Traffic in Dhayari |  धायरी फाटा येथील वांजळे उड्डाण पुलाला वाय फाटा करण्याची मागणी 

Homeपुणेsocial

Traffic in Dhayari |  धायरी फाटा येथील वांजळे उड्डाण पुलाला वाय फाटा करण्याची मागणी 

गणेश मुळे Mar 02, 2024 12:09 PM

PMC Pune Theatre | शहरातील नाट्यगृहांचे नूतनीकरण करण्यासाठी पुणे महापालिका नागरिकांकडून सूचना मागवणार
Merged 23 Villages : PMC : समाविष्ट 23 गावांतील 626 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाणार
Illegal Hoardings : अनधिकृत होर्डिंग वरून अतिरिक्त आयुक्त, विभाग प्रमुख धारेवर  : महापालिका आयुक्तांनी शहर साफ करण्याचे दिले आदेश 

Traffic in Dhayari |  धायरी फाटा येथील वांजळे उड्डाण पुलाला वाय फाटा करण्याची मागणी

| शिवसेना ठाकरे गटाच्या महेश पोकळे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी

Traffic in Dhayari | पुणे | (The Karbhari Online) – वाहतूक कोंडी टाळण्यासाठी धायरी फाटा येथील स्व. रमेश भाऊ वांजळे उड्डाण पुलाला (Ramesh Wanjle Flyover) वाय फाटा करण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महेश पोकळे (Mahesh Pokale Pune Shivsena) यांनी महापालिका आयुक्त (PMC Commissioner) यांच्याकडे केली आहे.

पोकळे यांच्या निवेदनानुसार वाहतूक कोंडी टाळण्यासाठी धायरी फाटा येथील स्व. रमेश भाऊ वांजळे उड्डाण पुलाला वाय फाटा करण्यास पुणे मनपा प्रशासनाने मान्यता दिली असून त्यासाठी सन २०१९-२० या आर्थिक वर्षात १० कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली होती. मात्र या कामाची निविदा काढून कामास लवकरच सुरवात करण्यात येणे गरजेचे असतानाही कामास सुरुवात झाली नाही.
मागील वर्षी महापालिकेचे प्रकल्प अधिकारी, शहर सुधारणा समितीचे पदाधिकारी, बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी सदर प्रकल्पाची पाहणी सुद्धा केली होती. धायरी फाटा येथील स्व. रमेश भाऊ वांजळे उड्डाण पुलाचा उपयोग धायरी नऱ्हे या गावाकडे जाणाऱ्या नागरिकांना होत नाही. उड्डाण पुलाचा वापर पूर्णपणे होत नाही. तसेच उड्डाणपुलाखालील सर्विस रस्त्यावरून धायरी गावाकडे जाणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढून येथे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. याचा पादचाऱ्यांना देखील त्रास होत आहे.
यावर कायम स्वरूपी उपाय म्हणून सध्या असलेल्या स्व. रमेश भाऊ वांजळे उड्डाणपुलाला वाय फाटा करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे धायरी फाटा येथील वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकलेले नागरिक मोकळा श्वास घेतील व नागरिकांना दिलासा मिळेल. पुणे महानगरपालिकेने लवकरात लवकर सदर प्रकरणी निविदा प्रक्रिया राबवून तातडीने वाय पुलाचे काम करण्यात यावे. असे पोकळे यांनी म्हटले आहे.