Vasant More | Pune Loksabha | अपेक्षेप्रमाणे पुणे लोकसभा निवडणूक होणार तिहेरी! | वसंत मोरे यांना वंचित बहुजन आघाडी कडून उमेदवारी

HomeBreaking Newsपुणे

Vasant More | Pune Loksabha | अपेक्षेप्रमाणे पुणे लोकसभा निवडणूक होणार तिहेरी! | वसंत मोरे यांना वंचित बहुजन आघाडी कडून उमेदवारी

गणेश मुळे Apr 02, 2024 4:16 PM

PMC Pre Monsoon Work | BJP Pune | पुणे महापालिकेने पावसाळा पूर्व कामे 90% पूर्ण केल्याचा दावा चुकीचा | पुणे भाजपचा आरोप
Murlidhar Mohol : Kirit Somaiya : किरीट सोमय्या धक्काबुक्की प्रकरण : महापौरांनी आयुक्तांना मागितला खुलासा 
Pune Loksabha 2024 | Sunil Devdhar | पुणे लोकसभेसाठी भाजपकडून सुनील देवधर यांच्या नावाची चर्चा!

Vasant More | Pune Loksabha | अपेक्षेप्रमाणे पुणे लोकसभा निवडणूक होणार तिहेरी!

| वसंत मोरे यांना वंचित बहुजन आघाडी कडून उमेदवारी

Pune politics – (The karbhari News Service) – पुणे लोकसभा निवडणूकीत (Pune Loksabha Election 2014) आता तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. कारण यात अपेक्षेप्रमाणे वसंत मोरे (Vasant More) यांनी उडी घेतली आहे. वंचित बहुजन आघाडीने (VBA)  वसंत मोरे यांना पुण्यासाठी उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता ही लढत मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol), रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि वसंत मोरे (Vasant More) यांच्यात होणार आहे. (Pune Politics)
पुणे लोकसभा निवडणूक कडे पूर्ण राज्य आणि देशाचे लक्ष लागून राहिले आहे. मुरलीधर मोहोळ यांच्या रूपात भाजपने मराठा उमेदवार समोर आणल्यानंतर महाविकास आघाडी अर्थात काँग्रेस ने रविंद्र धंगेकर यांच्या रूपात ओबीसी उमेदवार उभा केला होता. मात्र वसंत मोरे यांच्या रूपाने अजून एक मराठा उमेदवार या लढाईत उतरला आहे. वंचित बहुजन आघाडीने मोरे यांना उमेदवारी दिली आहे.
मोरे यांनी मनसे सोडल्या नंतर उमेदवारी साठी मोरे सगळे पर्याय अजमावून पाहत होते. यासाठी मोरे यांनी महाविकास आघाडी, मराठा मोर्चा असे सगळे दरवाजे ठोठावले होते. मनोज जरांगे पाटील यांना देखील मोरे भेटले होते. तसेच वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांच्याकडे देखील मोरे यांनी उमेदवारी मागितली होती. त्यानुसार वंचितने मोरे यांना उमेदवारी दिली आहे.
आता या लढतीत कुठल्या समाजाची मते निर्णायक ठरणार, याबाबत विविध तर्क लावले जात आहेत. तसेच मोरे यांच्या उमेदवारीने कुणाची मते विभागली जाणार, याबाबत देखील विविध कयास लावले जात आहेत. मात्र ही निवडणूक तिरंगी होणार हे सिद्ध झाले आहे.

बारामती लोकसभा निवडणुकीत वंचित सुप्रिया सुळेंना मदत करणार

वंचित बहुजन आघाडीने आज राज्यात 5 ठिकाणी आज आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये पुण्यासह, शिरूर, औरंगाबाद, परभणी आणि नांदेड लोकसभेचा समावेश आहे. वंचितने जाहीर केले आहे कि, बारामती लोकसभेसाठी वंचित उमेदवार देणार नाही. वंचित तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाला समर्थन देणार आहे.