Economic recession | देशात जूननंतर आर्थिक मंदी येऊ शकते

HomeBreaking Newsपुणे

Economic recession | देशात जूननंतर आर्थिक मंदी येऊ शकते

Ganesh Kumar Mule Jan 16, 2023 6:46 AM

G 20 Conference | 16 आणि 17 जानेवारीला जी20 परिषदेच्या पायाभूत सुविधा कार्यगटाची बैठक पुण्यामध्ये
Marathi culture | G 20 | परदेशी पाहुण्यांनी धरला ढोल-लेझीमवर ठेका
G 20 in pune | जी20 पायाभूत सुविधा कार्यगटाच्या(IWG) दोन दिवसीय बैठकीचा आज  पुण्यामध्ये होणार प्रारंभ

देशात जूननंतर आर्थिक मंदी येऊ शकते

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केली चिंता

जी २० परिषदेला (G20 conference) आजपासून सुरुवात होत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union minister Narayan Rane) यांनी या परिषदेचे उद्घाटन केले आहे. आजपासून इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुप ची दोन दिवसीय बैठक सुरु होणार आहे. या बैठकीत सहभागी होणारे देश आणि संस्था पायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीच्या विविध पैलूंवर विचारमंथन करणार आहेत.

नारायण राणे यांनी या परिषदेचे उद्घाटन केले आहे. नारायण राणे म्हणाले, “मी स्वतःला भाग्यशाली समजतो की, जी २० या जागतिक परिषदेचे उदघाटन माझ्या हाताने झाले. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वात आपण देशाची प्रगती करत आहोत, आपल्या जीडीपीमध्ये कमालीची वाढ होत असून आठ वर्षापूर्वी आपला देश १० व्या क्रमांकावर होता. आपला आता देश ५ व्या क्रमांकावर आहे. ते केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणामुळे शक्य झाले आहे. येत्या १० वर्षांत आपण तिसर्‍या क्रमांकावर जाऊ अशी शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली. तसेच जागतिक मंदीवर भाष्य करताना राणे म्हणाले की, जगामध्ये आर्थिक मंदी मोठ्या देशांना आहे. भारताला त्याची झळ बसू नये आणि मंदी आली तर जूननंतर येईल. मंदीची झळ सामान्य नागरिकांना पोहचू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करत आहेत”, असेही नारायण राणे म्हणाले.

शहरांचे स्वरूप कसे असावे याचे मार्गदर्शन या परिषदेमधून मिळेल आणि याला केंद्र सरकार, राज्य सरकार निधी उपलब्ध करुन देतील. तसेच महाराष्ट्र प्रशासनाबद्दल मला अभिमान आहे. सरकार बदलले की निर्णय बदलतात, या मताशी मी सहमत नाही, मी ३२ वर्ष मंत्री होतो, निर्णय बदलत नाहीत तर  दृष्टिकोन बदलतो”, असे नारायण राणे यांनी स्पष्ट केले. तसेच अमेरिकेचा जी डी पी २० ट्रिलियन आहे. भारत ५ ट्रिलियनपर्यंत पोहचू पाहत आहे. देशाच्या प्रगतीसाठी, आर्थिक स्थिती भारताची सुधारावी. यासाठी केंद्र सरकारमार्फत विशेष उपाययोजना केल्या जात आहे. तसेच जी २० परिषदेमध्ये देखील यावर चर्चा होणार आहे. देशातील प्रत्येक नागरिकांना याचा फायदा होणार आहे. प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यावर परिषदेत विशेष चर्चा होणार असून केंद्र सरकार युद्ध पातळीवर पावल उचलत असल्याचे त्यांनी सांगितले. (Minister Narayan Rane)