आज पुण्यात नवे ७२६४ रुग्ण आढळले
पुणे : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. आज पुणे मनपाच्या हद्दीत तब्बल ७२६४ रुग्ण आढळले आहेत. दरम्यान यामुळे आता active केसेस चा आकडा वाढला असून तो आता ४२२६४ झाला आहे.
आज पुण्यात ४५७५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. शहरात ७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे शहरातील आतापर्यंतच्या मृत्यूंची संख्या ९ हजार १६८ वर गेली आहे.
– दिवसभरात 7264 पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ
– दिवसभरात रुग्णांना 4575 डिस्चार्ज.
-कोरोनाबाधीत 07 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 04. एकूण 11 मृत्यू.
– 282ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 583533
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 42264
– एकूण मृत्यू -9168
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 532101
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 20342
COMMENTS