Hadapsar – Mundhwa Ward office | पाण्याचा अपव्यय केल्याबद्दल तुकाई दर्शन, फुरसुंगी परिसरातील नागरिकांना महापालिकेकडून नोटीसा! | नागरिकांनी नोटिसांचा केला निषेध

HomeBreaking Newsपुणे

Hadapsar – Mundhwa Ward office | पाण्याचा अपव्यय केल्याबद्दल तुकाई दर्शन, फुरसुंगी परिसरातील नागरिकांना महापालिकेकडून नोटीसा! | नागरिकांनी नोटिसांचा केला निषेध

गणेश मुळे Apr 02, 2024 1:02 PM

Fursungi, Uruli Devachi Water Supply Scheme | फुरसुंगी, उरुळी देवाची पाणीपुरवठा योजनेसाठी राज्य शासनाकडून २४ कोटी सात लाख मंजूर | खा. सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नांना यश
Fursungi -Uruli Devachi Municipal Corporation | उरुळी देवाची आणि फुरसुंगी नगरपरिषद स्थापन करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी  | माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी 
Uruli Devachi and Fursungi | कचरा डेपोची जागा मनपा हद्दीत ठेऊन उरुळी व फुरसुंगी गावे वगळली जाणार! | मुख्य सभेसमोर प्रस्ताव 

Hadapsar – Mundhwa Ward office | पाण्याचा अपव्यय केल्याबद्दल तुकाई दर्शन, फुरसुंगी परिसरातील नागरिकांना महापालिकेकडून नोटीसा! | नागरिकांनी नोटिसांचा केला निषेध

Hadapsar Mundhwa Ward Office – (The Karbhari News Service) – हडपसर, मुंढवा क्षेत्रीय कार्यालय, लष्कर पाणी पुरवठा विभाग यांच्याकडून तुकाई दर्शन, फुरसुंगी भागात पाण्याचा अपव्यय केल्या बद्दल नागरिकांना नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. पण या नोटिसा देताना पुणे महानगरपालिकेने (Pune Municipal Corporation (PMC) कोणतीही शहानिशा व चौकशी केलेली नाही व त्या मागची करणेही पडताळून पाहिलेली नाहीत. यामुळे दोष नसलेल्याना सुद्धा नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. अशा पद्धतीने नागरिकांनी या नोटिसांचा निषेध केला आहे. (PMC Water Supply Department)

नागरिकांनी महापालिकेला दिलेल्या उत्तरानुसार पाहिले तर फुरसुंगी गाव पुणे महानगरपालिकेत (कोणत्याही मूलभूत सोई व्यतिरिक्त) २०१७ मद्धे समाविष्ट झाले व महानगरपालिकेने घरपट्टी व पाणीपट्टी आकारण्यास चालू केली पण पिण्या योग्य पाणी मिळण्यास २०२४ उजाडले म्हणजेच ७ वर्षे गेली. आजतागायत पाणी पुरवठ्याचे कोणतेही योग्य वेळापत्रक नाही, पाणी सोडणाऱ्याची मनमानी व हलगर्जीपणा याबाबत वेळोवेळी पुणेमहानगरपालिकेच्या १८००१०३०२२२ व ९६८९९००००२ या क्रमांकावर तक्रारी नोंदविल्या आहेत.  पुणेमहानगरपालिकेकडून कोणतीही दखल व कारवाई झाल्याचे दिसून आलेले नाही. (Pune PMC News)
पाणी पुरवठ्याचा कोणताही निश्चित दिवस, वेळ किंवा कोणतेही वेळापत्रक आजतागायत उपलब्ध नाही. बऱ्याच वेळेस नेमून दिलेल्या दिवशी पाणी सोडले जात नाही, पण जो दिवस पाणी न येण्याचा असतो.  त्याच दिवशी अचानक पाणी सोडले जाते. अगदी रविवारी सुद्धा पाणी सोडले गेलेले आहे. तसेच पाणी सोडण्याची वेळ निश्चित नसल्याने रात्री अपरात्री पाणी सोडण्यात येते कधी कधी तर रात्री २, ३
बऱ्याच वेळा तर पहाटे ४ वास्ता पाणी सोडले गेलेले आहे. पाणी सोडणाऱ्यांकडून पाणी सोडण्यास टाळाटाळ होताना दिसून आलेली आहे. यासंदर्भात पाणी सोडणाऱ्यांकडे चौकशीकेली केली असता, फोन न
उचलणे, उडवा उडवी ची उत्तरे देणे, एकमेकांची नवे सांगणे, एकमेकांवर
ढकलणे, उत्तर देण्यास टाळाटाळ करणे, मी कॉन्ट्रॅक्ट वर आहे, मला पर्मनंट वाल्याने सांगितले आहे त्याला फोन करा” व पर्मनंट
वाल्याला ला फोन केला तर तो कधीच फोन उचलत नाही. अनेकदा पाणी सोडून बंद करण्यास विसरून जाणे, नियोजित वेळे पेक्षा कमी वेळ पाणी सोडणे, पाणी सोडले तर कमी दाबाने पाणी सोडणे, एकाला
पाणी जास्त सोडणे एकाला कमी पाणी सोडणे, एकावेळेस अनेक ठिकाणी पाणी सोडून काम पटपट उरकणे, पाणी सोडण्यास पैशाची मागणी करणे, पाणी कधी येणार याची चौकशी करण्यास फोन केला तर
फोन न उचलणे अशा एक नाही तर अनेक कारणास्तव पाण्याचा अपव्यय होत आहे.
पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कोणाला पाणी जास्त जाते व कोणाला पाणी कमी जाते आहे का याची शहानिशा व चौकशी केलीगेलीली नाही. जुने पाण्याचे कोंढाळे काढलेले आहेत. ते पाणी पाइप
लावून वैयक्तिक टाकीमध्ये घेतले जाते का नाही व त्या पाण्याचा गैर वापर किंवा रस्त्यावर सोडले जात आहे का नाही याची शहानिशा केलेली नाही. दोष नसलेल्याना नोटिसा दिल्या गेलेल्या आहेत का? याची
शहानिशा केली गेलेली नाही. महत्वाचे म्हणजे ज्या व्यक्ती कडून महापालिकेने दोषी व्यक्तीची नवे घेतली आहेत ती व्यक्ती कोणाच्या दाबावा खाली, प्रभावाखाली किंवा सूडबुद्धीने, चूक नसणाऱ्यांची नवे सांगत नाही ना याचीही  चौकशी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून व जबाबदार अभियंते यांकडून केलीगेलीली नाही.
सर्व गोष्टी पाहता दिल्या गेलेल्या नोटिसान मध्ये कोणतेहि तथ्य उरत नाही, त्यामुळे दिलेल्या नोटिसा या चुकीच्या आहेत व त्या रद्ध करून तसे पत्र पुणे महानगरपालिकेने व हडपसर, मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाने पाठवावे. अशी मागणी नागरिकांनी केली आहे.