सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होणार
: पर्यायी रस्ता उपलब्ध होणार
पुणे : महापालिकेकडून प्रयेजा सिटी ते नांदेड सिटी डी. पी. रस्ता विकसित करण्याते येणार असून या रस्त्याच्या कामासाठी 1 कोटी 76 लाख 76 हजार रूपयांच्या खर्चास मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यामुळे सिंहगड रस्त्यावरून नांदेड सिटीकडे जाण्यासाठी पर्यायी रस्त्या उपलब्ध होणार असून मुख्यरस्त्यावरील वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
सदर कामाअंतर्गत माती मुरूम खोदाई,वाहतुक करणे, मुरूम पुरविणे, मुरूम पसरविणे, मुरूम दबाई करणे, जी.एस.बी., वेटमिक्स मॅकाडम, प्राईम कोट,टॅककोट,डेन्स बिटुमिनस मॅकाडम,बिटुमिनस काँक्रीट,मॅनहो ल चेंबर रस्त्याच्या समपातळीत बांधणे, इ.आयटेमचा समावेश आहे.
विषयांकित कामाची निविदा मागविली असता प्रकरणी ९ निविदा प्राप्त झाल्या असून ७ निविदाधारक पात्र आहेत. ठेकेदार मे. मे.त्रिमुर्ती स्टोन मेंटल कं. यांची सर्वात कमी दराची (१८.५२%) कमी दराचे म्हणजेच टेंडर र.रु. १,४६,१०,३०२ २४ ची निविदा प्राप्त झाली आहे. तसेच जी.एस.टी. र.रू.२१,५१,७३८= १८ अधिक रॉयल्टी र.रू.६,३४,८८०=६४ अधिक मटेरीयल टेस्टिंग र.रू.१३,२३३=०० अधिक लेबरसेस ररू.१,७९,३११=५२ अधिक वर्करइंश्युरन्स र.रू ८९,६५५=७६पर्यंत अदा करणेत येणार आहे. सदर ठिकाणी प्रयेजा सिटी ते नांदेड सिटी डी.पी.रस्ता विकसित केल्याने सिहंगड रस्त्याला पर्यायी रस्ता उपलब्ध होणार आहे व पी.एम.वय प्रकल्पास जाण्यासाठी रस्ता उपलब्ध होणार आहे.

नांदेड सिटीकडे जाण्यासाठी सध्या सिंहगड रस्ता हा एकमेव रस्ता आहे. त्यामुळे, महामार्गावरून आलेली वाहने तसेच मुख्य रस्त्याने आलेली वाहने वडगाव पूलापासून धायरी मधून पुढे नांदेड सिटीकडे आणि शिवणे मध्ये या मार्गावरून जातात. त्यामुळे मुख्य रस्त्यावर मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या शिवाय, नांदेड सिटीच्या जवळच महापालिकेची पंतप्रधान आवास योजनेतील घरे बांधण्यात आलेली असून त्यांनाही याच मार्गाने जावे लागते.
COMMENTS