 

शहरात गुरुवारी ‘या’ भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद

: शुक्रवारी कमी दाबाने पाणी

पुणे : २७ जानेवारी म्हणजे गुरुवारी वारजे जलकेंद्र, खडकवासला उपसा (raw water)केंद्र तसेच रायझींग मेन लाईनवर स्थापत्य, विद्युत व यांत्रिकी विषयक कामे करावयाचे असल्यामुळे त्या काळात वारजे जलकेंद्र येथील पंपींग बंद ठेवावे लागणार आहे. त्यामुळे वारजे व पाषाण जलकेंद्र व नवीन होळकर जलकेंद्र यांना होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी उशीरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. असे महापालिकेच्या वतीने कळवण्यात आले आहे.

पाणीपुरवठा बंद असणारा भाग

(वारजे जलकेंद्र):- भुसारी कॉलनी, शास्त्रीनगर, बावधन, भुगाव रोड परिसर, सूस रोड, बाणेर, बालेवाडी, पाषाण, वारजे हाय-वे परिसर,रामनगर,कर्वेरोड परिसर, एरंडवणा,कोथरुड,डेक्कन जिमखाना परिसर, जयभवानीनगर, सुतारदरा, डहाणूकर कॉलनी, परमहंसनगर, कर्वेनगर, गांधीभवन, महात्मा सोसायटी, हिंगणे होम कॉलनी, हॅपी कॉलनी, गोसावी वस्ती, कॅनॉल रोड, वारजे जकातनाका परिसर इ.
नवीन होळकर जलकेंद्र :  कळस, धानोरी, विमाननगर, लोहगाव पंचायत, शिवाजीनगर, भोसलेनगर, घोलेरोड, सेनापती बापट रोड, बोपोडी, खडकी, हनुमाननगर, जनवाडी, वैदुवाडी, मॉडेल कॉलनी, वडारवाडी, रेव्हेन्यु कॉलनी, पोलीस लाईन, मुळा रोड, संगमवाडी, पाटिल इस्टेट,भांडारकर रोड इत्यादी .

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0