Vikas Lawande News | विकास लवांडे यांच्यावरील हल्ल्याचा शरद पवार पक्षाकडून निषेध व्यक्त

Homeadministrative

Vikas Lawande News | विकास लवांडे यांच्यावरील हल्ल्याचा शरद पवार पक्षाकडून निषेध व्यक्त

Ganesh Kumar Mule May 09, 2026 8:05 PM

Rent Agreement Clauses | तुम्ही पण भाड्याने राहता का? ही 8 कलमे भाडे करारामध्ये समाविष्ट करणे आवश्यक | अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता
Pune Politics | शिवसेनेचे माजी नगरसेवक ॲड. अविनाश साळवे यांचा कॉंग्रेस मध्ये प्रवेश
Baburaoji Gholap College | दिल्लीत होणार्‍या पथसंचलनासाठी राष्ट्रीय छात्र सेनेची छात्र कु. अनुष्का सचिन साठे हिची निवड

Vikas Lawande News | विकास लवांडे यांच्यावरील हल्ल्याचा शरद पवार पक्षाकडून निषेध व्यक्त

 

NCP SCP Pune – (The Karbhari News Service) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र शब्दांत जाहीर निषेध करण्यात आला आहे. (Pune Breaking News)

पक्षाचे पुणे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन विकासजी लवांडे यांची विचारपूस केली तसेच त्यांचा दूध अभिषेक करून घडलेल्या घटनेचा निषेध नोंदविला.

यावेळी बोलताना श्रीकांत पाटील म्हणाले की, “वारकरी संप्रदाय हा संतांच्या विचारांचा आणि शांततेचा मार्ग दाखवणारा आहे. वारकरी संप्रदाय कधीही काळ्या रंगाचा वापर करणार नाही, कारण काळा रंग हा आमच्या विठुराय माऊलीचा रंग आहे. काही टवाळखोर प्रवृत्ती वारकरी संप्रदायाचे नाव घेऊन समाजात हिंसा आणि तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, हा प्रकार अत्यंत निषेधार्ह आहे.”

पुणे शहर हे सांस्कृतिक परंपरा, संत विचार आणि वारकरी संप्रदायाची भूमी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाते. देहू-आळंदीच्या पवित्र परंपरेचा वारसा लाभलेल्या या पुण्यनगरीत काही प्रवृत्तींकडून हिंसक प्रकार घडवून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.

हा संघर्ष विचारांचा असून तो लोकशाही मार्गाने आणि विचारांनीच लढला गेला पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. मात्र काही व्यक्ती जाणूनबुजून हिंसाचाराला खतपाणी घालून वारकरी संप्रदायालाही बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रवृत्ती आम्ही यापुढे सहन करणार नाही.

घडलेल्या प्रकाराचा आम्ही जाहीर निषेध करीत असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करीत आहोत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: