वानवडीकरांच्या सेवेत अद्ययावत ॲम्बुलन्स व शववाहिनी दाखल
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व एकलव्य प्रतिष्ठान यांच्या वतीने वानवडीकरांच्या सेवेसाठी अद्ययावत ॲम्बुलन्स व शववाहीनीचा लोकार्पण सोहळा आज ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते जगताप चौक वानवडी येथे पार पडला.
याप्रसंगी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष श्री.प्रशांत जगताप म्हणाले की, गेल्यावर्षी करोना महामारीच्या संकटात अनेक रुग्णांना ॲम्बुलन्सअभावी उपचाराविना ताटकळत राहावे लागले. त्याच वेळी माझ्या वानवडी प्रभागासाठी स्वतंत्र ॲम्बुलन्स व शववाहिनी उपलब्ध करून देण्याचे मी ठरवले होते. त्यानुसार आज पासून एक अद्यावत रुग्णवाहिका त्यांच्या सेवेत दाखल झाली असून वर्षाचे ३६५ दिवस कुठल्याही प्रकारचे शुल्क न आकारता ही रुग्णवाहिका आपल्या सेवेत हजर राहील.त्याचप्रमाणे उपचारादरम्यान मृत्यू पावलेल्या नागरिकांच्या सेवेत शववाहिनी देखील वर्षभर विनामूल्य हजर राहील.
या उद्घाटन सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, नगरसेविका रत्नप्रभा जगताप, सुदामराव जगताप, सुनील जांभूळकर, संदीप जगताप, .प्रफुल्ल जांभूळकर, सुरेश गव्हाणे, शिवराम जांभूळकर तसेच जयहिंद मंडळाच्या ज्येष्ठ नागरीक संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
COMMENTS