Warje Multispeciality Hospital PMC | वारजे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संदर्भातील फाईल्स दाखवण्यास आरोग्य विभागाकडून टाळाटाळ!

Homeadministrative

Warje Multispeciality Hospital PMC | वारजे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संदर्भातील फाईल्स दाखवण्यास आरोग्य विभागाकडून टाळाटाळ!

Ganesh Kumar Mule Mar 17, 2025 7:45 PM

Aapla Dawakhana Yojana PMC Pune | पुणे महापालिका 58 ठिकाणी सुरु करणार ‘आपला दवाखाना’ योजना
Walk-in cooler system for storing vaccine stock of Pune Municipal Corporation is working
Shivsena Pune (UBT) –  शहरात उदभवलेल्या साथीच्या आजारा बाबत उपाययोजना करा | शिवसेना ठाकरे गटाची महापालिका आयुक्तांकडे मागणी 

Warje Multispeciality Hospital PMC | वारजे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संदर्भातील फाईल्स दाखवण्यास आरोग्य विभागाकडून टाळाटाळ!

| विवेक वेलणकर यांचा आरोप

 

PMC Health Department – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका (Pune Municipal Corporation – PMC) ही देशातील पहिली महापालिका आहे जिथे गेल्या १५ वर्षांपासून नागरीकांना दर सोमवारी दुपारी ३ ते ५ या दरम्यान महापालिकेच्या कोणत्याही फाईल्स बघायला मिळतात. यासंदर्भात महापालिकेत अनेक ठिकाणी तसे फलकही प्रदर्शित करण्यात आले आहेत. मी यापूर्वी आपल्या कार्यालयासह अनेक कार्यालयांत ही पाहणी केली आहे. फेब्रुवारी महिन्यात ३ व १७ तारखेच्या सोमवारी मी वारजे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संदर्भातील फाईल्स बघायला मागितल्या मात्र आता एक महिना होऊन गेला तरी या फाईल्स मला अजूनही दाखवल्या गेलेल्या नाहीत , किंबहुना त्या जाणूनबुजून दाखवल्या जात नाहीत. असे माझे स्पष्ट मत झाले आहे. असा आरोप सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर (Vivek Velankar) यांनी केला आहे. तसेच याबाबत महापालिका आयुक्त यांच्याकडे आरोग्य विभागाची तक्रार केली आहे. (Pune PMC News)

वेलणकर यांनी याबाबत महापालिका आयुक्त यांना निवेदन दिले आहे. त्यानुसार  कदाचित यातील काही चुका दुरुस्त करण्यासाठी वेळ लागत असावा अशी मला रास्त शंका वाटते. आज ( १७ मार्चला) मला फाईल्स बघायला येण्याबाबतसहायक आरोग्य अधिकारी डॉ संजीव वावरे  यांच्याकडून कळवले गेले होते. मात्र कंत्राटाची प्रत वगळता अनेक महत्वाची कागदपत्रे उपलब्ध नव्हती. कंत्राटाप्रमाणे १२० दिवसांत Detailed project report (DPR) कंत्राटदाराने सबमिट करणं आवश्यक होतं . कंत्राट ऑगस्ट २०२३ मध्ये झालं म्हणजे डिसेंबर २०२३ पर्यंत DPR सबमिट होणं अपेक्षित होतं , पण आजही मनपा आरोग्य विभाग हा DPR दाखवू शकत नाही , त्यामुळे कंत्राटदाराने हा DPR सबमिटच केला नसावा असा संशय वाटतो. कंत्राटदाराने कंत्राटाच्या ५% रक्कमेची बॅंक गॅरंटी १८० दिवसांत महापालिकेला देणे अपेक्षित होते , पण अशी बॅंक गॅरंटी मिळाल्याचे आरोग्य विभाग दाखवू शकत नाही. त्यामुळे अशी बॅंक गॅरंटी कंत्राटदाराने दिली आहे की नाही याबद्दल संशय उत्पन्न होतो. या कामावर लक्ष ठेवण्यासाठी महापालिकेने एक समिती नेमणं अपेक्षित होतं. त्याचीही माहिती आरोग्य विभाग दाखवू शकला ना, त्यामुळे अशी समिती स्थापन तरी झाली आहे का याचा संशय येतो.‌ असे वेलणकर यांनी म्हटले आहे.

—–

करार झाल्यापासून ३ वर्षांत हाॅस्पिटलचे बांधकाम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र आज दीड वर्ष झालं तरी अजून कामाला सुरुवातही झालेली नाही. गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीआधी राज्याचे मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले होते. या पार्श्वभूमीवर अजून कामाला सुरुवातही न होणे हे नक्कीच उद्वेगजनक आहे. आमची मागणी आहे की महापालिका आयुक्त यांनी तातडीने या प्रकल्पाची सद्यस्थिती, DPR , bank guarantee , समिती याबाबतची संपूर्ण माहिती प्रदर्शित करण्याचे आदेश आरोग्य विभागाला द्यावेत.

—– विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच, पुणे

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: