Union Buget 2025 | मोदी सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांचा विसर | सचिन आडेकर
Sachin Adekar – (The Karbhari News Service) – छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर आणि त्यांची शपथ घेऊन, आशीर्वाद घेऊन सत्तेत आलेल्या मोदी सरकारने गेल्या दहा ते बारा वर्षापासून अरबी समुद्रातील शिवछत्रपतींच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचा केवळ उद्घाटन करण्यासाठी वापर करून छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील अपमान हे मोदी सरकार करत आहे. अशी प्रतिक्रिया सचिन आडेकर, समन्वयक मराठा क्रांती मोर्चा, पुणे शहर यांनी दिली आहे. (Budget 2025 News)
या बजेटमध्ये देखील अरबी समुद्रातील शिवछत्रपतींच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी कोणतेही तरतूद केलेली नाही. त्यामुळे याही वर्षी आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी शिवप्रेमींना वाट बघावी लागणार 2025 च्या बजेटमध्ये शिवस्मारकासाठी तरतूद नसल्याने मी अर्थमंत्री व केंद्रातील मोदी सरकारचा जाहीर निषेध करतो. असे सचिन आडेकर म्हणाले.
COMMENTS