Transfer: उपायुक्त सुनील इंदलकर यांची बदली

HomeपुणेPMC

Transfer: उपायुक्त सुनील इंदलकर यांची बदली

Ganesh Kumar Mule Oct 11, 2021 5:16 PM

Layoff of Contract employees | ४५ वर्षावरील कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचा पुणे महापालिकेवर मोर्चा
Water Closure | येत्या गुरुवारी शहराच्या काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार
PMC Employees Gratuity | महापालिका कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी | ग्रॅच्युइटीची मर्यादा वाढवली! 

उपायुक्त सुनील इंदलकर यांची बदली 

पुणे: महापालिका सामान्य प्रशासन विभागात उपायुक्त या पदावर काम करणारे सुनील इंदलकर यांची बदली करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या आपल्या मूळ सेवेत जाण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार त्यांना महापालिका सेवेतून कार्यमुक्त करण्यात आले आहे.

जून मधेच संपला होता कालावधी

सुनील इंदलकर हे राज्य सरकारच्या जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख या पदावर कार्यरत होते. त्यांना महापालिकेत उपायुक्त या पदावर प्रति नियुक्तीने नियुक्त करण्यात आले होते. 6 जून 2019 पासून ते कार्यरत होते. 2 वर्षाचा कालावधी त्यांना मिळाला होता. त्यानुसार 6 जून 2021 ला त्यांचा पालिकेतील कालावधी संपला होता. मात्र कोविड च्या कारणास्तव जून मध्ये त्यांची बदली होऊ शकली नव्हती. काही दिवसासाठी त्यांनी सरकारकडे कालावधी मागितला होता. त्यानुसार ते कार्यरत होते. मात्र पुन्हा इंदलकर यांनी  आपल्या मूळ खात्यात जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी  त्यांना कार्यमुक्त केले आहे. त्यांच्याकडील सामान्य प्रशासन पदाचा कार्यभार आयुक्तांनी राजेंद्र मुठे, उपायुक्त, मालमत्ता व्यवस्थापन यांच्याकडे सोपवला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0