Ajit pawar : तोपर्यंत कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी करता येणार नाही

HomeBreaking Newsपुणे

Ajit pawar : तोपर्यंत कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी करता येणार नाही

Ganesh Kumar Mule Oct 17, 2021 9:34 AM

BJP : PMC Election : भाजपने या शिलेदाराकडे दिली पुणे महापालिका निवडणुकीची सूत्रे
Raj Thackeray on Pune Rain | राज ठाकरे यांनी जाणून घेतल्या पूरग्रस्तांच्या व्यथा 
Pune Mahanagarpalika Bharti | पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागात 89 पदांसाठी भरती!

….तोपर्यंत कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी करता येणार नाही

: उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका

राज्यावर कोरोना, वादळे, महापूर, अतिवृष्टी, अशी संकटे येत आहेत. यात भरडलेला शेतकरी जगला पाहिजे म्हणून विकासकामांना कात्री लावून मदत करत आहोत. अर्थसंकल्प सादर करताना अनेक संकटांशी सामना करावा लागत आहे. त्यामुळे जोपर्यंत राज्याची आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर येत नाही, तोपर्यंत कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी करता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जाहीर केली.

नियमित भरणा करणारे अजूनही लाभापासून वंचित आहेत

सोमेश्‍वर कारखान्याचा गव्हाण (Pune) पूजन व गाळप हंगाम प्रारंभ पवार यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप होते. आमदार संजय जगताप, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवाकाते, डॉ. दिगंबर दुर्गाडे, डी. के. पवार, संभाजी होळकर, राजवर्धन शिंदे, शहाजी काकडे, प्रमोद काकडे, नीता फरांदे, तुकाराम जगताप उपस्थित होते. पवार म्हणाले, दोन लाखांच्या वरील कर्जदार आणि नियमित भरणा करणारे अजूनही लाभापासून वंचित आहेत. पण त्यामुळेच तीन लाखांपर्यंत शून्य टक्के व्याजाने पीककर्ज देण्याचा निर्णय राज्याने घेतला आहे. गुंजवणीचे पाणी गराडे व नाझरे धरणातही सोडण्याचा आमचा प्रयत्न आहे. गुंजवणीबाबत मी, सुप्रिया सुळे, संजय जगताप, संग्राम थोपटेंची बैठक झाली. गुंजवणी-भोर यांचेही प्रश्‍न सुटले पाहिजेत आणि पुरंदरचीही जमीन ओलिताखाली आली पाहिजे म्हणून कसरत करावी लागत आहे. सोमेश्‍वरचा जादा ऊस आपल्याच भावात अन्य कारखान्यांनी न्यावा यासाठी प्रयत्नशील आहे. शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे म्हणाले, ‘‘माझ्याजवळ अजितदादा नावाचं सुप्रीम कोर्ट आहे. त्यामुळे माझा मुलगा जरी संचालक मंडळात असला तरी कामकाजात काही चुकीचे वाटल्यावर मी अजितदादांकडे दाद मागणार. शेतकरी कृती समिती कायम त्यांच्यासोबत राहील. मात्र एकरकमी एफआरपी शेतकऱ्यांना हवी आहे.’’ ‘भाजप’मधील आरोप करणाऱ्यांना आव्हान बंद कारखाने चालवायला घेण्यावरून भाजपमधून पवारांना टार्गेट केले जात आहे. संबंधितांना जाहीर आव्हान देताना पवार म्हणाले, ‘‘राज्य सहकारी बँकेने बारा सहकारी साखर कारखाने चालवायला देण्यासाठी टेंडर काढले आहे. ज्यांना वाटत असेल तिथल्या शेतकऱ्यांना आपण न्याय देऊ शकतो त्यांनी टेंडर भरा. चांगल्या भावासोबत बोनस-पगार-वाहतूक-तोडणी यापोटी चांगला मोबदला देणार असाल, तर जरूर कारखाना चालवायला घ्या.’

COMMENTS

WORDPRESS: 1
  • comment-avatar

    महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी निवडणुकीच्या वेळेस राज्यातील तमाम शेतकरी कष्टकरी कामगारांना विश्वासात घेताना भाजपा सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्ती व लाईट बिल वीज मुक्ती दिली नाही त्यावेळी अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्यात निवडणूका लढवताना आमचा पक्ष सत्तेत आला तर आम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची आश्वासन न देता डायरेक्ट आम्ही सर्व शेतकऱ्यांना पहील्या कॅबिनेट मधे कर्जमाफी देऊ अशा पद्धतीचे आश्वासने देऊन शेतकऱ्यांकडून मतांची मदत घेतली.
    शेतकऱ्यांना हमीभाव देऊ ऊसाला भरघोस एफआरपीपेक्षा जादा पैसे देऊ त्यानंतर दुधाला हमीभाव देऊन सगळ्या गोष्टीच्या वल्गना केलेल्या सर्व कॅसेट सर्व बातम्या सर्व त्यांच्या बातम्यांचे कात्रण शेतकरी संघटनेकडे आहेत हे सगळं असताना आज दोन वर्षे झाली हा पक्ष सत्तेवर ती आहे. ठीक आहे कोविडचं कारण होतं पण कोविड मध्ये महसूल वसुलीत कोणत्याही प्रकारे फरक पडला नाही. की महसूल कमीही झाला नाही.
    .. यांचा एक एक मंत्री दिवसाला महिन्याला शंभर शंभर कोटी रुपये वसूल करत असताना तो सापडला जातो आणि परवा अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री म्हणतात की शेतकऱ्यांना कर्ज माफी साठी सरकारच्या तिजोरीत पैसा नाही त.!
    पैसे आल्याशिवाय आम्ही कर्जमुक्ती देऊ शकत नाही पण अजितदादा पवार साहेब हे निवडणुकीच्या वेळेस काय बोलले होते त्याची आठवण मी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून त्यांना करून देणे आवश्यक आहे. त्यावेळेस ते शेतकरी कष्टकरी कामगारांना आणि शेतकऱ्यांना खास करून बोलले की आमचा पक्ष सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती मुक्त करेल आणि शेतकऱ्यांना कर्ज, विजमाफी देईल.
    आणि मी जर शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही तर आम्ही आमच्या बापाची अवलाद सांगणार नाही.? अशा प्रकारचं वार्तांकन त्यांनी जाहीर सभेमध्ये केलं होतं.! मोठ्या पवार साहेबांनी देखील विज बिल भरु नका, कर्जही भरु नका, आणी संदर्भामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ अशा पद्धतीनचं त्यांच्या सर्वच नेत्यांनी त्यांचे हवसे गवसे नवसे असे सगळे नेत्यांनी त्याच्यामध्ये हो करत शेती कर्ज विज बिल माफ केलंच समजा अशाप्रकारचे चे शब्द शेतकऱ्यांना दिले होते.
    अजितदादा ं चे सरकार सत्तेवर आलंही आता त्यांचे सरकारकडं शेतकऱ्यांसाठी पैसे नाहीयेत, कष्टकऱ्यांसाठी पैसे नाहीत, कामगारांसाठी पैसे नाहीये, त्च्याचेकडे मात्र आता आमदारांना यांनी एक एक कोटीचा अधिकचा निधी द्यायला यांच्याकडे पैसे आहेत.
    अगोदर त्यांना भरघोस निधी आमदारांना मिळाला यांच्याकडे पैसे आहे आमदार खासदार मंत्री यांच्या निधीला पॅकेजला यांच्याकडे कोट्यवधी रुपये आहे ते, मात्र यांना फक्त शेतकऱ्यांना कर्जमाफी विज बिल मुक्ती देण्यासाठी पैसे नाहीत. त्यांना शेतकऱ्याला श्रीमंत होऊ द्यायचेच नाही! शेतकऱ्यांना सक्षम होऊ द्यायचा नाही!
    हे आमच्यासाठी असा झाला आहे की भाजपाचे ठेवायचं झाकून आणि काँग्रेस-राष्ट्रवादीने पहायचं वाकून अशा पद्धतीची ही या सगळ्यांनी शेतकऱ्यांसाची दिशाभूल चालू केली आहे आम्ही या दोन्ही सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफी चे नावाने ” महात्मा फुले यांच्या नावाने कर्ज माफी योजना काढून महात्मा फुलेंना बदनाम केले आणि भाजपा सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कर्ज माफी योजना काढून शिवाजी महाराजांना देखील बदनाम केलं!
    मि म्हंतो या आघाडी सरकारला लाज वाटत कशी नाही खोटं बोलतात कि खोटेपणा सुद्धा यांच्यापुढे शरमेने चूर मधील खोटे बोलताय काय कामाला आहे अजितदादांची, ऊध्दवजी व बाळासाहेब थोरातांची,
    अता त्यांना पण यांना एक ना एक दिवशी महाराष्ट्र राज्यातल्या तरुण शेतकऱ्यांनी बदनाम कसं करायचं हे त्या फसलेल्या शेतकरी युवकांनी ठरवलं पाहिजे अशा पद्धतीचे माझं मत आहे .
    अन्यथा या सरकारने शेतकऱ्यांना कुठलीही सबब न सांगता सरसकट कर्जमाफी द्यावी रेगुलर कर्ज भरणाऱ्यांना कर्जमाफी अनुदान पॅकेज दिले पाहिजे अशा पद्धतीचा पत्र व्यवहार मी जवळपास दहा पंधरा वेळा राज्य व केंद्र सरकारला केलेला आहे कर्जमाफी दिल्याशिवाय, घेतल्या शिवाय या सरकारला आता शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटना सोडणार नाही. ये वादा रहा.
    जय किसान
    विठ्ठल पवार राजे
    प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक.
    शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महाराष्ट्र

DISQUS: 0