UNI Global Union | सुरक्षा रक्षकांचे जागतिक संघटन करणार | जागतिक परिषदेत उमटला सूर!

HomeBreaking News

UNI Global Union | सुरक्षा रक्षकांचे जागतिक संघटन करणार | जागतिक परिषदेत उमटला सूर!

Ganesh Kumar Mule Sep 30, 2024 8:49 AM

Rashtriy Majdur Sangh (RMS) : Sunil Shinde : पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचे जागरण गोंधळ आंदोलन 
Hit And Run Law | हिट अँड रन कायदा वाहतूक संघटनांची चर्चा करूनच सरकारने राबवावा
RMS Women Wing | राष्ट्रीय मजदूर संघाची आता महिला आघाडी | महिला कर्मचाऱ्यांना दिलासा

UNI Global Union | सुरक्षा रक्षकांचे जागतिक संघटन करणार | जागतिक परिषदेत उमटला सूर!

 

 

Security Guard Issues- (The Karbhari News Service) – सुरक्षा रक्षकांच्या प्रश्नांसाठी यु एन आय ग्लोबल युनियन या जागतिक संघटनेने आयर्लंड देशांमधील ग्वालवे शहरांमध्ये तीन दिवसांची जागतिक परिषद आयोजित केली होती. या परिषदेमध्ये जगातील विविध देशांमधील 100 प्रतिनिधी उपस्थित होते. या परिषदेमध्ये वेगवेगळ्या देशातील कायद्यांच्या संदर्भामध्ये प्रत्येक देशातील प्रतिनिधींनी माहिती दिली. (Sunil Shinde RMS)

या जागतिक परिषदेचे उद्घाटन यु एन आय ग्लोबल युनियनच्या प्रॉपर्टी सर्विसेस विभागाच्या प्रमुख श्रीमती मीकेला लापार्टी यांच्या हस्ते करण्यात आले. या परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून एस इ आय यु या अमेरिकेतील संघटनेच्या प्रमुख राशीओ या उपस्थित होत्या.

 

या परिषदेमध्ये भारतातून राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष कामगार नेते सुनील शिंदे हे उपस्थित होते. या परिषदेमध्ये त्यांनी सुरक्षारक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत त्याचबरोबर भारतात व विशेषता महाराष्ट्रात असणाऱ्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक कायदा याबाबत माहिती दिली. या परिषदेमध्ये केनिया देशांमध्ये सुरक्षा रक्षकांचे देशपातळीवर मोठे संघटन उभारल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. या परिषदेमध्ये जगभरातून आलेल्या सर्व प्रतिनिधींनी जागतिक पातळीवर सुरक्षारक्षकांची संघटना उभी करून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेमध्ये कायदा करण्याबाबत सहमती दर्शवली.

तीन दिवस चाललेल्या या परिषदेचा समारोप यूएनआय ग्लोबल युनियनच्या जागतिक सरचिटणीस ख्रिस्ती होपमन यांच्या भाषणाने झाला. या परिषदेच्या समारोपाला ग्वालवे शहरातील आयरिश संस्कृतीमधील नृत्य व गाणी सादर करण्यात आली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0