Tushar Patil BJP | सिनरजी इमारतीच्या बांधकामात विकसकाने अनियमितता केली असल्याची तुषार पाटील यांची तक्रार | महापालिका शहर अभियंता यांच्याकडे कारवाईची केली मागणी 

HomeपुणेBreaking News

Tushar Patil BJP | सिनरजी इमारतीच्या बांधकामात विकसकाने अनियमितता केली असल्याची तुषार पाटील यांची तक्रार | महापालिका शहर अभियंता यांच्याकडे कारवाईची केली मागणी 

गणेश मुळे Feb 26, 2024 12:16 PM

PMC Deep Clean Drive | डीप क्लिन ड्राईव्हच्या माध्यमातून एकूण ९२ टन ओला कचरा, १३३ टन सुका कचरा, ८३७ टन राडारोडा व ७७ टन पालापाचोळा संकलित | महापालिका प्रशासनाचे सकारात्मक पाऊल
PMC Pune City AIDS Control Society |  Do you want to get exemption from Income Tax? | Then donate to this organization of Pune Municipal Corporation!  
PM Modi in Pune | पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघासाठी नरेंद्र मोदी यांची 29 एप्रिलला  सभा |  मुरलीधर मोहोळ 25 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार

Tushar Patil BJP | सिनरजी इमारतीच्या बांधकामात विकसकाने अनियमितता केली असल्याची तुषार पाटील यांची तक्रार

| महापालिका शहर अभियंता यांच्याकडे कारवाईची केली मागणी

पुणे पेठ गुलटेकडी सि.टी.एस. नं. १००/२९, १००/४२, १००/४४, १००/४६ फा. प्लॉट नं. ४३९+४४६, प्लॉट नं. २९ आणि ४२ पुणे या  मिळकतीवर बांधण्यात आलेल्या सिनरजी या इमारतीच्या बांधकामात विकसकाकडून अनियमितता झाली असल्याची तक्रार भाजप शहर उपाध्यक्ष तुषार पाटील (Tushar Patil Pune BJP) यांनी शहर अभियंता (PMC City Engineer) यांच्याकडे केली आहे. संबंधित बांधकामाची पाहणी करून अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची मागणी पाटील यांनी केली आहे. (Pune News)

याबाबत पाटील यांनी शहर अभियंता यांना पत्र दिले आहे. त्यानुसार   सॅलसबरी पार्क येथे सिनरजी या इमारतीचे बांधकाम करण्यात आलेले आहे. इमारतीचे बांधकाम हे बांधकाम करण्याच्या परवानगी दाखल्याप्रमाणे प्रत्यक्षात करण्यात आलेले आहे का ? तसेच सदरील इमारतीचे बांधकाम सुरु असताना त्याचे वेळोवेळी प्लिंथ चेकींग करण्यात आलेली आहे.  तसेच सदर इमारतीचे बांधकाम पुर्णत्वाचा दाखला पुणे मनपामार्फत देण्यात आलेला आहे का ? त्याप्रमाणे प्रत्यक्ष जागेवार बांधकाम करण्यात आलेले आहे का ? याची स्थळ पाहणी अहवाल घेण्यात आलेला आहे का ? जर बांधकाम करण्याच्या परवान्याप्रमाणे बांधकाम केले गेले नसल्यास संबंधितांवर आजतागात काय कारवाई करण्यात आलेली आहे का? अशी माहिती मागितली आहे.

तसेच सदर इमारतीच्या आवारात स्विमिंग पुल बांधण्यात आलेला असून सदर स्विमिंग पुलाच्या बाजूला नियमाप्रमाणे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कोणकोणत्या उपाययोजना करणे गरजेचे आहे ? सदर सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत का ? याची देखील तपासणी बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेले आहे का ? तसेच सदर इमारतीस १५ मजल्याची परवानगी देण्यात आलेली आहे का ? त्याचप्रमाणे टेरेस वरील इमारतीचे गुळ बिम व कॉलम यांची तोडफोड करुन टेरेस वर प्रायव्हेट स्विमिंग पुल तयार करणेस पुणे मनपाने परवानगी दिलेली आहे का ? दिली असल्यास कोणत्या निकषान्वये दिलेली आहे ? व दिली नसल्यास सदर ठिकाणी सुरु असलेले अनाधिकृत बांधकामावर आजतागायत बांधकाम विभागाने कारवाई का केलेली नाही ? याची देखील मागणी पाटील यांनी प्रशासनाकडे केली आहे.
तसेच  मिळकतीमधील इमारतीचे बांधकाम करताना नियमाप्रमाणे सोडावे लागणारे साईड मार्जिन प्रत्यक्षात विकसकाने सोडलेले आहे का? याची स्थळ पाहणी बांधकाम विभागामार्फत करण्यात बाहेर काढलेले असताना देखिल प्लिंथ चेकिंगचे परवाने कोणत्या निकषान्वये देण्यात आलेले आहेत ? याबाबत संबंधितांवर आजतागायत कोणतिही कारवाई का करण्यात आलेली नाही ? याची माहिती मागवली आहे.
the karbhari - tushar patil bjp
त्याचप्रमाणे सदर मिळकतीच्या विकसकाने आजतागायत किती वेळा मुळ आराखडयामध्ये बदल केलेला आहे ? व त्याची मान्यता बांधकाम विभागामार्फत देण्यात आलेली आहे का ? तसेच सदर मिळकतीमध्ये २ इमारतींमध्ये प्रत्येक मजल्यावर १ सदनिका या प्रमाणे बांधण्यात आलेल्या एकूण ३० सदनिकांपैकी किती सदनिकांचे बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेण्यात आलेला आहे ? (ज्या सदनिकांचे बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेण्यात आलेले आहेत, त्या सदनिकांचे क्रमांक देण्यात यावे ) ज्या सदनिकांच्या बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेतला आहे, त्या सदनिकांचे बांधकाम मान्य नकाशाप्रमाणे प्रत्यक्षात करण्यात आले आहे का ? याचे स्थळ पाहणी करण्यात आलेली आहे का ? तसेच ज्या सदनिका संबंधित विकसकाने विक्री केलेल्या आहेत, त्या सदनिकांना एकूण किती पार्किंगची व्यवस्था केलेली आहे ? या पार्किंगची नोंद पुणे मनपाच्या मान्य नकाशामध्ये केलेली आहे का ? केलेली नसल्यास व प्रत्यक्ष जागेवर पार्किंगची वेगळी स्थिती असल्यास संबंधितांवर आजतागायत काय कारवाई करण्यात आलेली आहे

तसेच सदर गळकतीचे बांधकाम करणेकरिता एकूण किती एफ.एस.आय. मंजूर आहे ? व बांधकामाकरिता किती टी. डी. आर. वापरण्यात आलेला आहे ? त्याप्रमाणे प्रत्यक्षात बांधकाम करण्यात आलेले आहे का ? आणि जर मंजूर एफ. एस. आय. पेक्षा जास्त बांधकाम करण्यात आलेले असल्यास आजतागात संबंधितांवर कोणत्या प्रकारची कारवाई करण्यात आलेली आहे ? त्याचप्रमाणे जर बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेतला असल्यास, सदनिकेच्या बांधकामामध्ये कोणत्या निकषान्वये बदल करण्यास परवानगी देता येते ? जर बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेतल्यानंतर सदनिकेमध्ये नियमबाहय बदल केले असल्यास त्यावर कारवाई का करण्यात आलेली नाही ? तसेच सदर संपूर्ण मिळकतीची फायर ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात आलेले आहे का ? तसेच फायर सेफ्टी ऑडिट करण्यात आले आहे का ? त्याप्रमाणे प्रत्यक्ष जागेवर फायर विभागाने स्थळ पाहणी केलेली आहे का ? जर प्रत्यक्ष मिळकतीमध्ये मोकळ्या जागेवर अनाधिकृत मॅकेनिकल पार्किंग उभारले असल्यास व त्यामुळे सदर मिळकतीमध्ये भविष्यात जर आग लागण्याची दुर्घटना घडल्यास प्रत्यक्ष जागेवर आगीचा  बंब पोहचण्यास अडचण निर्माण होवून कोणतिही मोठी जीवीतहानी झाल्यास त्यास जबाबदार कोण ? असे प्रश्न पाटील यांनी उपस्थित केले आहेत.

पाटील यांनी पुढे म्हटले आहे कि  संबंधित मिळकत विकसकाने अनेक प्रकारचे अनाधिकृतपणे बांधकाम करण्यात आल्याने त्यावर कारवाई करण्यात यावी. तसेच प्रत्यक्ष जागेवर कारवाई करून अनाधिकृत अतिक्रमण त्वरीत त्वरीत हटविण्यात यावे. अशी मागणी पाटील यांनी केली आहे.