Video | Mock Drill | PMC Pune | पुणे महापालिकेत धमाका होतो तेंव्हा ..! 

HomeBreaking Newsपुणे

Video | Mock Drill | PMC Pune | पुणे महापालिकेत धमाका होतो तेंव्हा ..! 

Ganesh Kumar Mule Oct 13, 2022 1:58 PM

PMC Employees | Time-bound promotions | महापालिका कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नतीचा लवकरच मिळणार लाभ! 
Security Guard Issues | मनपा सुरक्षारक्षकांना न्याय देणार |अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमनार
Metro | Shivsena | पुणे मेट्रोचे स्ट्रक्चरल व फायर ऑडिट करा | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ची मागणी

पुणे महापालिकेत धमाका होतो तेंव्हा ..!

| अग्निशमन दलाचे मॉक ड्रील

 जागतिक आपत्ती निवारण दिनाचे औचित्य साधून गुरुवारी
सायंकाळी ५.०० वा. पुणे अग्निशमन दलाने महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये मॉक ड्रील आयोजित केले होते. त्याप्रमाणे महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर बॉम्ब सदृश आवाजाने धमाका होताच महापालिका हादरली. त्यावेळी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांना हि कदाचित याची कोणतीही पूर्व कल्पना नसल्याने एकच धांदल उडाली होती. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले असता, घटनास्थळी या वेळी अधिकारी व जवान यांनी परिस्थिती अगदी उत्तमरित्या हाताळत दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी  देवेंद्र पोटफोडे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण कार्यवाही यशश्वीरित्या पार पडली. नंतर हि मॉक ड्रील असल्याचे समजल्यावर उपस्थितांनी सुटकेचा निश्वास सोडला.

 

 

सायंकाळी ५.०० ची आणि महापालिकेत एकच मोठा धमाका होतो आणि आग लागते. अग्निशमन दलाला पाचारण होताच दलाचे दोन फायर टेंडर, एक रेस्क्यू व्हॅन, एक देवदूत वाहन, हायड्रोलिक प्लॅटफॉर्म व दोन रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचताच व नंतर सुरु होते प्रत्यक्ष कार्यवाही. ज्यामध्ये जवान आग विझवण्याचे कार्य करत असतानाच दुसऱ्या व चौथ्या
मजल्यावर अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढतात व दुसरीकडे जखमी झालेले नागरिक आणि फुटलेले सिलिंडर जवान बाहेर घेऊन येत आग पूर्ण विझवितात. त्याचवेळी जखमी नागरिकांना प्राथमिक उपचार देत रुग्णवाहिकेतून दवाखान्यात पाठविण्यात येते. संपूर्ण इमारत अंदाजे आठ मिनिटात योग्यरीत्या कोणालाही इजा न होता रिकामी करत हि सर्व कार्यवाही दलाचे अधिकारी व जवान यांनी अवघ्या दहा मिनिटात पूर्ण केली. सदरील नागरिकांसाठी हेच वैशिष्टपूर्ण व अभिमानस्पद आहे. जागतिक आपत्ती व्यवस्थापन दिनानिमित या मॉक ड्रीलमध्ये महापालिकेचे आपत्ती
व्यस्थापन कक्ष विभाग व त्यांचे प्रमुख  गणेश सोनुने आणि सुरक्षा विभाग व त्यांचे प्रमुख व  राकेश विटकर यांचे सहकार्य झाले. तसेच प्रत्यक्षात जर अशी घटना घडली तर आपण खरोखरच किती जागरूक आहोत हे या निमित्ताने तपासण्याची संधी मिळाली. या मॉक ड्रील मुळे झालेल्या तसदीबद्दल अग्निशमन दल दिलगिरी व्यक्त करत शहरातील इतर सरकारी कार्यालय व अन्य संस्था यांच्यामध्ये जागरूकता व जबाबदारी निर्माण व्हावी या दृष्टीकोनातून हे मॉक ड्रील आयोजित केले होते.